Kargil yudh

कारगिल-द्रास सेक्टरमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये लढल्या गेलेल्या चौथ्या युद्धात आजच्याच दिवशी २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. या संपूर्ण मोहिमेला ऑपरेशन विजय नाव देण्यात आले होते. ६० पेक्षा जास्त दिवस लढल्या गेलेल्या या युद्धामध्ये भारताचे ५२७ जवान शहीद झाले. १९६५ आणि १९७१ पेक्षा या युध्दाचे स्वरुप वेगळे होते. या दोन्ही युद्धामध्ये भारतीय सैन्य सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते. पण कारगिल युद्धाच्यावेळी भारताने आपल्या हद्दीतराहून पाकिस्तानी सैन्याने बळकावलेली ठाणी आणि भूप्रदेश पुन्हा ताब्यात  ताब्यात घेतला. कारगिल युद्धामध्ये भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सर्वोच्च पराक्रम दाखवला. ज्यामुळे शत्रू फक्त  चीत झाला नाही तर, त्याला तिथून पळ काढावा लागला.या लढाईत तोलोलिंग आणि टायगर हिलवरील ताब्यानंतर कारगिल युद्धाचे पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने वळले. चार जुलैला भारताने टायगर हिलवर ताबा मिळवला. हा पाकिस्तानसाठी रणनितीक आणि मानसिक दृष्टया मोठा धक्का होता.कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी कारगिल-द्रास सेक्टर आणि नवी दिल्लीत कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. या दिवशी दरवर्षी  इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती येथेपंतप्रधान  शहीद जवानांना आदरांजली वाहतात.
रणनितीदृष्टया टायगर हिल का महत्वाचे -
टायगर हिल कारगिल- द्रास क्षेत्रातील सर्वोच्च शिखर आहे. हिवाळयात घुसखोरी करुन पाकिस्तानी सैन्याने इथे ताबा मिळवला होता. टायगर हिलवरुन पाकिस्तानी सैनिक सहजतेने राष्ट्रीय महामार्ग एकवर नजर ठेऊ शकत होते. या शिखरावरुन श्रीनगर-लेह मार्ग तसेच ५६ ब्रिगेडचे लष्करी मुख्यालय टप्प्यात येत होते. उंचावर बसलेला शत्रू राष्ट्रीय महामार्गाच्या २५ कि.मी.च्या टप्प्यातील भारतीय लष्कराच्या हालचालींना सहजतेने लक्ष्यकरत होता. पाकिस्तानने बळकावलेला भूप्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी टायगर हिलवर ताबा मिळवणे त्यासाठी महत्वाचे होते. -  तीन जुलैच्या संध्याकाळी सातच्या सुमारास भारतीय लष्कराने टायगर हिल ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केली. १८ ग्रेनेडीयन्सकडे या मोहिमेचे नेतृत्व होते. एकूण २०० जवान या कारवाईत सहभागी होते. अल्फा, चार्ली आणि घाटक अशा तीन गटांमध्ये जवानांची विभागणी करण्यात आली होती.
- टायगर हिलच्या लढाईमध्ये भारतीय जवानांनी सर्वोच्च शौर्य, पराक्रम दाखवला. घाटक प्लाटूनकडे १००० फूटाचा सरळ कडा चढून जाण्याचे कठिण आव्हान होते. योगेंद्र सिंह यादव सर्वप्रथम या कडयावर पोहोचला व इतर सहका-यांची दोरखंडाच्या सहाय्याने कडयावर पोहोचण्याची व्यवस्था केली. ही चढाई सुरु असताना शत्रूचे हालचालींवर लक्ष गेले व त्यांनी गोळीबार केला. यामध्ये कंपनी कमांडरसह तीन जवान शहीद झाले. यादवच्या खांद्यालाही गोळी लागली. पण त्याने या परिस्थितीतही शत्रूवर गोळया, ग्रेनेडचा वर्षाव केला आणि पाकिस्तानच्या चार सैनिकांनाकंठस्नान घातले. या पराक्रमासाठी योगेंद्र सिंह  यादवला परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

