मराठी विनोद

************************************************************************ ************************************************************************ एकदा नवरा-बायको खूप भांडत असतात.

नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते आणि म्हणते, 'बदला लूंगी'.

नवरा विचारतो, 'हे तू हिंदीत म्हणालीस का मराठीत?' 

************************************************************************
एक इंजीनियर प्रियकर आपल्या प्रेयसी सोबत पार्कात बसलेलं असताना)

प्रेयसी : आपण लग्न कधी करायचं?

प्रियकर : मला नोकरी लागल्यावर

प्रेयसी : तुला लग्न नसेल करायचं तर तसं थेट सांग ना... 

************************************************************************
गर्लफ्रेंड - तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस... उद्या जर मी या जगातून गेले तर तू काय करशील?

बॉयफ्रेंड - तर तुझ्यामागोमाग मी पण प्राण सोडेन.

गर्लफ्रेंड - बापरे...का?

बॉयफ्रेंड - अगं, तुझ्या नादात एवढी उधारी झालीय, की जगून तरी काय करू?

************************************************************************
पुण्यातल्या एका हॉटेलात लावलेली पाटी

तुमचं एकमेकांवर कितीही प्रेम असलं तरीही...

एक थाळी दोघांत खाऊ नये. 


**********************************************************************  
 
********************************************************************** 
************************************************************************
 नवरा - (रागावून) हे काय केलंयस? या आलू पराठ्यांमध्ये नावालाही बटाटे दिसत नाहीयत.

बायको - पुढ्यात दिलंय ते गुमान खा...हॉटेलमध्ये काश्मिरी पुलाव खाता, त्यात काय काश्मीर दिसतं का?
************************************************************************
 मुलीचे बाबा : अरे मुर्खा, तुझ्या पगारात माझ्या मुलीचा नाक पुसायचा रुमालसुद्धा येणार नाही.

मुलगा : बाप रे! तुमची मुलगी इतकी शेंबडी असेल तर राहू दे.
************************************************************************
 एका तरुण नेत्याला विचारलं, 'समजा तुम्हाला दोन मिनिटांसाठी मुख्यमंत्री केलं तर तुम्ही काय कराल?'

नेता - मी दोन म‌िनिटांत होणारे नूडल्स बनवेन.

आणि जर २४ तासांसाठी बनवले तर?

नेता - तर नूडल्स नाही बनवणार. कारण एवढे नूडल्स खाणार कोण?
************************************************************************
इतके महागडे मोबाइल फोन्स विकणाऱ्या मोबाइल कंपन्यांना एक विनंती आहे....

२० रुपये जास्त घ्या. पण त्या चार्जरची वायर थोडी लांब करत जा की राव.

नेहमी बोर्डाच्या जवळ चिकटून बसावं लागतं. 
************************************************************************
मुलगी - काका, तुमच्याकडे चेहरा गोरा करायचं क्रिम आहे का?

दुकानदार - हो, आहे ना.

मुलगी - मग लावत जा ना रोज.... किती घाबरते मी तुम्हाला बघून. 
************************************************************************
लग्नानंतर दुस‍‍ऱ्या दिवशी घरात सगळे नातेवाईक जमले होते.

नवरीमुलगी मान खाली घालून पदर घेऊन बसली होती.

सगळे म्हणत होते, मुलगी किती लाजरी आहे. मान वरही करत नाही.

मागून एक आवाज आला, अहो, नव्या वहिनीसाहेब व्हॉटसअॅपवर ऑनलाइन आहेत... 
************************************************************************
गुरुजी इंग्रजीत भाषांतर करण्याच्या सरावासाठी एक वाक्य देतात. - वसंताने मला ठोसा मारला.

गण्या भाषांतर करतो... वसंतपंचमी

गुरुजी अजून ‌कोमात...
 
************************************************************************ 
************************************************************************
************************************************************************
************************************************************************
      मम्मी - काय गं, कुठे चाललीयस?

