तुम्हाला माहीत आहे?? *अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…*

*अरुणाचल प्रदेशात समुद्र सपाटीपासुन साडे तेरा हजार फुट उंचावर असणाऱ्या शिवस्मारक आणि छत्रपती शिवाजी मार्ग याची कथा…*

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे ३ जुन २००९ रोजी राज्यपाल जे.जे.सिंग यांच्या हस्ते  *अश्वारुढ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक* उद्घाटन करण्यात आले. तसेच  *तवांग ते बुम्ला या २२ किमी मार्गाला छत्रपती शिवाजी मार्ग* असे नावही देण्यात आले. तवांगमधल्या स्मारकातील शिवछत्रपतींची नजर चीनच्या दिशेने आहे. म्हणजेच राजे आपल्या करड्या नजरेतुन शत्रुकडे लक्ष ठेऊन आहेत.
कर्नल संभाजी पाटील निवृत्तीनंतर आपले सामाजिक जीवन एका सैनिकाप्रमाणे निष्ठेने जगत होते. २००९ मध्ये त्यांना एक फोन आला
*“जय हिंद सर, दोरजी खांडु बोल रहा हुँ सर…”*

कर्नल साहेब एकदम २५ वर्षं मागे गेले. त्यांना आठवला तो अरुणाचल प्रदेश आणि तिथला सकाळी सूर्याच्या किरणांनी सोनेरी होणारा हिमालय. कर्नल संभाजी पाटील हे १९८३-८४ मध्ये  *२२ मराठा लाईट इंफंट्री युनिटचे कमांडर* म्हणुन कार्यरत होते. त्यावेळी तवांग ते बुम्ला हा रस्ता तयार करण्याची कामगिरी त्यांनी पार पडली.
हा रस्ता म्हणजे भारत-चीन सीमेकडे जाणारा एक मोठा दुवा आहे.  *संरक्षणदृष्ट्या या रस्त्याचे महत्त्व खुप महत्व आहे.* सीमेवरील सैनिकांना जलद रसद पुरवण्यासाठी हा खास रस्ता बांधण्यात आला होता. मराठा लाईट इंफंट्रीच्या २००० जवानांनी उणे ३०℃ तापमानात काम करुन केवळ पाच महिन्यात हा बावीस किमीचा मार्ग तयार करुन दाखवला.
समुद्र सपाटी पासुन तब्बल १२४०० फुट उंचीवर असणारा अरुणाचल प्रदेशातील हा अतिशय दुर्गम असा भाग. अशा भागात काम करणे खुपच अवघड. रस्ता बांधण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेणे खुपच आवश्यक होते. या सगळ्या कामात कर्नल संभाजी पाटलांची ओळख *दोरजी खांडु* या तवांग भागातील एका उत्साही युवा नेतृत्वासोबत झाली. पुढे त्यांच्यात चांगली मैत्री झाली.

*दोरजी खांडु*  नित्यनेमाने मराठा लाईट इंफंट्री युनिटला भेट देत असत व युनिटला काही मदत लागल्यास ती गावातील लोकांच्या मदतीने करत असत. या काळातच त्यांना मराठा लाईट इंफंट्रीच्या बेळगाव येथील मुख्यालयात खास प्रशिक्षणासाठी सुद्धा पाठवण्यात आले होते. दोरजी खांडु व मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांमध्ये एक खुप चांगले नाते निर्माण झाले होते. *हेच खांडु नंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.*
मराठा लाईट इंफंट्री युनिटने बांधलेला हा २२ किलोमीटरचा रस्ता म्हणजे तवांग भागातील अरुणाचली बांधव आणि २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांचे देशासाठी दिलेले खुप मोठे योगदान होते. हा रस्ता केवळ कर्नल संभाजी पाटील व दोरजी खांडु यांच्या मैत्रीचेच प्रतिक नाही, तर पश्चिमेकडील मराठी आणि अतिपुर्वेकडील अरुणाचली नागरिकांच्या मैत्रीचेही ते प्रतिक आहे.
दोरजी खांडु यांनी या रस्त्याचे काम पुर्ण झाल्यानंतर स्थानिक अरुणाचली बांधवांच्या वतीने २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसाठी एका मेजवानीचे आयोजन केले होते. इंफंट्रीच्या सर्व जवानांचा त्यात गौरव करण्यात आला. त्यावेळी त्यांनी काही रोख रक्कम बक्षीस म्हणुन २२ मराठा लाईट इंफंट्री युनिटसाठी देऊ केली. परंतु इंफंट्रीच्या सर्व जवानांनी ती रक्कम साभार परत केली आणि अरुणाचली बांधवांना विनंती केली की “हा रस्ता महाराष्ट्र-अरुणाचल मधील बांधवांच्या मैत्रीचे प्रतीक आहे. या रस्त्याला तमाम महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे. तसेच या रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची दोन स्मारके उभी करावीत. त्यातले एक तवांग युद्ध स्मारकाजवळ व दुसरे या रस्त्यातील एखाद्या महत्वाच्या ठिकाणी असावे.”
दोरजी खांडु आणि स्थानिक अरुणाचली बांधवांनी कसलाही वेळ न लावता तात्काळ ही मागणी मान्य केली. मराठा लाईट इंफंट्रीने निर्माण केलेला तवांग-बुम्ला रस्ता आज छत्रपती शिवाजी मार्ग या नावाने ओळखला जातो. पुढे दोन महिन्यातच अरुणाचल बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे एक अर्धाकृती स्मारक तवांग-बुम्ला रस्त्यावरील एका महत्वाच्या जागी उभे केले. तसेच तवांग येथे छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा ही उभा केला.
*शिवछत्रपतींच्या शिल्पाच्या अर्पण समारंभात २२ मराठा लाईट इंफंट्रीच्या सर्व जवानांसोबत दोरजी खांडु यांना मराठा लाईट इंफंट्रीचे स्फुर्तीगीत खड्या आवाजात गाताना बघुन अनेकजणांना आश्चर्य वाटले.*

