आम्ही सगळे कासवछापवाले
दिलीप पाटील, नाशिक
आम्ही सगळे कासवछापवाले
संध्याकाळ झाली की
कासवछाप पेटवायची
डासांच्या हल्ल्यापासून बचावासाठी
आपली डोकी कासवाच्या
धुराळ कवचाखाली मिटवायची
कालपर्यंत हे दुष्ट डास
कानाकोपऱ्यांत घुण-घुण करीत डासायचे
आता तर त्यांनी
माजघरापर्यंत मजल मारली आहे
लख्ख उजेडालाही न घाबरता
कचाकचा खुपसताहेत ते
आपल्या सूक्ष्म, टोकदार सोंडी
आणि शोषून घेताहेत पोट भरून
हाडाडलेल्या कष्टकऱ्यांचं रक्त
जे लागलंय आता
चांगलंच त्यांच्या तोंडी
हे उन्मत्त डास आता
एवढे निर्ढावलेत की
सरकारी फवारणीलाही ते
भीक घालीत नाहीत
आपल्यातल्याच काहींनी
तयार करून ठेवलाय
इथं-तिथं चिखल आणि
पसरवून ठेवलीहेत सर्वत्र
घाणेरड्या पाण्याची डबकी
जी त्यांच्यासाठी ठरलीत
अक्षय आनंदाच्या खाणी
आता तुम्हीच सांगा
'चिपाड झालेल्या कष्टकऱ्यांना
या डासांच्या छळापासून वाचवायला
कोणी वालीच उरला नाही'
असं म्हणायचं?
की या साऱ्या कीडलेल्या
व्यवस्थेलाच आभाळभर
टाहो फोडून हसायचं?
आम्ही सगळे कासवछापवाले
संध्याकाळ झाली की
कासवछाप पेटवायची
डासांच्या हल्ल्यापासून बचावासाठी
आपली डोकी कासवाच्या
धुराळ कवचाखाली मिटवायची
कालपर्यंत हे दुष्ट डास
कानाकोपऱ्यांत घुण-घुण करीत डासायचे
आता तर त्यांनी
माजघरापर्यंत मजल मारली आहे
लख्ख उजेडालाही न घाबरता
कचाकचा खुपसताहेत ते
आपल्या सूक्ष्म, टोकदार सोंडी
आणि शोषून घेताहेत पोट भरून
हाडाडलेल्या कष्टकऱ्यांचं रक्त
जे लागलंय आता
चांगलंच त्यांच्या तोंडी
हे उन्मत्त डास आता
एवढे निर्ढावलेत की
सरकारी फवारणीलाही ते
भीक घालीत नाहीत
आपल्यातल्याच काहींनी
तयार करून ठेवलाय
इथं-तिथं चिखल आणि
पसरवून ठेवलीहेत सर्वत्र
घाणेरड्या पाण्याची डबकी
जी त्यांच्यासाठी ठरलीत
अक्षय आनंदाच्या खाणी
आता तुम्हीच सांगा
'चिपाड झालेल्या कष्टकऱ्यांना
या डासांच्या छळापासून वाचवायला
कोणी वालीच उरला नाही'
असं म्हणायचं?
की या साऱ्या कीडलेल्या
व्यवस्थेलाच आभाळभर
टाहो फोडून हसायचं?
*****************************************************************************
उद्या पुनः जायचंय
विजया सिंहअनुवाद : प्रकाश भातम्ब्रेकर
उद्या पुनः जायचंय
अत्यंत प्रिय गुलाबी सँडलची टाच निखळू लागलीय
आतल्या चुका पायाला टोचतायत
आकाशी फ्रॉक मळकट, मातकट होत चाललाय
तसं तर आताशा आभाळ तरी कुठं निळं राह्यलंय
ते तर सारखं आग ओकतंय
शाळेची दप्तरं, मैदानी वाहाणा उतरवून ठेऊन
कुठल्या तीर्थयात्रेला निघालीयत मुलं
देवाविना देवळं ओकीबोकी झालीयत तरीही...
कोमल स्पर्शानं मुलांचे नाजूक चेहरे
कुरवाळण्याऐवजी त्यांवर संगिनी रोखणाऱ्या
क्रूर हातांना झालंय तरी काय
कोणता हिशोब चुकता करताहेत या
क्षणोक्षणी वळवळणाऱ्या सावल्या
डोळे सताड उघडे ठेवून हा कोण
निपचित पडलाय बंदुकधारी
लेबनॉनला पोचण्याआधी
कर्बलाच्या छातीवर कोण धसमुसळे
जिव्हा बाहेर काढून धुडगूस घालतायत
केस विंचरायलाही टाळाटाळ करणारा मस्तवाल
आज काटेरी तारांची भेंडोळी तुडवतोय
तरीही एक टिपूस सुद्धा नाही त्याच्या डोळ्यांत!
वीर-बहाद्दरचा अर्थसु्द्धा माहीत नसूनही
साहसाची व्याख्या बनू पाहणारा हा क्रूरकर्मा
कोणत्या ठिकाणचा पत्ता विचारतोय?
यांच्या प्रश्नांची उत्तरं कुणीच कसं देत नाहीय?
-फिरून एकदा हे सिद्ध होतंय की
जगात प्रश्नच प्रश्न आहेत पण उत्तरं नाहीयत-
जी उत्तरं मिळतायत
त्यांबद्दलचा निषेध मुलं व्यक्त करतायत
आपल्या आसवांमधून...
