शेततळ्यामधील मत्स्यसंवर्धनासाठी आवश्‍यक बाबी* 🐠

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

🐠 *शेततळ्यामधील मत्स्यसंवर्धनासाठी आवश्‍यक बाबी* 🐠

शेततळ्यातील माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात मिळविण्यासाठी सुधारित मत्स्यसंवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. तळ्यामध्ये माशांसाठी चांगली खाद्यनिर्मिती होण्यासाठी खतांचा वापर, पूरक खाद्य व्यवस्थापन आणि माशांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.

_*उमेश सूर्यवंशी*_

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

शेततळ्यामध्ये प्रामुख्याने रोहू, कटला, मृगळ, देशी मागूर, मरळ, तीलापिया, पंकज इ. माशांचे संवर्धन केले जाते.

- तलावामध्ये मत्स्यबीज सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उशिरा सोडावे.
- तळ्यातील संवर्धनयुक्त मासे जसे की कटला, रोहू, मृगळ, कोंबडा, चंदेरा, गवत्या यांचा संवर्धन कालावधी सर्वसाधारणपणे एका वर्षाचा असतो.
- देशी मागूर या जातीच्या माशांचा संवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा असतो.
- मरळ, पंकज, तिलापिया या जातीच्या माशांच्या विक्रीयोग्य वाढीचा सर्वसाधारण कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असतो.
- मत्स्यसंवर्धन करताना योग्य जागेची निवड करणे आवश्‍यक असते.

🐟 *मत्स्यबीजापेक्षा मत्स्य बोटुकली फायदेशीर* 🐟

- मत्स्यबीजापेक्षा तळ्यामध्ये मत्स्य बोटुकली सोडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
- बोटुकलीचा आकार मोठा असल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी कालावधी कमी लागतो.
- मत्स्य बोटुकली इतर भक्षक माशांना कमी प्रमाणात बळी पडतात.
- मरतुकीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तळ्यातील उत्पादनवाढीस मदत मिळते.
- मत्स्य बोटुकली आकाराने मोठ्या असल्यामुळे बोटुकली नेमक्‍या हव्या त्याच प्रजातीच्या आहेत किंवा नाही हे ओळखणे सोपे जाते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्‍यता कमी असते.
- बोटुकली संवर्धन केल्यानंतर मासे जातीप्रमाणे साधारण ८ ते १० महिन्यांत विक्री योग्य होतात, त्यामुळे तळ्यात बारमाही पाणी असणे गरजेचे नसते.
- आकार मोठा असल्यामुळे बोटुकली कृत्रिम खाद्यास चांगला प्रतिसाद देतात.
- साधारणपणे तळ्यामध्ये संवर्धनासाठी बोटुकलीचा आकार ५० ते १०० मि.मी. एवढा असावा.
- तळ्यामध्ये बोटुकलीची संचयन घनता योग्य असावी. जास्त संख्येमुळे माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतात.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

🐬 *तळ्याचे व्यवस्थापन* 🐬

- तळ्यामध्ये मत्स्यबीज संवर्धनापूर्वी चुना मारून घ्यावा. चुन्यामुळे तलावाच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्लाचा निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते.
- तळ्यातील पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ योग्य प्रमाणात होते, तसेच मत्स्य बीजामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी होते.
- एक हेक्‍टर क्षेत्राला २५० किलो या प्रमाणात तळभागावर चुना मारून घ्यावा किंवा चुना तळ्याच्या पाण्यात मिसळावा.शेततळ्यात हेक्‍टरी १००० किलो शेणखत, युरिया हेक्‍टरी ५० किलो, फॉस्फेट हेक्‍टरी ५० किलो या प्रमाणात खते वापरावीत.
- संवर्धन तलावात एकाच वेळी दोन ते तीन खते वापरली जाऊ शकतात.
- मत्स्यसंवर्धन करताना तलावातील पाण्याच्या रंगाबाबत माहिती असणे आवश्‍यक बाब आहे. तलावातील पाणी स्वच्छ असू नये. संवर्धन तलावात जमिनीचा तळ दिसत असेल तर माशांच्या आहारातील मुख्य घटक असलेल्या प्लवंगाची उत्पत्ती पाण्यात कमी आहे असे समजावे. मातीसारखा किंवा चहासारखा रंग पाण्यातील मातीच्या सूक्ष्म कणांची उपस्थिती दर्शवितो, जे मत्स्यसंवर्धनासाठी पोषक नसते. पाण्याचा हिरवा रंग वनस्पती प्लवंग दर्शवितो. पाण्याचा बदामी किंवा तपकिरी रंग प्राणी प्लवंग दर्शवितो अशा पाण्यात माशांची वाढ जलद गतीने होते.
- मत्स्य तळ्यात सुरवातीला क्षेत्रफळानुसार खते वापरून झाल्यानंतर पाण्यामध्ये वनस्पती व प्राणी प्लवंग तयार व्हायला सुरवात होते. खते मारून झाल्यानंतर सुरवातीला सर्वसाधारणपणे १५ दिवसांनंतर तळ्यात बोटुकली सोडावीत.
- माशांच्या योग्य वाढीसाठी मत्स्यसंवर्धन तलावात प्राणवायूचे प्रमाण ५ ते १० मिलिग्रॅम/ लिटर एवढे असावे.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