             जय हिंद

मोगरा फुलला

आज रविवार असूनही रेणू बरोब्बर सकाळी सहा वाजता उठली. तशी तिला उशिरापर्यंत झोपायची मुळी सवयच नव्हती. कारण तिची रोज सकाळची आठची शाळा असायची. आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा तिचे बाबा तिला सकाळी सात वाजल्यानंतर कध्धीच झोपू द्यायचे नाहीत. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की, सकाळी लवकर उठलं की दिवस कसा मोठ्ठा मिळतो, खूप ताजंतवानं वाटतं आणि सगळी कामंही प्रसन्न मनाने होतात.
पण आज रविवारच्या मानाने मात्र रेणू खरोखरच लवकर उठली होती. तिने पांघरुणाची व्यवस्थित घडी करून ठेवली. पटकन दात घासले आणि धावतच ती बाल्कनीमध्ये गेली. तिच्या लाडक्या मोगऱ्याला भरपूर फुलं आली होती. तिला मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुलं खूप आवडायची. म्हणून आई-बाबांनी तिला काही दिवसांपूर्वी तिच्या वाढदिवसाला मोगऱ्याचं एक रोप भेट दिलं होतं. रेणू त्याला नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ पाणी घालायची, नीट ऊन मिळतंय का ते पाहायची, त्याच्या कुंडीमध्ये खत घालायची, त्याची भरपूर काळजी घ्यायची. टपोऱ्या पांढऱ्या फुलांमुळे आज झाड खरंच खूप सुरेख दिसत होतं.
रेणू खूश झाली. ती उडय़ा मारत हॉलमध्ये आली. आई-बाबा, आजी-आजोबा चहा घेत, पेपर वाचत बसले होते. रविवार असल्यामुळे सगळेच एकदम निवांत होते.
‘‘बाबा, प्रॅक्टिस करायची?’’ रेणू उत्साहाने म्हणाली. आई रेणूसाठी दूध घेऊन आली.
‘‘अगं हो! दूध तर घेशील की नाही? आणि प्रॅक्टिस करायला सगळं आवरून बसायचं. गाणं ही विद्या आहे नं! मग असं पारोसं नाही बसायचं गायला.’’ बाबांनी समजावलं. रेणू दूध प्यायला टेबलापाशी बसली.
‘‘मला सांग रेणू, आजचा कार्यक्रम कशाकरता आहे गं?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘दोन दिवसांनी गुरूपौर्णिमा आहे नं, म्हणून.’’ रेणू पटकन म्हणाली.
‘‘अगं, पण गुरूपौर्णिमा म्हणजे काय?’’ बाबांनी विचारलं. रेणूला याबद्दल फारशी माहिती नव्हती. ती गेले दोन-तीन आठवडे फक्त ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’, ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’ एवढा एकच जप करत होती. त्यामुळे घरच्यांनाही तिला याची माहिती करून द्यायचीच होती.
‘‘रेणू, पूर्वीच्या काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशात गुम्रू-शिष्य परंपरा होती. तुमच्या आज जशा टीचर्स असतात नं, ते म्हणजे तेव्हाचे गुरू आणि तुम्ही सगळी मुलं म्हणजे शिष्य. मुलं सात-आठ वर्षांची, म्हणजे साधारण तुझ्या वयाची झाली, की त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवायचे. त्यांच्या या शाळेला ‘गुरुकुल’ असं म्हणायचे. आपलं घर सोडून शिक्षण संपेपर्यंत ते त्यांच्या गुरुजींच्याच घरी राहायचे. गुरुजी सांगतील ती सगळी कामं करायचे आणि त्याचबरोबर खूप अभ्यासपण करायचे. आपले गुरू आपल्याला खूप काही नवीन-नवीन शिकवतात, ज्ञान देतात म्हणून त्यांना ‘थँक यू’ म्हणण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करतात. महाभारत लिहिणाऱ्या महर्षी व्यासांना आपण श्रेष्ठ गुरूमानतो. म्हणून या पौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’असंही म्हणतात. समजलं?’’ आजोबांनी सांगितलं. रेणू मन लावून ऐकत होती.
‘‘तुझ्या रूममध्ये तो श्रीकृष्णाचा फोटो आहे नं, त्याचे गुरू होते मुनी सांदिपनी. असं म्हणतात की, श्रीकृष्णाने त्यांच्या घरी लाकडेही वाहिली होती. एकदा कृष्णाला असं कळलं, की शंकासुर नावाच्या एका राक्षसाने सांदिपनींच्या मुलाला बरेच दिवस त्याच्याजवळ कैद करून ठेवलंय. गुरुदक्षिणा म्हणून मग त्याने त्या राक्षसाच्या कैदेतून सांदिपनी मुनींच्या मुलाची सुटका केली.’’ आजोबांनी पुढे माहिती दिली.
‘‘गुरुदक्षिणा म्हणजे काय आजोबा?’’ रेणूचा प्रश्न.
‘‘म्हणजे शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजींना दिलेली ‘फी’. पण ती पैशांच्या रूपांतच असायला लागत नाही.’’ बाबा म्हणाले.
‘‘तुला मध्ये मी अर्जुन-द्रोणाचार्याची गोष्ट सांगितली होती, आठवतंय?’’ आजीने विचारलं.
‘‘हो! आणि एकलव्याची पण!’’ रेणू म्हणाली. तिला आजीकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं.
‘‘तर त्या गोष्टीमधले द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरू होते, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. एकलव्यलाही त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकायची होती. पण ते एकलव्यला धनुर्विद्या शिकवायला तयार झाले नाहीत. तेव्हा एकलव्याने द्रोणाचार्याची एक मूर्ती बनवली, तिलाच गुरू मानलं आणि धनुर्विद्य्ोचं शिक्षण स्वत:च घेतलं. जेव्हा द्रोणाचार्याना हे समजलं तेव्हा ते घाबरले. कारण त्यांनी अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन दिलं होतं. गुरुदक्षिणा म्हणून मग त्यांनी एकलव्यचा अंगठा कापून मागितला, म्हणजे त्याला धनुष्य-बाण चालवताच येणार नाही.’’ आजी सांगत होती.
‘‘पण हे चुकीचं आहे!’’ रेणू कळवळून म्हणाली.
‘‘हो! चुकीचंच आहे. पण एकलव्यानेही कुठलाही विचार न करता त्याचा अंगठा कापून देऊन टाकला. म्हणून एकलव्याला एक श्रेष्ठ शिष्य मानतात. कधीकधी गुरूपेक्षा शिष्य श्रेष्ठ ठरतो, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.’’ आजी म्हणाली.
‘‘पण मग मलाही कुणी गुरू आहे?’’ रेणूचा निरागस प्रश्न.
‘‘तुझ्या टी