त्यांना नकोयत नकाशे
त्यांना फक्त परतायचय
आपापल्या जुन्या घरी
आणि फोटोंमधली 'हरवलेल्या चेहऱ्यांची'
आपली माणसं
फक्त इतकंच हवंय त्यांना...
*****************************************************************************
जगणे!
-सुमन श्रीराम फडके, दादर (पश्चिम)
त्रिकालाच्या त्रितालाच्या, किती मात्रा मोजाल!
आजची 'सम' उद्या 'काल', असे भविष्यात जाल ।।१।।
अगणित श्वास घेता घेता, हिशोब मांडाल किती
अनंत आहे अंतराळ हे, सांगा उडाल किती! ।।२।।
आयुष्याचे पंख पसरून, घ्या भरारी ऊंच
पाहा खालचे पहाड, सागर, राई हिरवीकंच ।।३।।
उघड्या चोचीमधूनी आणा, सदिच्छांचा चारा
आत्मतृप्तता अनुभवतांना, इतरांसही विचारा ।।४।।
आनंदाला गुणा निरंतर, दुःखाला भागा
आपल्या बेरजेत, दुसऱ्यासाठी एक 'हातचा' मागा ।।५।।
विषाद घाला उणे, आणखी, उत्तर सुखांत काढा
उतू, मातू, नका, घोकू या, संयमाचा पाढा ।।६।।
सन्मान राखा आचारांचा, नित्य ठेवूनी लक्ष
शब्द वापरू तोलून मापून, सतत राहूनी दक्ष ।।७।।
प्रांजल आयुष्याला जोडू, दिव्य अर्थ अनमोल
सत्य, स्वच्छ, वागू या, सर्वदा, नको वल्गना फोल ।।८।।
जीवननिष्ठांचे जपू या, सुंदर संदर्भ
दैनंदिनीचे प्रत्येक पान, करू अर्थगर्भ ।।९।।

पेशावरची फुले
डॉ. स्वाती बापट
पेशावरच्या मृतांची अजून, नेमकी संख्याही नव्हती कळली
आरोपप्रत्यारोपांसाठी, दोन्हीकडे अनेकांची जीभ वळवळली
कोणीतरी तिकडे बोलले, यामागे आहे इकडच्यांचाच हात
भावनांचा भडका उसळला मग, दोन्ही बाजूंच्या डोक्यांत
आमची संस्कृती, त्यांची संस्कृती, झाला ऊहापोह मग सुरू
आपली संस्कृती एकच आहे हो, इतिहास देईल कसे विसरू?
कळ लावून, रेषा आखून, सोडून गेले ते आपसांत भांडायला
नुकसान दोघांचंही होतंय, हे नको का आम्हाला कळायला?
हजारो वर्षांची सभ्यता आपली, सिंधू नदीच्या कुशीतली
कुठलीशी रेषा ओढल्याने, अचानक होईल अशीकशी वेगळी?
प्रतिशोधाची ठिणगी टाकणारे, अनेक आहेत रेषेच्या आरपार
ती रेषा मिटवून टाकूया का आपण, विचार करून सारासार?

कोठवर पाहू वाट?
-बाळकृष्ण भास्करराव सोनवणे, मल्हारपुरा-जळगाव
मी आहे एकनिष्ठ
शेतीमातीशी.
राहिलो विसंबून ठेवून विश्वास
आपल्या मायावी कृतींवर.
आभाळ-पाण्यावर...
रिकाम्या ओंजळीने
गहिवरत विस्तारतो
डोळ्यातून
टपटपतो
जगण्यासाठी धडपडतांना व्यर्थ
बचावासाठी हाकारतो
तीक्ष्ण उन्हात
अथवा
अतिवृष्टीत पिकासह सडतांना
बांधावरल्या गवतासारखा
तुडवला जातो
सर्वांसमक्ष
सर्वांसाठी
माझ्यासाठी तुम्हाला शब्द फुटतात
सभागृहात
मी भट्टीत असतांना उन्हाच्या.
अथवा
अतिवृष्टी बर्फवृष्टीत होरपळताना.
माझं हरवत चाललंय चैतन्य
आता होतं ओझं
वांझ संवादाचं
मी सोडून देतो
निरर्थक आश्वासनाचं फोलपट
सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्यावर.
क्षितिजावर
उमेदीचे नवे दिवे
उमलण्याची वाट पाहतांना
जगण्याच्या धगीची
होतेय राख.
कोठवर पाहू वाट?
जोखडातून शेतीच्या
काढून घ्यावी म्हणतो मान...
माझा
सोशिकतेचा आणि समजुतदारपणाचा
मावळत चाललाय दिवस...
***************************************************************************** मी आहे एकनिष्ठ
शेतीमातीशी.
राहिलो विसंबून ठेवून विश्वास
आपल्या मायावी कृतींवर.
आभाळ-पाण्यावर...
रिकाम्या ओंजळीने
गहिवरत विस्तारतो
डोळ्यातून
टपटपतो
जगण्यासाठी धडपडतांना व्यर्थ
बचावासाठी हाकारतो
तीक्ष्ण उन्हात
अथवा
अतिवृष्टीत पिकासह सडतांना
बांधावरल्या गवतासारखा
तुडवला जातो
सर्वांसमक्ष
सर्वांसाठी
माझ्यासाठी तुम्हाला शब्द फुटतात
सभागृहात
मी भट्टीत असतांना उन्हाच्या.
अथवा
अतिवृष्टी बर्फवृष्टीत होरपळताना.