🦈 *खाद्य व्यवस्थापन* 🦈

- माशांना जेवढे खाद्य खायला लागेल, तेवढेच खाद्य पुरवावे. अतिखाद्य अथवा कमी खाद्य माशांना पुरविल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात.
- पूरक खाद्याचे प्रमाण तलावातील माशांचे एकूण वजन व त्यांच्या वाढीच्या अवस्था यावर अवलंबून असते.
- कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प माशांना खाद्य म्हणून सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड द्यावी. इतर माशांचे खाद्य जाती- जातीप्रमाणे त्यांच्या खाद्य खाण्याच्या सवयीनुसार वेगवेगळे असते.
- खाद्य देण्यासाठी तलावामध्ये बांबू रोवून त्या बांबूला प्लॅस्टिकच्या पिशवीला छिद्र पाडून त्यामध्ये आवश्‍यक तेवढे खाद्य भरावे, जेणेकरून मासे पाहिजे तेवढे खाद्य खातील. त्यामुळे होणारे प्रदूषण देखील टाळता येते.

🐳 *माशांच्या संरक्षणासाठी उपाययोजना* 🐳

- पक्ष्यांपासून माशांचे संरक्षण करण्यासाठी तळ्याच्या वर पक्षिप्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे.
- माशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी फिश डिसीज डायग्नॉसिस किट उपलब्ध आहेत. हे किट तळ्यावर ठेवून मशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
- मत्स्यबीज खरेदी करतेवेळी बीज रोगमुक्त असणे आवश्‍यक असते, त्यावर पुढील मत्स्यशेती व्यवस्थापन बरेच अवलंबून असते.
- माशांच्या योग्य वाढीसाठी संवर्धन कालावधीत मधून- मधून तळ्यात जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त खाद्य घटक सोडावेत.
- संहारक आणि मत्स्य भक्षक माशांच्या निर्मूलनासाठी तळ्यात वारंवार जाळी फिरवून स्थानिक व संहारक जातीचे मासे काढून टाकावेत.
- नवीन पाणी तळ्यात घेताना तलावाच्या आतल्या बाजूला बारीक जाळी बसवावी. काही रसायनांचा वापर करून देखील संहारक आणि मत्स्य भक्षक माश्‍यांचे निर्मूलन करता येते.

📲 *अधिक माहितीकरिता संपर्क -*
*उमेश सूर्यवंशी*,
९०९६९००४८९
(मत्स्यविज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर)

📚 *स्ञोत-* ॲग्रोवन

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​*
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

*​​टेलेग्राम चॅनेल-​​*
https://t.me/krushisamarpan

🎖 *अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_

शेणखत वापर

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

💈 *शेणखत वापर* 💈

पीक कोणतेही असो कृषि विद्यापीठ, संधोधन केंद्रे शेणखत वापरण्याची शिफारस हमखास करतात. तरी शेनखत वापराचे प्रमाण खूप कमी शेतकर्यांमधे आढळते. इथे विनंती करतो कृपया प्रत्येकानी शेनखताचा वापर करावाच.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1973925599524975

💈 *शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी* 💈

1) लहान क्षेत्र असलेले शेतकरी शेतातील उकिरड्यात, खड्ड्यात वर्षभर साठवलेले शेण हे खत म्हणून शेतात मिसळतात. असे शेण चांगले कुजलेले असावे. अशा शेणामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या अळी अवस्था आढळतात. ज्यास बरेचसे शेतकरी "शेणकिडे' म्हणून संबोधतात. अशा विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात.
2) भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
3) उन्हाळ्याच्या दिवसांत चाऱ्याची कमतरता असताना शेतकरी मोकळ्या शेतात जनावरे चरण्यास सोडतात. त्यांचे शेण शेतात विखुरलेल्या स्वरूपात पडते.
4) मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.
5) काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात.
6) बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. त्या ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतास जैविक प्रक्रिया करून घेणे आवश्‍यक ठरते.
तेंव्हा शेणखत वापरा पण काळजीही घ्या.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1973925599524975