ABOUT INDIA...MUST READ

"ही माहीती नक्की वाचा" आपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मधून मिळाली. ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
1. भारताने लावलेले शोध 
------------------------------
A. बुद्धिबळ 
-----------------------------
B. शून्य 
-----------------------------
C. आयुर्वेद - २५०० वर्षांपूर्वी चरकाने लावला 
-----------------------------
D. जलपर्यटन (Navigation)- ६००० वर्षांपूर्वी, Navy हा शब्ददेखील 
संस्कृत शब्द ‘नौ’ ने तयार झाला आहे. 
------------------------------
E. पृथ्वीला सूर्याभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी ३६५ दिवस लागतात 
हा शोध खरा भास्कराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी लावला होता.
-------------------------------
F. सर्जरीचा शोध २५०० वर्षांपूर्वी सुश्रुताने लावला होता. त्याकाळी सुश्रुत
आणि त्याचा संघ, मोतीबिंदू, ब्रेन सर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कृत्रिम अवयव
यासारख्या सर्जरी करायचे. 
-----------------------------
G. योग - ५००० वर्षांपूर्वी 
-----------------------------
H. मर्शिअल आर्टचा शोध बौध भिक्षुकांनी प्रथम भारतात लावला होता
आणि त्यानंतर तो उत्तर आशियात गेला. 
------------------------------
I. IEEE ने सिद्ध केलं आहे की wireless communication चा शोध 
डॉ जगदीश बोस यांनी लावला होता, मार्कोनीने नव्हे.
----------------------------
J. जगातील पहिले विद्यापीठ (university) इ.स. पूर्व ७०० वर्षं – तक्षशीला 
विद्यापीठ जिथे जगभरातून १०,५०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे 
आणि ६० हून अधिक विषय शिकवले जायचे.
------------------------------
K. ब्रिटीश राजवट येण्यापूर्वी इ.स. १७१८ ला भारत हा जगातील सर्वात
श्रीमंत देश होता.
------------------------------
L. भारताच्या १०,००० वर्षांच्या इतिहासात, भारताने कोणत्याही इतर 
देशावर विनाकारण हल्ला केला नाही. 
------------------------------
M. भारताबाहेर:
i. अमेरिकेतील ३८% डॉक्टर भारतीय आहेत. 
ii. अमेरिकेतील १२% वैज्ञानिक भारतीय आहेत. 
iii. NASA तील ३६% कर्मचारी भारतीय आहेत.
iv. Microsoft चे ३४% कर्मचारी भारतीय आहेत.
v. IBM चे २८% कर्मचारी भारतीय आहेत.
vi. Intel चे १७% कर्मचारी भारतीय आहेत.
vii. Xerox चे १३% कर्मचारी भारतीय आहेत.
-------------------------------
N. अमेरिका, रशिया आणि चीनला स्पर्धा देणारी भारत ही जगातील
एकमेव उत्कृष्ट स्पेस एजेन्सी आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यान 
यशस्वीरीत्या पोहचवणारा भारत पहिला देश आहे आणि या यात्रेचा 
एकंदरीत खर्च हा हॉलीवूड चित्रपट Gravity च्या खर्चापेक्षाही कमी
होता. २००८ मध्ये एकाच प्रयत्नात १० उपग्रह अंतराळात स्थिर करून भारताने
वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. 
------------------------------
O. Satelite मध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. 
-------------------------------
P. दुध, काजू, नारळ, चहा, आलं, हळद आणि काळीमिरी उत्पादनात 
भारताचा पहिला तसेच गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर आणि
मत्सोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांत लागतो. 
-------------------------------
Q. जगातील सर्वाधिक गुराढोरांची संख्या भारतात आहे. 
------------------------------