माझं हरवत चाललंय चैतन्य
आता होतं ओझं
वांझ संवादाचं
मी सोडून देतो
निरर्थक आश्वासनाचं फोलपट
सैरावैरा धावणाऱ्या वाऱ्यावर.
क्षितिजावर
उमेदीचे नवे दिवे
उमलण्याची वाट पाहतांना
जगण्याच्या धगीची
होतेय राख.
कोठवर पाहू वाट?
जोखडातून शेतीच्या
काढून घ्यावी म्हणतो मान...
माझा
सोशिकतेचा आणि समजुतदारपणाचा
मावळत चाललाय दिवस...
केला रं अभ्यास...
-शब्बीर दाऊद, पुणे
अंधारल्या रातीत दिव्याच्या वातीत
केला रं अभ्यास आम्ही केला रं अभ्यास
नाही आम्हा मिळायाची वह्या कधी पुस्तकं
मागा लागायची आम्हा रं तयासाठी भीक
शिकायाचं खूप हाच होता आम्हा ध्यास
केला रं अभ्यास...
घेऊन जगलो मुकाट पोटास रं चिमटा
खाऊन रं शिव्याशाप चोर अन् भामटा
विसरून जगलो रे भूक अन् प्यास
केला रं अभ्यास...
पडायाच्या पाया आम्ही ते ठोकतात सलाम
करतात आता ते हात जोडून राम राम
आहे का रं खरं हे की नुसताच भास
केला रं अभ्यास...
आम्हीदेखील माणूस होतो विसरले ते होते
धुंदीत आपल्या जगत होते डोळ्यावरी घेऊन पोते
आम्हा पुढं झुकाय आता त्याचं मन रं उदास
केला रं अभ्यास...
मनोमन खात्री आम्हा देवानं रं केला न्याय
देऊन रं साहेबी थाट दूर केलाय रं अन्याय
आभार रं देवा तुझे बनविलेस आम्हा खास
केला रं अभ्यास...
अंधारल्या रातीत दिव्याच्या रं वातीत

धून
आरती तुळसकर, सांताक्रुझ-मुंबई
पहाटेचा शुक्रतारा
उदयाचळी दिनमणी तू।
चवथीची चंद्रकोर
पौर्णिमेचा चंद्र तू।।
शब्दब्रह्म नादब्रह्म
अंतरीचे गूज तू।
बासरीचे सप्तसूर
जीवनाचे गीत तू।।
जाईजुई सोनचाफा
मोगऱ्याचा गंध तू।
आठवांच्या गंधकोषी
बकुळीचा सुवास तू।।
श्वासही निःश्वासही
माझ्या असण्याची लय तू।
तुझं असणं तुझं हसणं
माझ्या जगण्याची 'धून' तू।।
*****************************************************************************पहाटेचा शुक्रतारा
उदयाचळी दिनमणी तू।
चवथीची चंद्रकोर
पौर्णिमेचा चंद्र तू।।
शब्दब्रह्म नादब्रह्म
अंतरीचे गूज तू।
बासरीचे सप्तसूर
जीवनाचे गीत तू।।
जाईजुई सोनचाफा
मोगऱ्याचा गंध तू।
आठवांच्या गंधकोषी
बकुळीचा सुवास तू।।
श्वासही निःश्वासही
माझ्या असण्याची लय तू।
तुझं असणं तुझं हसणं
माझ्या जगण्याची 'धून' तू।।
आषाढधारा
- दया घोंगे, डोंबिवली
आषाढाच्या धारांमधुनी अवचित श्रावण फुलतो ग,
हळवा, ओला आठव येता मनात पावा घुमतो ग!
क्षितिजावरूनी इंद्रधनूचा पूल मनाला खुणवितो
गंधित, धुंदित श्वास धरेचा तनामनाला खुलवितो.
वाऱ्यासंगे मत्त केवडा अवचित दारी फुलतो ग,
आतुर, ओला आठव ओठी गीत धुंद गुणगुणतो ग!
थेंब दवाचा शुभ्र कोवळा पानावरूनी ओघळतो
नवथर चंचल मेघ सावळा गिरिशिखरावर अडखळतो.
थुईथुई नाचत मनात अवचित मोरपिसारा झुलतो ग,
नाजूक, ओला आठव अजुनी नयनातच घुटमळतो ग!
मावळतीवर स्वर्ण सोहळा स्वर्गसुखाला लाजवितो
पिसाटवारा अंगांगासह उरात काहुर माजवितो.
कुंजावरूनी जुईचा अवचित पदर जरासा ढळतो ग,
खट्याळ, ओला आठव कानी गुपित जुने कुजबुजतो ग!
मल्हाराचा सूर अनावर सहस्र धारांतून फुटतो
शापदग्ध जणू यक्ष प्रियेला आर्त स्वरातून आळवतो.
बघता बघता नयनी अवचित झरझर श्रावण झरतो ग,
व्याकुळ, ओला आठव येता उरात काटा सलतो ग!!

आजी आजोबांचा व्हॅलेंटाइन डे
- अनुराधा म्हापणकर, कवयित्री
चश्मा पुसत आजोबा म्हणाले, अगं ऐकलंस का.. आज व्हॅलेंटाइन डे..
आजी म्हणाली... इश्शं!त्याचं कौतुक मला काय गडे..
आजोबा म्हणाले असं गं काय? पन्नास वर्षांपूर्वींचा दिवस आठव
याच दिवशी तर म्हणालीस तू मला तुझ्या डोळ्यात साठव..