💈 *शेणखताचे महत्व* 💈

1) शेणखतामधून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेत फारच अत्यल्प असते, परंतु सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ऍझोटोबॅक्‍टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जिवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.
2) जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
3) शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात.
4) जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्‍टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.
5) जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्‍वसन वाढून मुळांद्वारे संश्‍लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते. पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.
6) पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहन चांगल्याप्रकारे होते.
7) जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो. इत्यादी.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1973925599524975

💈 *शेणखताचा वापर करताना* 💈

1) जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्‍टरी पाच ते 10 टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी 10-15 टन शेणखत मिसळावे.
2) भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणे पेरावे.
3) चांगल्या कुजलेल्या शेणखताचे लहान-लहान ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांसारखी जैविक कीडनाशके आणि जैविक खते 15 दिवसांपर्यंत मिसळून ठेवल्यास अशा जैविक घटकांची वाढ झपाट्याने होते. नंतर असे सर्व ढीग एकत्र करून भाजीपाला पिके, फळबागेत मिसळल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात. शेणखताचा उत्तम माध्यम म्हणून जैविक घटकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेता येईल.
4) टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्‍टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा इ.सह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1973925599524975

💈 *शेणखतावर करता येणाऱ्या प्रक्रिया* 💈

1) शेणखत शेतात मिसळताना चांगले कुजलेले असावे. शेणखत पूर्णपणे कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चरचा वापर करावा. कंपोस्ट कल्चरचा वापर करताना एक टन शेणखतासाठी एक किलो किंवा एक लिटर कल्चर पुरेसे ठरते.
2) शेणखतातून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लुरोसन्स या जैविक घटकांचा वापर शेणखड्ड्यात करावा. शेणकिड्यांच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम ऍनिसोप्ली, बिव्हेरिया बॅसियाना यांसारख्या जैविक कीडनाशकांचा वापर करावा.
3) म्हशी, गाईंच्या गोठ्यात बाहेरून आणल्या जाणाऱ्या शेणात काहीवेळा प्लॅस्टिकच्या छोट्या बाटल्या, इंजेक्‍शन सिरींज - सुया, जनावरांच्या लसीकरणानंतरचे टाकाऊ पदार्थ, काच, कृत्रिम रेतन केल्यानंतर टाकण्यात येणारे प्लॅस्टिकचे हातमोजे, नळ्या काहीवेळा दिसून येतात. असे घटक शेतात आल्यास त्यापासून प्रदूषण वाढते. त्यामुळे या गोष्टी निवडून मगच शेतात खत टाकावे.
4) भाजीपाला पिकात अर्धवट कुजलेले शेणखत जमिनीत मिसळल्यास त्या ठिकाणी शेण कुजताना उष्णता निर्माण होते. त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या संख्येवर, गांडुळांवर तसेच मुळांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताजे शेण, अर्धवट कुजलेल्या शेणाऐवजी ते चांगले कुजवून मगच जमिनीत मिसळावे.
6) गोठ्यातील शेण, शेतातील कचरा, जनावरांच्या गोठ्यातील काडी-कचरा सेंद्रिय पदार्थांचा वापर करून सुधारित पद्धतीने कंपोस्टिंग करून शेतात मिसळल्यास अधिक चांगले ठरते. असे शक्‍य न झाल्यास गोठ्यातील शेण मोकळ्या जागेत साठवून त्यावर पाणी टाकून, कंपोस्ट कल्चरचा वापर करून चांगले कुजवून घ्यावे. नंतर असे चांगले कुजलेले खत शेतात टाकावे.
7) फळबागेत शेणखत मिसळताना खड्डा खणून नंतर मातीने बुजवून टाकावे. मातीच्या संपर्कात आल्यामुळे सेंद्रिय पदार्थ लवकर कुजतात. शक्‍य झाल्यास अशा शेणापासून गांडूळ खत तयार करून मग बागेत टाकावे. त्यामुळे जास्त फायदा मिळेल.
8) शेळ्या-मेंढ्यांचे लेंडी खत टाकताना अशा खतातून शेतात बाभळीसारख्या वनस्पतींच्या बियांचा प्रसार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेळ्या-मेंढ्या चरताना बाभळीच्या शेंगा खातात. त्यामुळे बाभळीच्या बिया त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर टाकल्या जातात. अशा कळपातील लेंडीखत बागेत टाकल्यास शेतात बाभळीचे झाडे पुढील पाच ते सहा वर्षांपर्यंत उगवत राहतात. त्यामुळे त्याचा त्रास येणाऱ्या हंगामात वर्षानुवर्षे होतो.
9) काही शेतकरी म्हशींच्या तबेल्यातील पातळ शेणखत शेतात तसेच मिसळतात. परंतु अशा खतात ओलाव्याचे प्रमाण खूपच जास्त असते. त्यामुळे असे शेणखत मिसळल्यानंतर त्यापासून मिळणारे शुष्क सेंद्रिय पदार्थ अतिशय कमी असतात.
10) गावाच्या बाहेर प्रत्येक घरांचे शेण टाकण्याचे ठराविक उकिरडे असतात. यामध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात अशा ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे असे शेणखत शेतात वापरताना योग्य ती काळजी घ्यावी.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1973925599524975