R. जगातील सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत (१.५० लाख)
-------------------------------
S. जगातील सर्वाधिक वैज्ञानिक आणि इंजिनिअर भारतात आहेत. 
-------------------------------
T. हॉटमेल आणि प्लेटीअम चीप चे निर्माते भारतीय आहेत. 
------------------------------
U. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक रोजगार पुरवणारी संस्था असून १६ करोड ५० लोकांना ती रोजगार पुरवते. १ लाख ९००० किमी इतका विस्तार, ७,००० स्टेशन, दररोज धावणाऱ्या १३,००० ट्रेन, १ लाख वीस हजार पूल असलेली आणि करोडो प्रवाशांची ने आण करणारी जगातील सर्वात मोठी यंत्रणा म्हणजे भारतीय रेल्वे.
------------------------------
M. एक वर्षाला ४०० हून अधिक चित्रपट निर्माण करणारी, ७२ लाख 
लोकांना रोजगार पुरवणारी आणि ६,००० करोड हून अधिक वार्षिक 
मिळकत असलेली बॉलीवूड ही जगातली एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे. 
------------------------------
V. मुंबई डबेवाल्यांच्या अचूकतेच प्रमाण ९९.९९९९९९ टक्के इतकं आहे.
दररोज ३,५०० डबेवाले १.५ लाख ऑफिस कर्मचार्यांना अचूकपणे डबे
पुरवतात. असं उदाहरण जगात दुसरं नाही.
o.१३ लाख खाडी फौज आणि १८ लाखाची राखीव इतकी मोठी फौज 
असलेलं भारतीय लष्कर हे जगातील एकमेव लष्कर आहे. 
-------------------------------
W. स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगातील सर्वाधिक शाखा असलेली एकमेव बँक आहे. 
----------------------------
X. टाटा, SBI, इन्फोसिस या जगातील उच्च २०० कंपन्यातील यादीत पहिल्या ५० मध्ये आहेत. 
------------------------------
Y. डुंगारपुरच्या स्वयंसेवकांनी २४ तासात ६ लाख झाडे लावण्याचा 
विश्वविक्रम नोंदविला आहे. 
------------------------------
Z. भारतीय BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था आहे.
------------------------------
 जगातील सगळ्यात मोठी बुद्धिमान तरुण लोकसंख्या भारतात आहे. ही लोकसंख्या अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. 
------------------------------
B. प्रचंड गड-किल्ले, स्मारके आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला
भारत हा जगातील एकमेव देश आहे. 
-----------------------------
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 
१८ प्रमुख भाषा,
१,६०० द्वितीय भाषा,
२९ प्रमुख सण, 
६,४०० जाती आणि उपजाती
 ७ संघराज्य,
२९ राज्य,
६ मोठे धर्म, 
५२ मोठ्या जमाती
इतकी प्रचंड विविधता असून एकात्मता जपणारा भारत हा जगातील एकमेव देश आआपणा सर्वांना भारतीय असण्याचा अभिमान वाटावा अशी माहिती या मेसेज मjधून मिळाली.
ती आवडली म्हणून आपणास शेअर करीत आहे.
Be Pround To Be Indian......

कथा: आभास हा

ह्रुदयस्पर्शी कविता...

ऑफिस मधून निघालो बाईक वर तुझ्या विचारात , थोडे दूर येतो न येतो की जोरदार पाऊस सुरु झाला ..घरी पोहचल्यावर पाहिले,कपडे ,ब्याग, अंग सर्व चिंब भिजले होते,
मात्र मन कोरडेच होते,
पाऊस हल्ली वरवरच भिजवतो ,हे लक्षात आल्या आल्या ,     तो क्षण आठवला,आपल्या शेवटल्या भेटीचा..
किती विनवण्या करत होतो मी,किती लाचार झालो होतो,तू मात्र नाही थांबलीस.. माझ्या विनवण्या ,माझे प्रेम तुझ्या मनाला स्पर्शू सुद्धा दिले नाहीस तू  अन निघून गेलीस अगदी तसेच जसे मी आज भर पावसात न भिजता आलो..
असो, 
आजकाल पाऊस तुला भिजवतो का ग?
इतकेच विचारायचे होते,म्हणून भेट म्हणत होतो,
बस बाकी काही नाही..
नि:शब्द (देव)