आठवतंय हो मला सगळं, चक्क कालच घडल्यासारखं
मलाही वाटतं, अगदी कालपरवाच तुमच्या प्रेमात पडल्यासारखं
एखादंच कुणी कॉलेजात तेव्हा प्रेमदिन करायचा साजरा
तुम्ही मग अगदी न चुकता मला आणायचात ना गजरा
तूही किती लब्बाड होतीस 'वेडा' म्हणून हसायचीस...
काही आणलं नाही तरी, पाठ फिरवून खूप रुसायचीस
हं.. गेले ते दिवस...! ते दिवस जाऊनही काळ झाला
व्हॅलेंटाइन काय आता? आपल्या बाळालाही बाळ झाला
वेडे, वय आड येत नाही गं प्रेम व्यक्त करायला
गजरा माळून चल की...आजही जाऊया फिरायला
आजोबांकडे पाहात आजीबाईंनीही मारला मुरका
म्हणाली .. अहो पाहताय काय..तो गजरा माळा.. बरं का... !!
थरथरत्या हाती हात धरुन चिरतरूण जोडी फिरते आहे..
पन्नास व्हॅलेंटाइननंतरही त्या प्रेमाची गोडी मुरते आहे...

विठ्ठल : एक संवाद
पी. विठ्ठलविठ्ठला...
उन्हानं करपते त्वचा
घामानं सुटते जांघेत, काखेत खाज
कुठल्याही परफ्युमनं झाकता येत नाही
अंगावरच्या घामाचा उग्र वास
मग विठ्ठला...
तू कसा उभायेस युगानुयुगापासून
कोंदट गाभाऱ्यात
वारकऱ्यांच्या श्रद्धेचा डिओडरंट
तुला ठेवतोय सतेज
की रुक्मिणबाई घालते तुला
रोज पहाटे उटण्याची आंघोळ?
पण असं तरी कसं म्हणावं?
तसं असतं तर
दिसला नसतास का तू
एकदा तरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात
उघडाबंब?
आमच्या छातीत चमकते कळ
सांगाड्यात होतो रोजच विकारांचा
भूकंप
श्वासांची गती मोजतो आम्ही
रिश्टर स्केलनं आणि तू तर
अठ्ठावीस युगांपासून हललाही नाहीस
विटेवरून
शेवाळलेल्या शिलालेखावरून आमची
घसरून पडते नजर
तू तर साधी पापणीही पडू दिली
नाहीस अजून
आमची पस्तिशीत दुखणारी दाढ
उपटून काढतो डेंटिस्ट
कॅल्शिअम्च्या कमतरतेनं
चाळिशीत ठिसूळ झालेली हाडं
तपासतो ऑर्थोपेडिक
सगळ्या अवयवांचा एकेक स्पेशालिस्ट
आम्हाला दमवतो आयुष्यभर
आणि तू चष्म्याशिवाय कॉन्टॅक्ट
ठेवून आहेस विश्वभर
भक्तीच्या महापुरानं कधी
गढूळ झालं नाही पंढरपूर
कुठल्याही त्सुनामीनं कोलमडून पडली नाही
तुझी चंद्रभागा
लाखोंचा जयघोष होऊनही
मोडली नाही डेसीबल मर्यादा
अबीर बुक्क्यानंही पावन व्हावं
असं कोणतं सत्त्व दडवून ठेवलंस
अभंगाच्या पावलात?
च्यवनप्राशचे चमचे अडखळतात
आमच्या घशात
योगाचे रोगाचे दैनंदिन क्लासेस
इकडे जोरात
मणक्यातला गॅप भरता भरता उलटून जाते साठी
फेशियलनं दाबून ठेवलेलं
सुरकुत्यांचं शेतही उघडं पडतं
इन्फेक्शनच्या भीतीनं आमचे थरथरते नाक
गर्दिनंच गुदमरतो ऑक्सिजनचा जीव
आणि तिकडे तू
कुठल्याही मास्कशिवाय बेफिकीर, निर्विकार
विठ्ठला... कुठली संजीवनी
पसरलीय तुझ्या देहात?
*****************************************************************************
हे दान अमृताचे
मनोहर मंडवाले, कल्याण
कुठं दडी मारलीस रे तू दर्याच्या लेकरा
तुझ्या भरल्या मेघांची वारी बरसू दे सरारा
टपटप तुझ्या पागोळ्यांची लय कानी पडू दे
धडधडधडधड तडतडतडतड ताशा वाजू दे
आया-बाया आता तुला नाही म्हणणार वांझोटा
तू तर सखा दुबळ्यांचा धनी भाकरीचा
तूच जलगंगेचं तीर्थ कष्टकऱ्यांच्या घामातलं
तूच गाणं तूच संगीत चराचरांच्या जगण्यातलं
प्रकाशाची वाट आमची होऊ लागलीये धूसर
इवल्या चोचीतले बोल आभाळी घुमू दे निरंतर
राधेचे पैंजण लेवून ये पाव्यातले सूर होऊन ये
टाळ-मृदुंगाच्या गजरात हरवलेलं तू भान होऊन ये
भक्तीच्या वाटेवर जी थिरकतायेत लाखो पावलं
त्यांचा नाद होऊन ये
तुझ्या थेंबाथेंबातून गर्जू दे तुक्या-नाम्याचा निनाद
नको आम्हा पामरा ओठी शिव्या-शापांचा प्रमाद
तुझ्या अतरंगी छंदात झिंगती देहा-देहाच्या पालख्या
तूच विठू, तूच ज्ञानबा तुजभोवती फेर धरती विश्वाच्या दिंड्या
कनगीच्या बुडा-तडाशी तूच असतो घननिळा
चिरण्याआधीच कांद्यानं पाणी आणलंय डोळा
गारपिटीच्या तडाख्यानं मोडलाय कणा-कणा
कसा गोड लागेल सांग महागला साखरेचा दाणा
गावं झाली टँकरवाडे उरी भेगाळली माय काळी
सुनी अजुनी शेत-शिवारं कोरड्याठाक विहिरी-तळी
रंगू दे खेळ उन्हासंगे नाचू दे वारा पानोपानी
नको देऊ आणि तडे मळभ दाटल्या मनी
तुझ्या काळ्या ढगांची गर्दी अंबरी दिसू दे
बघून भिजल्या राहुट्या चंद्रभागेचे तट हसू दे
तुझ्या वाटेशी लागले डोळे बा अवघ्या सृष्टीचे
पसरली मीही माझी ओंजळ... दे दान अमृताचे!