मुलगी - कॉलेजला.

आई - माहितीय ना, आज रोज डे आहे ते.

मुलगी - हो..जस्ट चिल मॉम.

आई - जेवढे गुलाब मिळतील तेवढे घरी घेऊन ये. मस्त गुलकंद करूया घरी.

************************************************************************
मुलगा व्हॉटसअॅपवर गर्लफ्रेंडशी गप्पा मारत असतो.

मुलगा - प्रिये, झोपली असशील तर स्वप्नं पाठव. जागी असशील तर आठवणी पाठ, हसत असशील तर आनंद पाठव. रडत असशील तर अश्रू पाठव.

थोड्या वेळाने गर्लफ्रेंडचा रिप्लाय आला.

'अरे, भांडी घासतेय रे...खरकटं पाठवू का?'
 

************************************************************************
गण्या तावातावाने बोलत होता...

आजकालच्या मुलांना काय माहित संघर्ष आणि कष्ट म्हणजे काय ते?

अरे आमच्यावेळी मोबाइलवर एस टाइप करायचा तरी सातचे बटण चारवेळा दाबावे लागायचे.
 

************************************************************************  
मिसेस कुलकर्णी - अहो, ऐकलंत का? माझ्यासाठी एक ताजमहाल बनवा ना.

...

मिस्टर कुलकर्णी - बनवतो. साखर किती चमचे टाकू? 

************************************************************************
गुरूजी वर्गात मराठीचा तास घेत असतात.

गुरूजी - मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत...कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. सांगा पाहू, 'मी चहा पितो किंवा मी कॉफी पितो' या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो?

बंड्या - गुरुजी, तरतरी प्रयोग 

************************************************************************  
मुलगी - काका, तुमच्याकडे व्हॅलेंटाइन डेचं असं एखादं कार्ड आहे का ज्यात लिहिलं असेल, की 'फक्त तू आणि तूच माझं पहिलं, आणि शेवटचं प्रेम आहेस.'

दुकानदार - हो, आहे ना.

मुलगी - ती एक डझन कार्डस पॅक करून द्या.
 


************************************************************************
 गणूची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट एका मुलीनं अॅक्सेप्ट केली.

गणूः (खूष होऊन) थँक यू...

मुलगीः इट्स माय प्लेजर.

गणूः ओह, माय वन बुलेट, वन स्कॉर्पिओ अँड २५ एकर मळा!गणूः ओह, माय वन बुलेट, वन स्कॉर्पिओ अँड २५
एकर मळा!  
************************************************************************
 व्हॉटसअॅपवर...

नवरा - कॉल मी शोनू.

बायको - माझा शोनू बाबा.

नवरा - अरे ए, कॉल मी स्वीटहार्ट

बायको - ओ, माय स्वीटहार्ट

नवरा - अगं, ए टवळे कॉल कर ना मला. माझा बॅलन्स संपलाय, लवकर कॉल कर मला.
************************************************************************

गंपू - (ऑफिसमधून घरी आल्यावर) अरे वा, आज घर छान आवरलेलं दिसतेय. तुझं व्हॉटसअॅप बंद होतं का आज?

गंपूची बायको - नाही हो, फोनचा चार्जर सापडत नव्हता. तो शोधण्याच्या नादात सगळी आवराआवर झाली.

************************************************************************
मराठीचा तास सुरू असतो. गुरूजी बंड्याला उभं करतात.

गुरूजी - सांग बरं, 'हातखर्च' या शब्दाच्या विरुद्ध काय?

बंड्या - पायजमा
 

************************************************************************
गंपू एका लग्नाला गेला होता. त्याने त्या नवविवाहित दाम्पत्याला आल्याचा मोठा तुकडा भेट म्हणून दिला.

का?

कारण, लग्नाच्या पत्रिकेत लिहिलं होतं.

'लग्नाला आलंच पाहिजे.'

