कृषी अर्थशास्त्र


कृषी अर्थशास्त्र

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय आहे . कृषी व कृषीशी संबंधीत सर्वच व्यवसायांचा कृषी अर्थशास्रात समावेश होतो . पिकांसाठी भूमीची निवड करणे . शेतीसाठी आवश्यक अवजारे , पिकांची निवड व बि-बियाणांची व्यवस्था, बाजार व्यावस्था, शेतीला कर्जपुरवठा ,कृषी बचत , विनियोग व शेतक-यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिने कृषी उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा अभ्यास ज्यात केला जातो त्यास कृषी अर्थ्सास्र असे म्हणतात.
टेलर यांची व्याख्या - कृषी अर्थशास्रामध्ये जमिन ,श्रम व अवजारे इ. निवड करणे पिकांचा प्रकार निवडणे त्याचप्रमाणे शेतमालाच्या किंमती व उत्पादनखर्च यांचा विचार करण्यात येतो.
कृषी व्यवस्थापन

व्यवस्थापन – जे. ड्ब्ल्यू शुल्टझ् – आधी निश्चित कलेले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संघटनेचे नेतृत्व मार्गदर्शन आणि निर्देशन करणारी शक्ती म्हणजे व्यवस्थापन होय .
व्यवस्थापनाची कार्ये १) नियोजन २) संघटन ३) निर्देशन ४) समन्वय ५) नियंत्रण

कृषी व्यवस्थापन –
उत्पादनाच्या विविध घटकांचा (श्रम,भूमी व भांडवल ) योग्य प्रमाणात उपयोग करून आधिकाधिक नफा मिळवणे हा शेती व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश आहे.
शेतीच्या व्यवस्थापनात विशिष्ट शेतावर कोणते पीक घेणे योग्य हाईल , त्याचे प्रमाण काय असावे ,कोणते आदान किती प्रमाणात वापरावे,विक्री व्यवस्था, मुख्य पिकाअबरोबर इतर जोडधंदे इ. महत्वाचे निर्ण्य शास्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून घ्यावे लागतात. हे निर्ण्य कृतीत आणणे म्हणजे कृषी व्यवस्थापन होय.

कृषी व्यवस्थापनातील प्रमुख निर्णय –
अ) शेतमाल उत्पादन – १) उत्पादन कशाचे करायचे २) किती उत्पादन करायचे 3) उत्पादन कशाचे करायचे .
ब) शेतमालाची विक्री - १) उत्पादन किती विकायचे २) उत्पादन कोठे विकायचे .
क) शेती उत्पादनासाठी वित्त व्यवस्था - १) वित्त व्यवस्था किती करायची २ ) वित्त व्यवस्था कसे करायचे .
कृषी व्यवस्थापनातील निर्णय घेण्यास उपयुक्त मुलतत्वे

१) घटती सिमांत उपयोगिता – एखाद्या वस्तूच्या नगांचा एकामागून एक उपभोग घेत गेल्यास शेवटच्या नगापांसून उपयोगितेत पडणारी भर म्हणजे सिमांत उपयोगिता होय. वस्तूंचा उपभोग जसा वाढत जातो तशी सिमांत उपयोगिता घटत जाते.
एखाद्या वस्तूचा साठा वाढत जातो तेव्हा एकूण उपयोगिता वाढत जाते ,. मात्र सिमांत उपयोगिता घटत जाते.

ज्या ठिकाणी सिमांत उपयोगिता शून्य होते, त्या ठिकाणी एकूण उपयोगिता सर्वात जास्त असते .
एकूण उपयोगितेत वाढ होत असली तरी वाढ क्रमाक्रमाने घटत जाते . एकूण व सिमांत उपयोगिता एकमेकांच्या विरूध्द दिशेने कमी जास्त होत जाता .
अ) घटत्या फलाचा नियम (Princple of Diminishing Returns)- हा सिध्दांत डॉ. मार्शल यांनी मांडला .परंतु मुळ कल्पना गॉसेन व जोहान्स यांची आहे. हा सिध्दांत शेती व्यवसायात लवकर अनुभवास येतो . “ इतर सर्व घटक कायम असतांना एखाद्या वस्तूच्या / घटकाच्या नगांचे प्रमाण वाढविल्यास त्यापासून मिळ्णारी उपयोगिता / उत्पन्न वाढते परंतू ते वाढीव नगांच्या तुलनेत कमी कमी होत जाते. “ या तत्वामुळे आदानांच्या / निविष्टांच्या वापराचे प्रमाण ठरविता येते.