एकदम कबूल!
सतेज पोटे, गिरगाव-मुंबई
तुझी सवयीने वाट पाहिली.
तुझ्या दरसाल येण्याची सवय लागलेली.
तुझ्या जन्मजात खरेपणावर
आम्हा साऱ्यांचाच पक्का विश्वास!
पण सात जूनच्या तुझ्या;
वाढदिवसालासुद्धा आला नाहीस!
पुढेही येशिल म्हणून;
धीराने वाट पाहिली
पण फिरकला नाहीस!
साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवलेस!
साऱ्यांची मिजास उतरवलीस!
कित्येक वर्षांतून असा रागावतोस म्हणे,
आम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी.
आता आम्हाला क्षमा करणे,
किंवा जिवे मारणे
हे सर्वस्वी तुझ्याच हाती!
होS होSS एकदम कबूल बाबा!
एकदम कबूल!!
तू-तूच एक सरस!
पण... आता तरी राग आवर
आणि अहोरात्र बरस!
***************************************************************************** तुझी सवयीने वाट पाहिली.
तुझ्या दरसाल येण्याची सवय लागलेली.
तुझ्या जन्मजात खरेपणावर
आम्हा साऱ्यांचाच पक्का विश्वास!
पण सात जूनच्या तुझ्या;
वाढदिवसालासुद्धा आला नाहीस!
पुढेही येशिल म्हणून;
धीराने वाट पाहिली
पण फिरकला नाहीस!
साऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवलेस!
साऱ्यांची मिजास उतरवलीस!
कित्येक वर्षांतून असा रागावतोस म्हणे,
आम्हाला शुद्धीवर आणण्यासाठी.
आता आम्हाला क्षमा करणे,
किंवा जिवे मारणे
हे सर्वस्वी तुझ्याच हाती!
होS होSS एकदम कबूल बाबा!
एकदम कबूल!!
तू-तूच एक सरस!
पण... आता तरी राग आवर
आणि अहोरात्र बरस!
तांडा
सांस्कृतीकतेचाच कळप हा, कळपा-कळपाने तांडा होत जातो! कसा?
तांड्यातील प्रत्येक संस्कृतीविर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
प्राप्त केलेला असतो आणि पी.एच.डी साठी तांड्यात सांस्कृतीक सहकाराची धडपड
सुरू असते.
या तांड्यात अनेक घडामोडी होत असतात, घडामोडी घडविल्या जात असतात. त्यातही सांस्कृतीकतेचेच हित असते.
अज्ञानाने झपाटलेले काही विद्रोही तांड्यातून बाहेर फेकले जातात, त्यांचा
निरोप समारोह तांड्यातील पी.एच.डी प्राप्त संस्कृती रक्षक मोठ्या जल्लोशात
साजरा करतात. अन तांडा पुढे-पुढे चालत जातो.
नेमलेल्या
ठीकाणाहून अनपेक्षीत प्रदक्षीणेसाठी पुढे-पुढे जाणे म्हणजे ज्या ठीकाणाहून
निघालो त्याच ठीकाणी ’नविन कपडे’,’गंध’,’लाली’,’पावडर’ लावुन मध्यांतर
झाल्याची घंटा संपण्यापुर्वी पोहोचने असते या शुल्लक अर्धसत्यास मान्यवर
पुर्ण महत्व देत नसतात. तांड्याची वाटचाल निशंक सुरू असते.
पुढे.. तांड्यातील कळपांचे रंगांच्या सहाय्याने विवीध कप्पे केले जातात,
प्रत्येत कप्प्यातील कळप व्यवस्थीत छोट्या-छोट्या डब्यांत बसवीले जातात.
त्यांच्या निवासाची व भोजनाची व्यवस्था त्यांच्या कप्प्यांच्या रंगाहून
कर्तव्यदक्ष स्वयंसेवक सावकाश करित असतात. तांडा आता पुन्हा प्रवास सुरू
करतो.
तांड्यातील कळपांची संख्या हळू-हळू वाढत जाते.
कालांतराने "कळपाच्या एकात्मतेसाठी" या विषयावर तांड्यातील अनेक
’संस्कृतीवीर’(कार्यकर्ते) पी.एच.डी घेवुन बाहेर पडतात, नविन तांडा सुरू
करतात, नविन कळप एकत्र आणतात.
कळपांची सांस्कृतीक एकात्मता दिवसेंदिवस कार्यक्षम होत जाते.
तांडा पुढे-पुढे चालत जातो, न थांबता अगदि नीशंक पणे.
************************************************************************
भेट
आभाळ भरून आल्यानंतर
एकमेकांना भेटण्याचा संकेत अगदी अलीकडचा.