 ************************************************************************
गणू एकदम फास्ट कार चालवत होता. ट्रॅफिक पोलिसाने त्याला पकडलं.

गणूः साहेब, माझ्याकडे ‌लर्निंग लायसन्स आहे. मी कार ड्रायव्हिंग शिकतोय.

पोलिसः मग, तुझा ट्रेनर कुठे आहे?

गणूः अहो सर, हा करस्पॉडंन्स कोर्स आहे ना...

************************************************************************
एक अमेरिकन बाई पंढरपूरला जाते. तिथे मंदिराकडे बघून म्हणते 'वॉव वंडरफुल'.

थोडं पुढे जाऊन मंदिराच्या कळसाकडे पाहून परत म्हणते 'वॉव वंडरफुल'.

तेवढ्यात तिथे बसलेली आजीबाई म्हणते, 'अगं ए टवळे...वंडरफुल नाय, पंढरपूर'

************************************************************************
सर - सांगा बरं, शून्याचा शोध कुणी लावला?

बंड्या - आलिया भट्ट

सर - गाढवा काहीही काय बडबडतोयस?

बंड्याचा मित्र - सर, अहो तो बोबडा आहे. त्याला आर्यभट्ट म्हणायचं आहे.

************************************************************************
जगातील फास्ट नेटवर्क दोन प्रकारात आहे.

एक : इमेल

दोन : फीमेल... एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोहोचवतात.

************************************************************************
ठमाकाकू : एखादं सिक्रेट सांगायचं असेल ना, तर नवऱ्यापेक्षा चांगलं दुसरं कोण नाही...

रमाकाकू : का गं?

ठमाकाकू : कारण आपण सांगताना त्याचं मुळी लक्षच नसतं!! 
************************************************************************

अपेक्षांची परिसीमा कशाला म्हणावं?

नवऱ्याने बायकोला तिळगूळ देणं आणि म्हणणं 'तिळगूळ घे आणि गोड गोड बोल.'



************************************************************************
संक्रांत स्पेशल

संक्रांतीच्या निमित्ताने पुण्यातल्या एका पतंगवाल्याने दुकानात बोर्ड लावला होता.

नवऱ्यांनो, तुमच्या बायकोचा फोटो पतंगावर लावा आणि पतंग हवेत उडवा.

...आणि बायको गेली उडतचा आनंद लुटा.

************************************************************************
घरातला फोन खणाणला.

फोनवरचा आवाज - हॅलो, पूजा आहे का?

गोखले काका - नाहीय.

फोनवरचा आवाज - मग करून घ्या ना एकदा.

************************************************************************

एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम काय आहे?

क्षणाचाही विलंब न करता हृदय म्हणालं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं आहे. असले अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न मला विचारू नकोस.

************************************************************************
गंपू पेपर वाचत असतो.

त्यात एक बातमी असते 'लांब उडी स्पर्धेत भारताच्या खेळाडूने सुवर्णपदक गमावलं.'

गंपू - काय म्हणावं यांना, सोन्याचे दागिने अंगावर घालून स्पर्धेत कशाला भाग घ्यायचा, ते हरवणार नाही तर काय?
************************************************************************
अनुपने भंगार मध्ये पडलेली बाबा आदमची सायकल बाहेर काढली. ती दुरूस्तीसाठी सायकल रिपारिंगवाल्याकडे नेली. तेव्हा त्यांच्या सायकलची अवस्था पाहून तो ‘साहेब, या सायकलची दुरूस्ती करणे अशक्य आहे’
अनुप: ‘पण नेपोलियन बोनापार्ट तर म्हणत होता. जगात काहीही अशक्य नाही’
तो: ‘मग त्याच्याकडेच घेऊन जा.’

************************************************************************
असा कोणता गामा(पहेलवान) आहे, ज्याने आयुष्यांत कधी कुस्ती खेळली नाही?
वास्को -द- गामा!