*मर्द आम्ही मराठे खरे, शत्रुला भरे कापरे ।*
*देश रक्षाया, धर्म ताराया,*
*कोण झुंजीत मागे सरे ।। धृ ।।*

*वादळापरी आम्ही पुढेच चालतो,* *जय शिवाजी गर्जुनी रणांत झुंजतो ।*
*मराठा कधी न संगरातुनी हटे,* *मारुनी दहास एक मराठा कटे ।*
*सिंधु ओलांडुनी, धावतो संगिनी, पाय आता न मागे सरे ।।१।।*

*व्हा पुढे अम्हा धनाजी, बाजी सांगती, वीर हो उठा कडाडतात नौबती ।*
*विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पुर्वजापरी आम्ही अजिंक्य संगरी ।*
*घेऊ शत्रुवरी झेप वाघापरी, मृत्यु अम्हा पुढे घाबरे ।।२।।*

*भारता आम्ही तुलाच देव मानतो,*
*हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो ।*
*राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुनी पवित्र ठेवती धरा ।*
*ह्याच मातीवरी प्राण गेला तरी, अमुची वीर गाथा उरे ।।३।।*

*बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की …जय !*

अशा विजयाच्या घोषणांनी तवांग-बुम्ला परिसराचा आसमंत दुमदुमुन गेला.

संदर्भ..
*The Governor of Arunachal Pradesh*

*(Press Release : Governor)*

Love Tips

👉 _*प्रेम फुलवण्यासाठी 'या' गोष्टी टाळा...*_

Love Tips

नाते जोडणे खूप सोपे असते, पण ते टिकवणे तेवढेच कठीण असते. नाते उत्तमरीत्या टिकवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण यावरच कोणत्याही नात्याचा पाया रचलेला असतो. कोणत्या आहेत या गोष्टी यावर एक नजर...

👉 _*आग्रह टाळा*_ : सतत आपल्या जोडीदाराच्या सवयींमध्ये किंवा त्याच्या स्वभावामध्ये चुका काढणे, त्याला कमी लेखणे टाळायला हवे. आपल्या जोडीदाराने आपण म्हणतो तसेच राहायला हवे किंवा वागायला हवे हा आग्रह टाळायला हवा.

👉 _*स्वातंत्र द्या*_ : आपल्या जोडीदाराचे स्वतंत्र व्यक्तिमत्व असून त्याचीही अनेक बाबतीत आपल्यापेक्षा निराळी मते असू शकतात हे समजून घ्या. जर दोघेही आपले विचार एकमेकांवर सतत लादत राहिले, तर त्या विचारांचे ओझे वाटायला लागते.


👉 _*टिंगल टाळा*_ : चारचौघांमध्ये आपल्या जोडीदाराची कोणत्याही कारणाने टिंगल करणे टाळा. असे करून तुम्ही इतरांनाही आपल्या जोडीदाराची टिंगल करण्यास प्रवृत्त करीत असता.

👉 _*सल्ले टाळा*_ : आपला जोडीदार करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले देणे टाळा. त्याने काय खावे, काय प्यावे, कोणते कपडे घालावेत, किती पैसे कसे खर्च करावेत या बाबतीतले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या दोन्ही लोकांना असले पाहिजे.

👉 _*समोरच्याचा विचार करा*_ : प्रत्येक वेळी आपल्या जोडीदाराला बरे वाटावे म्हणून त्याच्या मनाप्रमाणे वागत राहणे आणि आपण सतत त्याग करतो आहोत हे दाखवून देणे ही रिलेशनशिप तुटण्यामागचे कारण आहे. त्यामुळे नात्यामध्ये दोघांच्याही मतांचा, इच्छांचा बरोबरीने विचार व्हायला हवा.

👉 _*दोष देणे टाळा*_ : एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही की त्याचा दोष आपल्या जोडीदाराला देण्याकडे काहींचा कल असतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नसली, तरी त्यामागील कारणांचा शांतपणे विचार करा.

👉 _*तुलना करू नका*_ : आपल्या जोडीदाराची, इतरांच्या जोडीदारांशी तुलना करणे आवर्जून टाळा. रंगरूप, आर्थिक प्राप्ती, वागण्या-बोलण्याच्या सवयी, शिक्षण या बाबतीत आपल्या जोडीदाराची इतरांशी तुलना करून त्याला कमी लेखू नका.

👉 _*संभाषण साधा*_ : सर्व बाबतीत आपल्या जोडीदाराशी संभाषणाचा मार्ग नेहमी मोकळा ठेवा. रिलेशनशिपमध्ये मतभेद होतात, वाद ही होतात. पण अशी कोणतीही अडचण नाही ज्यातून संभाषणाद्वारे मार्ग निघत नाही. त्यामुळे एकमेकांशी संभाषण साधा.

HAPPY NEW YEAR 2018 TO ALL MY READERSSSSSSSSSSSSSSSSS