सर्व ऋतू खुडून तिच्या तळहातावर मी.
नजरेतील व्याकूळ प्रार्थना ती मला नजराणा देते.
संध्याकाळ मंद मंद चुळबुळत राहते
आकाशाभोवती.
बागेतल्या बुटक्या गवतावरून
सरपटत राहतो
मनातला हिरवा साप.
नुसत्या आभाळाकडे पाहून
पावसाचे अनुमान करता येत नाही.
म्हणून तिच्या तळहातावरची आरास
मी विस्कटून टाकतो.
ती आक्रोश करत राहते, मौनातून मौनात.
इथल्या तांबूस संबंधातला पालापाचोळा
झटकत ती उठते आणि
शब्दांचा नजर बंद करून
चालू लागते प्रार्थनेकडे.
आता
चर्चबेल अधिक जोरात
घणघणत राहते
माझ्या निरभ्र मेंदूत.

शहर
पलिकडच्या जंगालातील
माझ्या माध्यावरून भिरभिरणारे चांदणे
येथे विसावते
अन् अचानक हे शहर वसताना मी पाहतो.
(दूर राहिलेल्या जंगलतील झाडांची हलती पाने
मी खुडून घेतली होती मुठी म्हणून बरए!)
शहरांच्या धमन्यातील रक्ताचा मागोवा घेत
मी वाळू हरवलेल्या समुद्रात उतरतो
उन्हे सरपटत राहतात माझ्या खारट शरीरावरून
अन् मी या ओहटलेल्या समुद्रावरुन ओहटत.
माझ्यापुढे आता काही पर्याय आहेत.
पुढे जावे तर सुसाट वारा आकाशाचे तुकडे
माझ्या पाठीवर देईल
मागे तर शहराला भरती यायची वेळ झाली आहे.
पर्याय म्हणून मी शहराकडे पाठ करून
समुद्रावर हलका हलका पसरत जातो.

एका आईची अंतयात्रा…….
आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..
कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..
तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..
मान खाली घालशील
शरमेने..
खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..
किणार्यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..
हे करतांना क्षणभर का होईनात
पण..
आठवेल का रे तुला
माझा खांदा..?
घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..
तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?
सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..
जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..
माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही
- तुझी प्रेमस्वरुप आई
************************************************************************
रेशमीचे बंध
सं.गु पाटील
रेशमीचे बंध, मी छाटून आले
वेदनेची लाट, मी आटून आले
त्या दवाचे थेंब, मी चाटून आले
माझीया डोळ्यात, मी दाटून आले
वेदनेची लाट, मी आटून आले
भोगले जे दु:ख, त्याला सोबतीनेरात सोसूनी, फुलांच्या चिंब नेत्री
वंचनेची साथ, मी थाटून आले
त्या दवाचे थेंब, मी चाटून आले
संपली रात्र, सखा आला तरूनीही तुझी, साधी कहानी ठीक आहे
कापराचे प्रेम, मी वाटून आले
माझीया डोळ्यात, मी दाटून आले
************************************************************************
का तू मला आवडायचास…...
का तू मला आवडायचास….
जर तू माझा नव्हतास………
का माझ्यावर हक्क गाजवायाचास
का माझ्या डोळ्यातील भावना टिपायचास
मी दुखी असताना मला हसवायाचास
मला सुखद स्वप्नांत रंगवायचास
जर तू माझा नव्हतास………
का मला रोज भेटायाचास
का माझ्या इतका जवळ यायचास
माझ्यात पूर्ण रंगून जायचास
माझ्या शब्दाने वेडा व्हायचास
जर तू माझा नव्हतास………
हो एक दिवस साऱ्या जगाला पटेल कि तू माझा नव्हतास
एके दिवशी मीही म्हणेल कि तू माझा नव्हतास
पण खर सांग तुझ्या मनाला तू कसं पटवशील
कि खरंच तू माझा नव्हतास………
राधा

मनात माझ्या रुज्लीस तू,
एकाच क्षणात ह्या नजरेनी
अशी काय जादू माझ्यवर केलीस तू !!!
सूर्य उगवून कधी मावळतो
काहीच आता काळात नाही,
तुला समोर पाहिल्यावर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
प्रत्यक्षात तुला भेटण्या साठी
पहाट होण्याची वाट पाहतो मी,
भेटल्या वरही फक्त
तुलाच पाहत राहतो मी !!!
अशी कशी हि नशा
जी डोळ्यातून माझ्या उतरत नाही,
तुला समोर पाहिल्यवर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
रात्रीच्या अंधारात जेव्हा
एकांतात बसलो असतो मी,
तुझी आठवण आल्यवर
हळूच गालातल्या गालात हसतो मी !!!
इतका प्रेमात कधी तुझ्या पडलो
माझं मलाच काही कळत नाही,
तुला समोर पाहिल्यवर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
----- कौस्तुभ ब्रीद
एक नजर
जेव्हा पासून पाहिलंय तुलामनात माझ्या रुज्लीस तू,
एकाच क्षणात ह्या नजरेनी
अशी काय जादू माझ्यवर केलीस तू !!!
सूर्य उगवून कधी मावळतो
काहीच आता काळात नाही,
तुला समोर पाहिल्यावर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
प्रत्यक्षात तुला भेटण्या साठी
भेटल्या वरही फक्त
तुलाच पाहत राहतो मी !!!
