_*सतत प्रेरणा देणारी पुस्तके*_

👉 _*सतत प्रेरणा देणारी पुस्तके*_

आज सगळीकडे धावपळ सुरू आहे. क्षेत्र कोणतंही असो, स्थिती सारखीच आहे. एवढी धावपळ कशासाठी? तर यशासाठी, जीवनात काहीतरी मिळण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी किंवा इतरही कारणे असू शकतात. यातली आपली काही स्वप्ने पूर्ण होतात, काही अधुरी राहतात. पण आपले प्रयत्न मात्र थांबता कामा नये. म्हणूनच अडचणीत, संकटात आपल्याला प्रेरणा देतील अशी काही पुस्तके आपल्याकडे असायला हवीत. यातून प्रेरणा घेऊन आपण जीवनात नक्कीच यशाकडे वाटचाल करू शकतो. आज अशाच काही पुस्तकांविषयी जाणून घेऊयात...

1) _*बिजनेस अ‍ॅडव्हेंचर्स*_ (Business Adventures)

_*लेखक*_ : जॉन ब्रुक्स (John Brooks)

_*पुस्तकात काय?*_ : यात कोणता व्यवसाय यशस्वी होतो आणि कोणता अयशस्वी होतो. या दोन विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

2) _*टॅप डान्सिंग टू वर्क*_ (Tap Dancing to Work)

_*लेखक*_ :  कॅरल लूमिस (Carol Loomis)

_*पुस्तकात काय?*_ : यात वॉरेन बफेट यांचे सर्व लेख एकत्रित दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही बफेट यांची यशाची संपूर्ण कथा जाणून घेऊ शकता.

3) _*लाईफ इज व्हॉट यू मेक इट*_ (Life is What You Make it: Find Your Own Path to Fulfillment)

_*लेखक*_ : पीटर बफेट (Peter Buffett)

_*पुस्तकात काय?*_ : यामध्ये हार्ड वर्किंग, श्रीमंत मुलांच्या कथा सांगितल्या आहेत. या तुम्हाला नक्कीच प्रेरणा देणार्‍या ठरतील. 

4) _*अवेकिंग ज्वॉय*_ (Awakening Joy: 10 Steps That Will Put You on the Road to Real Happiness)

_*लेखक*_ : जेम्स बराज (James Baraz)

_*पुस्तकात काय?*_ : तुम्ही यशस्वी का होऊ इच्छिता? शक्यतो आनंदाचे कारण असू शकते. मात्र यशाचा प्रवास करताना येणार्‍या प्रसंगाचा आनंद कसा घ्यायचा हे तुम्ही या पुस्तकातून शिकाल.

5) _*व्हेयर गुड आयडियाज कम फ्रॉम*_ (Where Good Ideas Come from: The Natural History of Innovation)

_*लेखक*_ : स्टीवन जॉनसन (Steven Johnson)

_*पुस्तकात काय?*_ : यशस्वी होण्यासाठी नवं-नवीन कल्पना खूप आवश्यक आहेत. हे या पुस्तकातून तुम्ही समजून घेऊ शकता.

0 comments:

Post a Comment