दिनांक २६ एप्रिल २०१५ रोजी भीमसेन जोशी कलामंदिर, ब्रेमन चौक औंध पुणे येथे ‘दुर्गजागर’ हा एक अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रम होत आहे.
‘दुर्गजागर’ या अभ्यासवर्गात ‘दुर्ग’ या विषयावर महाराष्ट्रातील तीन दर्जेदार वक्त्यांना ऐकायची संधी आपल्याला मिळणार आहे.
या अभ्यासवर्गात ‘दुर्गस्थापत्य’ या विषयावर ‘श्री. सचिन जोशी’(राज्य सरकार स्थापित दुर्ग संवर्धन समितीचे सन्माननीय तज्ञ सदस्य आणि रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा, रायगड जिल्हाचे दुर्गवैभव या पुस्तकांचे लेखक).
‘मराठा आरमार आणि सागरी किल्ले’ या विषयावर ‘श्री. भगवान चिले’(राज्य सरकार स्थापित दुर्ग संवर्धन समितीचे सन्माननीय तज्ञ सदस्य आणि वेध जलदुर्गांचा, गडकोट, दुर्गांच्या देशा, दुर्गसंपदा महाराष्ट्राची, अपरिचित गडकोट, दुर्गम दुर्ग या पुस्तकांचे लेखक).
‘भारतातील अद्भुत दुर्ग आणि त्यांची दुर्गरचना’ या विषयावर दुर्गमहर्षी ‘प्रमोद मांडे’ सर यांचे व्याख्यान होणार आहे(महाराष्ट्रातल्या चारशे किल्ल्यांसोबत भारतातील १००० किल्ल्यांचे रेकॉर्ड्स - इतिहास आणि स्वतः काढलेली छायाचित्रे सरांच्या गाठीशी आहेत)
‘दुर्गजागर’ या अभ्यासवर्गाची रूपरेखा:
०८:०० ते ०८:३० - नाव नोंदणी
०८:३० ते ०८:४५ - प्रस्तावना आणि अध्यक्षीय भाषण
०८:४५ ते १०:१५ - दुर्गस्थापत्य - श्री. सचिन जोशी
१०:१५ ते १०:३० - चहापान
१०:३० ते १२:०० - मराठ्यांचे आरमार आणि सागरी किल्ले - श्री. भगवान चिले
१२:०० ते १२:४५ - भोजन विश्राम
१२:४५ ते ३:४५ - भारतातील अदभूत दुर्ग आणि त्यांची दुर्ग रचना - दुर्गमहर्षी प्रमोद मांडे
सदरील अभ्यासवर्गाचा शुल्क फक्त २०० रुपये असून ज्यात ८ ते ४ ए.सी सभागृह, एक वेळचा चहा, दुपारचे जेवण सोबत नोंदवही आणि पेन पुरवण्यात येईल.
अभ्यासवर्गाचे पासेस मिळण्यासाठी:
वेगवेगळ्या भागात जे प्रतिनिधी नेमले आहेत त्यांच्याकडे पैसे जमा करून हातोहात पास घेऊ शकता किंवा पैसे Online भरू शकता,
Harit Bhumi Foundation
Account Number: 051610110006131IFSC Code: BKID0000516
Bank of India, Pashan Road, Pune.
पैसे भरल्याचा मेल shivsahyadrigatha@gmail.com ह्या मेल आयडीवर करणे, आपले पास राखून ठेवण्यात येतील.
0 comments:
Post a Comment