अशी कशी हि नशा
जी डोळ्यातून माझ्या उतरत नाही,
तुला समोर पाहिल्यवर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
रात्रीच्या अंधारात जेव्हा
एकांतात बसलो असतो मी,
तुझी आठवण आल्यवर
हळूच गालातल्या गालात हसतो मी !!!
इतका प्रेमात कधी तुझ्या पडलो
माझं मलाच काही कळत नाही,
तुला समोर पाहिल्यवर
नजर तुझ्यावरून वळत नाही !!!
----- कौस्तुभ ब्रीद
************************************************************************
माझ्या तुझ्या मनाचे...
घे शपथ आपल्या प्रेमाची
दे शपथ आपल्या मनाची
उजळू दे अंतरीची गाथा
शमवू दे मनाची व्यथा
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
तुझ्या नयन ओंजळीत
नसावा आसवांचा थेंब
दुःखी मनाच्या लहरी
शमवील मी किनारी
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
नको तोडशिल कधी
बंध आपल्या मनाचे
मी जगू कसा तुझविन
मी मरू कसा तुझविन
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
- गणेश म. तायडे
खामगांव
बंध रेशमाचे
बंध हे रेशमाचेघे शपथ आपल्या प्रेमाची
दे शपथ आपल्या मनाची
उजळू दे अंतरीची गाथा
शमवू दे मनाची व्यथा
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
तुझ्या नयन ओंजळीत
नसावा आसवांचा थेंब
दुःखी मनाच्या लहरी
शमवील मी किनारी
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
नको तोडशिल कधी
बंध आपल्या मनाचे
मी जगू कसा तुझविन
मी मरू कसा तुझविन
असे हे बंध रेशमाचे
माझ्या तुझ्या मनाचे...
- गणेश म. तायडे
खामगांव
************************************************************************
चुकला नकळत हृदयाचा ठोका
तुझ्या मनीचा ठाव कसा घ्यावा
समजत नव्हतं आहे प्रेम की धोका
तुझ्या इश्काची इंगळी डसताना
माझ हृदय खुदकन हसायच
तुझ्या मनात खरच काय आहे
कधीतरी तू बोलावस मनसोक्त
यासाठीच तळमळायच ग माझ मन
तुझ्याच प्रेमात झुरुन झुरुन
विरुन गेलं ग सारं गगन
भावनांना माझ्या मिळावी सावली
ठेवून होतो ही एकच आशा
तुज प्रेमप्रवाहातच करपल्या भावना
गुज माझ्या अंतरीचे तुला
कधीच नाही ग उमजल
जिंकून सुद्धा हरलो मी तुझ्या प्रेमात
पण तुला कधीच नाही समजल
तुझ्याविना मी कसा जगीन
याचा कधीतरी तू विचार कर
अश्रुंना माझ्या झेल कधी तू
भावनांच तुझ्या खुल दार कर
जे घडायच ते घडून गेल
चुकल असेल काही तर माफ कर
गैरसमजुतीला प्रेमात नको ठाव
तुही आपल मन साफ कर
रुसवे फुगवे तर चालतच राहतात
विश्वास माझा सखे तोडू नको
वाईट वेळ आली कितीही
माझा हात सखे तू सोडू नको
पुन्हा भावनांच भरलय आभाळ
तुलाही अन मलाही माहीत
जाणार एक दिवस आपण खुप दूर
शब्दही कमी पडतात भावना मांडायला
शेवटी एकच कर तू जाता जाता
प्रेम, आठवण, विरह की जीवनभर तुझीच साथ
खरच तू सोडवून जा हा गुंता
सोडवून जा हा गुंता.......
कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
गुंता
** गुंता **
नजरेत तुझ्या काय जाणिले मी
चुकला नकळत हृदयाचा ठोका
तुझ्या मनीचा ठाव कसा घ्यावा
समजत नव्हतं आहे प्रेम की धोका
तुझ्या इश्काची इंगळी डसताना
माझ हृदय खुदकन हसायच
तुझ्या मनात खरच काय आहे
मजला कधीच नाही ग समजायच
कधीतरी तू बोलावस मनसोक्त
यासाठीच तळमळायच ग माझ मन
तुझ्याच प्रेमात झुरुन झुरुन
विरुन गेलं ग सारं गगन
भावनांना माझ्या मिळावी सावली
ठेवून होतो ही एकच आशा
तुज प्रेमप्रवाहातच करपल्या भावना
अन पदरी पडली तिच निराशा
गुज माझ्या अंतरीचे तुला
कधीच नाही ग उमजल
जिंकून सुद्धा हरलो मी तुझ्या प्रेमात
पण तुला कधीच नाही समजल
तुझ्याविना मी कसा जगीन
याचा कधीतरी तू विचार कर
अश्रुंना माझ्या झेल कधी तू
भावनांच तुझ्या खुल दार कर
जे घडायच ते घडून गेल
चुकल असेल काही तर माफ कर
गैरसमजुतीला प्रेमात नको ठाव
तुही आपल मन साफ कर
रुसवे फुगवे तर चालतच राहतात
विश्वास माझा सखे तोडू नको
वाईट वेळ आली कितीही
माझा हात सखे तू सोडू नको
पुन्हा भावनांच भरलय आभाळ
तरीही गातो मी विरहाचेच सूर
तुलाही अन मलाही माहीत
जाणार एक दिवस आपण खुप दूर
शब्दही कमी पडतात भावना मांडायला
शेवटी एकच कर तू जाता जाता
प्रेम, आठवण, विरह की जीवनभर तुझीच साथ
खरच तू सोडवून जा हा गुंता
सोडवून जा हा गुंता.......
कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
************************************************************************
डोयांनी बोलणारी, पाहून घोड हसणारी...ती
न बोलता माज्या, मनातले समजणारी...ती
इवल्याश्या मनात, खूप सारे प्रेम ठेवणारी...ती
दुखावल्यास टचकन, डोळे ओले करणारी...ती
स्वताला त्रास झाला तरी, सुख देणारी...ती
चुकी नसली तरी, समजून घेणारी...ती
परस्तीतीला सामोरी जावून, मुथोड जाब देणारी...ती
माज्या सारख्या दगडाला, देव मानणारी...ती
आशी जिवापार जीव लावणारी ती माजी...जीवसखी
- सागर आबनावे
जीवसखी
उनात सावली असणारी, चार चोगात लाजणारी...तीडोयांनी बोलणारी, पाहून घोड हसणारी...ती
न बोलता माज्या, मनातले समजणारी...ती
इवल्याश्या मनात, खूप सारे प्रेम ठेवणारी...ती
दुखावल्यास टचकन, डोळे ओले करणारी...ती
स्वताला त्रास झाला तरी, सुख देणारी...ती
चुकी नसली तरी, समजून घेणारी...ती
काही होताच, दाहून येणारी...ती
परस्तीतीला सामोरी जावून, मुथोड जाब देणारी...ती
माज्या सारख्या दगडाला, देव मानणारी...ती
आशी जिवापार जीव लावणारी ती माजी...जीवसखी
- सागर आबनावे
************************************************************************
कवी - वैभव यशवंत जाधव
पहिल्या भेटीत होतं प्रेम..
प्रेमात वाटतात पापण्यांचं खरं
मित्रांच खरं
प्रत्येक स्वप्न वाटतं खरं..!!
प्रियेला प्रेम व्यक्त करण्यास
नाही होतं हिम्मत
आज बोलायचं म्हणुनी
ठेवतो मनात
मी पण आहे का तिच्या मनात ?
असा प्रश्न पडतो माझ्या मनात
नजरेस नजर भिडली
पाहुनी मला ती गाली हसली
मग वेळच कसली
सांगुन टाकलं एका शब्दात
"तू खुप आवडतेस मला
मी पण आवडतो का तुला
ए,माझ्या गुलाबाच्या फुला
आता सांगशील का उत्तर मला"
पडला विचार मनात.....
जर नाही म्हणाली तर
ठेच पोहचेल माझ्या काळजात
अगं प्रिये सांगशील का मला तू
काय आहे तुझ्या मनात
काही असेल तर म्हण तू
एकाच शब्दात
प्रेम व्यक्त करताना वाटली भीती
विचार करा कशी झाली असेल माझी स्थिती
सांगायचं होतं मनात भरपूर तरी किती
पण नाही केली मी अती
नाहीतर झाली असती ना माझी माती......!!
प्रेम व्यक्त....!!!
कवितेचे नाव - " प्रेम व्यक्त "कवी - वैभव यशवंत जाधव

अंधार दाटला आहे जरी मनात
तरी एक आशेचा किरण जगतो आहे
जरी ती नाही म्हणाली
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....
रस्ता जरी अनोळखी
तरी तिच्याच पाऊलखूणा शोधत मी चालतो आहे
तिच्यासाठी शुन्य जरी मी
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....
हातात तिच्या दुसऱ्याचा हात मला दिसतो आहे
तरी अजुनही मी तिच्याच विचारात व्यस्त आहे
कदाचित प्रम हे एकदाच होते हे ञिकालाबाधित सत्य आहे
आशा धुसर जरी......
तरी तिची वाट माञ बघतो आहे.....
प्रेम कविता
तरी तिची वाट माञ............अंधार दाटला आहे जरी मनात
तरी एक आशेचा किरण जगतो आहे
जरी ती नाही म्हणाली
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....
रस्ता जरी अनोळखी
तरी तिच्याच पाऊलखूणा शोधत मी चालतो आहे
तिच्यासाठी शुन्य जरी मी
तरी तिची वाट माञ मी बघतो आहे.....
हातात तिच्या दुसऱ्याचा हात मला दिसतो आहे
तरी अजुनही मी तिच्याच विचारात व्यस्त आहे
कदाचित प्रम हे एकदाच होते हे ञिकालाबाधित सत्य आहे
आशा धुसर जरी......
तरी तिची वाट माञ बघतो आहे.....
************************************************************************
माझ्या ढगांच्या पल्याड
भिजले अंगण
आल्या पावसाच्या सरी
आठवण तिची
पाणी डोळ्यांच्या कपारी
साठवण माझी
स्वप्नातली परी
हरवलेली बाहुली
माझी मलाच ती बरी
पावसाची नजाकत
काहुर जशी इथे
पोहाचावा ओलावा
मन तिचे रिते
माझ्या ढगांच्या पल्याड
तिचे सुकलेले शेत
तिची अन् माझी गुज
वा-याच्या भरोश्यात
तिची अन् माझी गुज
वा-याच्या भरोश्यात
आल्या पावसाच्या सरी
आठवण तिची
पाणी डोळ्यांच्या कपारी
साठवण माझी
स्वप्नातली परी
हरवलेली बाहुली
माझी मलाच ती बरी
पावसाची नजाकत
काहुर जशी इथे
पोहाचावा ओलावा
मन तिचे रिते
माझ्या ढगांच्या पल्याड
तिचे सुकलेले शेत
तिची अन् माझी गुज
वा-याच्या भरोश्यात
तिची अन् माझी गुज
वा-याच्या भरोश्यात
0 comments:
Post a Comment