************************************************************************
नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’
************************************************************************
शिक्षिका- मुलांनो! आपण नेहमी वडिलांच्या नावामागे श्री लावत जावे. रोहन; तुझ्या वडीलांचे नाव काय आहे?
रोहन- श्रीमतीराम!
शिक्षिका - गाढवा, वडिलांच्य नावामागे श्री. लावावे व आईच्या नावामागे श्रीमती. समजलं?
रोहन- पण बाई, माझ्या वडिलांचे नाव मतीराम आहे!
************************************************************************

एक दारूडा रस्त्यावरून जात असताना तिकडून एक व्यक्ती येत असते. तेव्हा तो
दारूडा - अरे, माझ्यासाठी टॅक्सी घेऊन ये?
ती व्यक्ती- मी काही तुझा नोकर नाही.
दारूडा- मग कोण आहेस?
ती व्यक्ती- एअर कमांडर!
दारूडा- मग विमान घेऊन ये!
************************************************************************
मराठीच्या शिक्षकांनी दादूला प्रश्न केला, "कवी यशंवताच्या जन्म-मृत्यूचे इसवी सन सांग."
"माहीत नाहीत सर."
दादू म्हणाला. "माहीत नाही? पुस्तक काढून यशवंताची कविता पाहा. परिचयात त्यांच्या नावापुढे कंसात काय लिहिलय ते वाच!" शिक्षकांनी आज्ञा दिली. दादूनं पुस्तक काढून वाचल, "यापूर्वी कधी वाचलं नव्हतं का हे?" शिक्षकांनी विचारलं. "हे तर माहीत होतं मला," "मग माहीत नाही असं का म्हणालास?" शिक्षक रागावले. "मला वाटलं हे त्यांचे दूरध्वनी क्रमांक असावेत, दादू म्हणाला!!
************************************************************************
आपल्या पुस्तकातील एका कवितेचे पान पुढे धरीत कविवर्य नारायण सुर्व्यांच्या चिरंजीवानी, रवींद्र सुर्वेने मागणी केली, "हे पहा, तुमच्या कविता आम्हाला अभ्यासाव्या लागतात. तुम्हीच ही कविता शिकवा मला,"
"नको, बुवा, या कवितेचा अर्थ तू आपल्या शिक्षकांनाच विचार," नारायण सुर्वे म्हणाले. "पण ही कविता तुम्ही शिकविली तर’
‘अरे, ही कविता मी शिकविली तर अर्थ चुकेल आणि शून्य मार्क मिळतील तुला," नारायण सुर्वे त्याला समाजावित म्हणाले!
************************************************************************
राजू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.
************************************************************************
एका मराठी लेखकाच्या आत्मचरित्रांच प्रकाशन झाल्यावर आठच दिवसांनी त्यांची मुलाखत घेणाऱ्या एका पत्रकाराने त्यांना प्रश्न केला,
"आत्त्मचरित्र लिहून तुम्हाला काय मिळालं?"
’दोन हजार शत्रू," लेखक महोदय म्हणाले!
************************************************************************
मराठवाड्याचे एक प्राध्यापक महोदय आपल्या मित्राला आपले शहर दाखवित होते.
एका इमारती जवळून जाताना मित्राने विचारले. "हे ग्रंथालय आहे वाटतं?"
"व्हयं," प्राध्यापक उत्तरले.
काही वेळेनंतर एका इमारतीकडे बोट दाखवित मित्राने पृच्छा केली, "ही नाट्यगृहाची इमारत दिसतेय?"
"व्हयं"
काही वेळ ते असेच चालत राहिले
जराशयानं मित्र म्हणाला, "इथले रस्ते फारच अरूंद आहेत
नाही?"
"व्हय"
प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल ‘व्हयं’ हा शब्द ऐकून मित्र म्हणाला , "मित्रा, हे ‘व्हय’ काय प्रकरण आहे?"
’मराठवाड्यच्या ग्रामीण बोलीभाषेतला शब्द आहे हा, इथले अशिक्षित लोक ‘होय’ ला ‘व्हय’ म्हणतात
"पण तू तर चांगला सुशिक्षित आहेस ना?"
"व्हय" प्राध्यापक महाशय म्हणाले