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*अजूनही आपल्या समूहामध्ये समाविष्ट न झालेल्या शेतिरसिक शेतकरयांनी आजच समूहामध्ये सामिल व्हावे*... *अगोदरच समूह सदस्य असणारया सहकारयांनी कमीत कमी 50 शेतीरसिक शेतकरी आपल्या समूहामध्ये सामिल करावेत...*

*आपल्या समूहाच्या ​​फेसबूक समूहाचा दुवा...​​*👇🏻
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*'कृषिसमर्पण​' समूहाच्या व्हाटस् ॲप समूहामध्ये सामिल होण्याकरिता आपले संपूर्ण नाव, जिल्हा, एकूण जमिन व प्रमुख पिके इत्यादी माहीती ​9665436776, 9970773717 व 9404082640​ यापैकी एका नंबरवर पाठवावी*... अर्धवट माहिती असल्यास आपल्याला सामिल करुन घेणे शक्य होणार नाही...

*​​टेलेग्राम चॅनेल-​​*
https://t.me/krushisamarpan

*​​ब्लॉग-​​*
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_

*महत्त्वाच्या विद्राव्य खतांचे कार्य...*

*महत्त्वाच्या विद्राव्य खतांचे कार्य...*

*१९:१९:१९, २०:२०:२० -*
या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो.

*१२:६१:० -*
या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये अमोनिकल स्वरूपातील नत्र कमी असतो.तर पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते.नवीन मुळांच्या तसेच जोमदार शाकीय वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरुत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

*०:५२:३४ -*
या खतास मोनो पोटॅशियम फॉस्फेट म्हणतात.यामध्ये स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्य भरपूर आहेत.फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे.डाळिंब पिकामध्ये फळांच्या योग्य पक्वतेकरिता तसेच सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत वापरले जाते.

*१३:०:४५-*
या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात.यामध्ये नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण अधिक असते.फुलोऱ्यानंतर च्या अवस्थेत व पक्व अवस्थेत या खताची आवश्यकता असते.अन्ननिर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे.या खतामुळे अवर्षण स्थितीत पिके तग धरू शकतात.

*  ०:०:५०+१८ -*
या खतास पोटॅशियम सल्फेट म्हणतात.पालाश बरोबरच या खतामध्ये उपलब्ध स्वरूपातील गंधक ही असतो.पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते.हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचेही नियंत्रण होऊ शकते.या खतामुळे पीक अवर्षण स्थितीत तग धरू शकते.

*१३:४०:१३ -*
पात्या ,फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबते.व अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

*कॅल्शियम नायट्रेट -​*
मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरुवातीच्या काळात व शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

*​२४:२४:० -​*
यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे.शाकीय वाढीच्या तसेच फूलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

जगण्याची व्याख्या नक्की वाचा...

फर्स्ट क्लास मिळवूनही
ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही,
ज्यांना एससी आणि एसटी यातला फरक स्पष्ट करता येत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे
मला भयानक आवडतात कारण.......
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात

गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात..
"पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."

थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही ....
   मला आवडलेला *अप्रतिम लेख*
😘✌

भारतीय परंपरा; शास्त्रीय कारणे

👉 _*भारतीय परंपरा; शास्त्रीय कारणे*_

भारतीय संस्कृती, परंपरा आणि रितीरिवाज यांचा अभ्यास करण्यासाठी आजही कित्येक पाश्चात्य लोक भारतात येत असतात. त्याच कारणंही तसंच आहे. भारतीय संस्कृती, परंपरा व रितीरिवाज या जरी पिढ्यान् पिढ्या चालत असल्या तरी त्यामागे काही लॉजिक, शास्त्रीय कारण आहेत. आज त्याबाबत जाणून घेऊयात..

1) _*बांगड्या*_ : बांगड्या घालायची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे. बांगड्या हा केवळ सौंदर्य खुलविणारा अलंकार नाही, तर बांगड्या घालण्यामागे देखील विज्ञान आहे. हातामध्ये बांगड्या घातल्यानंतर हाताच्या हालचाली बरोबर बांगड्या देखील हलत असतात. बांगड्यांच्या हलण्यामुळे झालेल्या घर्षणाने रक्ताभिसरण चांगले राहते. तसेच धातूच्या बांगड्या घातल्याने शरीरातून बाहेर दिली जाणारी उर्जा या धातूमध्ये सामावून पुन्हा शरीरात पाठविली जाते.

2) _*सिंदूर*_ :  सुवासिनी स्त्रिया भांगामध्ये सिंदूर लावतात. ही सौभाग्याची निशाणी आहे हे तर खरेच, पण त्याच बरोबर सिंदूरमध्ये अतिशय कमी प्रमाणात पाऱ्याचा वापर केलेला असतो. पाऱ्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊन मेंदू सतर्क राहतो. पाऱ्यामुळे रक्तदाब ही नियंत्रित राहतो.

3) _*पाण्यात नाणी टाकण्याची पद्धत*_ :  आपल्याकडे नदीमध्ये, विहिरीमध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये पैसा टाकण्याची पद्धत आहे. हा एक प्रार्थनेचा भाग आहे.  हा विचार जरी योग्य असला, तरी त्यामागे देखील शास्त्रीय कारण आहे. पूर्वीच्या काळी पिण्याचे पाणी नदीवरून, किंवा विहिरीतूनच भरून आणले जायचे. त्या काळी नाणी तांब्याची असत. ही नाणी पाण्यात टाकून ठेऊन ते पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले तांबे पाण्यामार्गे पोटात जात असे.

4) _*नमस्कार*_ :  नमस्कार मुद्रेमध्ये आपले दोन्ही हात जुळलेले असतात. या दोन्ही हातांवर असलेले डोळे, कान, आणि मेंदूचे प्रेशर पॉइंट्स हात जोडल्याने दाबले जातात आणि डोळे, कान आणि मेंदूच्या कार्याला अधिक चालना मिळते. तसेच पूर्वीच्या काळी लोक सकाळी सूर्योदयाच्या वेळी स्नान झाल्यानंतर लगेचच ओलेत्यानेच तुळशीची पूजा करीत असत, किंवा सूर्याला अर्घ्य देत असत.

काही ठिकाणी आजही पद्धत आहे. या पद्धतीचा फायदा असा, की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये ’ड’ जीवनसत्वाची मात्रा भरपूर असे. त्यामुळे सूर्याला अर्घ्य देताना किंवा तुळशीची पूजा करताना शरीराला आवश्यक असलेले ’ड’ जीवनसत्व आपोआपच मुबलक मात्रेमध्ये मिळत असे.

5) _*जोडवी*_ :  लग्नानंतर बायकांनी जोडवी घालण्याची पद्धत आहे. जोडवी पायांच्या दुसऱ्या, म्हणजेच अंगठ्याच्या शेजारच्या बोटांमध्ये घातली जातात. वैज्ञानिकांच्या मते, या बोटातील नस स्त्रीच्या गर्भाशयाशी जोडलेली असते. पायांच्या दुसऱ्या बोटामध्ये जोडवे घातल्याने गर्भाशयाला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होऊन गर्भाशय निरोगी राहते. तसेच जोडवी धातूची बनलेली असल्याने जमिनीतील उर्जा शोषून शरीरामध्ये पाठविण्याचे काम ही जोडाव्याद्वारे केले जाते.

6) _*उपवास*_ : आपल्याकडे विविध कारणास्तव उपवास करण्याची पद्धत आहे. नेहमी आपण सर्व प्रकारचे पदार्थ खात असतो. पण उपवासाच्या निमित्ताने शरीरातील पचनशक्ती सुधारून शरीरातील घातक द्रव्ये बाहेर टाकली जात असत.