ह्रुदयस्पर्शी कविता...

ऑफिस मधून निघालो बाईक वर तुझ्या विचारात , थोडे दूर येतो न येतो की जोरदार पाऊस सुरु झाला ..घरी पोहचल्यावर पाहिले,कपडे ,ब्याग, अंग सर्व चिंब भिजले होते,
मात्र मन कोरडेच होते,
पाऊस हल्ली वरवरच भिजवतो ,हे लक्षात आल्या आल्या ,     तो क्षण आठवला,आपल्या शेवटल्या भेटीचा..
किती विनवण्या करत होतो मी,किती लाचार झालो होतो,तू मात्र नाही थांबलीस.. माझ्या विनवण्या ,माझे प्रेम तुझ्या मनाला स्पर्शू सुद्धा दिले नाहीस तू  अन निघून गेलीस अगदी तसेच जसे मी आज भर पावसात न भिजता आलो..
असो, 
आजकाल पाऊस तुला भिजवतो का ग?
इतकेच विचारायचे होते,म्हणून भेट म्हणत होतो,
बस बाकी काही नाही..
नि:शब्द (देव)

0 comments:

Post a Comment