************************************************************************
अपेक्षांची परिसीमा कशाला म्हणावं?

नवऱ्याने बायकोला तिळगूळ देणं आणि म्हणणं 'तिळगूळ घे आणि गोड गोड बोल.'
************************************************************************
संक्रांत स्पेशल

नवी पुणेरी पाटी

तिळगूळ जर व्हॉटसअॅपवरुन देण्यात येणार असतील तर गोड बोलणंसुद्धा फक्त व्हॉटसअॅपवरच होईल याची कृपया नोंद घ्यावी.

************************************************************************
घरातला फोन खणाणला.

फोनवरचा आवाज - हॅलो, पूजा आहे का?

गोखले काका - नाहीय.

फोनवरचा आवाज - मग करून घ्या ना एकदा.

************************************************************************
संता : माझे पाकीट काल कोणी तरी मारले त्यात दोन हजार रुपये होते.

बंता : चल खोटारड्या, मी स्वतः घरी जाऊन मोजले तर दीड हजारच होते.

संता : पैशाची बाब नाही रे, मला फक्त कोणी घेतलेत त्याचे नाव सांग.
************************************************************************
नवऱ्याने बायकोला फोन केला.

नवरा - आज मला यायला उशीर होईल. जेवायला काय बनवलंयस?

बायको - (घुश्शात) विष

...

नवरा - मग तू जेवून घे आणि झोप. मी येतो १२ वाजेपर्यंत.

 
************************************************************************
दोन मित्र गप्पा मारत असतात.

पहिला - पेन आहे?

दुसरा - नाहीय.

(थोड्या वेळाने पुन्हा)

पहिला - पेन आहे?

दुसरा - नाहीय एकदा सांगितलं ना.

(थोड्या वेळाने पुन्हा)

पहिला - पेन आहे?

दुसरा - आता विचारलंस तर हातोडाच घालेन डोक्यात.

(थोड्या वेळाने पुन्हा)

पहिला - हातोडा आहे?

दुसरा - नाही.

पहिला - मग पेन आहे का?

 
************************************************************************
बाबा घरी श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच डबा उघडायला जातो. इतक्यात आईचं लक्ष जातं.

ती त्याला जोरात धपाटा मारते आणि म्हणते, 'किती वेळा सांगितलं, आधी फोटो काढून फेसबुकवर आणि व्हॉटसअॅपवर टाकायचा आणि मगच खायचं.'

 
************************************************************************
ऑफिसमध्ये लिहिलेली एक पाटी.

वर्ष बदललंय म्हणून हुरळून जाऊ नका.

कॅलेंडर बदलणार आहे...बॉस नाही.

...

परिस्थिती ‌तीच असणार आहे.

 
************************************************************************
अमेरिकेमध्ये लाइट गेले की तिथले लोक लगेचच पॉवर सप्लाय ऑफिसला फोन करतात.

जपानमध्ये लाइट गेले की तिथले लोक पहिल्यांदा फ्यूज चेक करतात.

आणि आपल्याकडे लाइट गेले तर...

...

आपल्याकडचे लोक घराबाहेर पडतात. 'सगळ्यांचीच गेलीय ना, मग जाऊ दे. येईल तेव्हा येईल, बघू.' असं म्हणून स्वस्थ बसतात.

************************************************************************

मेंटल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर राऊंड घेत होते. एक वेडा छतावर जाऊन उलटा लटकत होता.

डॉक्टर - काय रे, असा का लटकतोयस?

वेडा - मी बल्ब आहे.

डॉक्टर - अरे, मग जळतोयस कुठं?

वेडा - ओ, लाइट्स गेलेत ना.








0 comments:

Post a Comment