मार्शल ची व्याख्या – शेती पध्द्तीत कोणतीही सुधारणा न केल्यास जमिनीत उपयोगात आणलेल्या भांडवल व श्रमाच्या मात्रांमध्ये वाढ केल्यामुळे उत्पादनामध्ये होणारी वाढ प्रमाणापेक्षा कमी असते.
ब) वर्धी उत्पत्ती मियम (Law of increasing Return) - इतर घटक कायम ठेवून फक्त एका घटकात वाढ केल्यास काही मर्यादेपर्यत सिमांत उत्पादन वाढ्त जाते त्यास वर्धी उत्पत्ती म्हणतात.
जेव्हा सीमांत उत्पती सरासरी उत्पत्तीपेक्षा जास्त असते तेव्हा सरसरी उत्पत्ती वाढण्याची प्रवृत्ती असते.
जेव्हा सीमांत उत्पत्ती सरासरी उत्पत्तीपेक्षा कमी असते तेव्हा सरासरी उत्पत्ती घटण्याची प्रवृत्ती असते.
ज्याठिकाणी सीमांत उप्तत्ती व सरासरी उत्पत्ती समान असतात. तेथे सरासरी उत्पत्तीचा सरासरी बिंदू असतो.

क) स्थिर उत्पत्ती नियम – उत्पादनात काही काळ वर्धी उत्पत्ती दिसते. नंतर उत्पादन स्थिर किंवा प्रमाणशीर राहते व नंतर सिमांत एककापासून होणारी उत्पत्ती –हास पावू लागते.
२) समसिमांत उपयोगिता नियम / महत्तम समाधानाचा नियम / तटस्थेचा नियम / गॉसेनचा दुसरा नियम / मितव्यवस्थेचा नियम/ प्रमाणबध्दतेचा नियम / वैकल्पिक व्ययाचे / समसिमांत प्रत्ययाचे / विकल्पी परिव्ययाचे तत्व (प्रीन्सिपल ओफ इक्युपमेन्ट

मार्शल यांची व्याख्या – जर एखादया व्यक्ती जवळ विवीध उपयोगी वस्तु असेल तर व्यक्ती त्या वस्तूंचे विवीध उपयोगांसाठी अशा रितीने विभाजन करील की , प्रत्येक उपयोगा पासून मिळणारी सिमांत उपयोगीता समान राहील . एखाद्याची सिमांत उपयोगिता दुस-यापेक्षा जास्त असल्यास ती व्यक्ती दुस-याची मात्रा वाढवून अधिक समाधान मिळवील. जेव्हा वस्तुंचा प्रत्येक उप्योगातील सिमांत उपयोगीता समान असते तेव्हा समस्त उपयोगीता महत्तम असते . यालाच समसिमांत उपयोगिता नियम म्हणतात.
या तत्वाद्वारे शेतक-यांकडे मर्यादित भांडवल असल्यास निरनिराळ्या उपक्रमात गुंतवणूक क्शी करावी की ज्यामुळे सर्वाधिक फायदा होईल हे कळ्ते. या तत्वाद्वारे उपक्रमाच्या संयुद्ती करणासंदर्भात विशेषीकरण करावे की, विविधी करण स्विकारावे हे कळ्ते .
या सिध्दांताला विकल्पी व्ययाचे तत्व म्हणतात कारण, यात सोडून दिलेल्या उपक्र माचे मूल्य म्हणजेच स्विकारलेल्या उपक्रमाचा परिव्यय होय.

३) पर्यायनाचे तत्व / घटक प्रतिस्थापनाचे तत्व(Principale of Stitution ) – उत्पादन प्रक्रियेत एका कार्याकरीता अनेक पर्ययापैकी कोणता पर्याय कमी खर्चाचा (Least Cost Combination ) आहे , की ज्यामुळे निव्व्ल उत्पन्नात वाढ होईल. याचा विचार शेतक-यांना करावा लागतो उदा- शेती नांगरण्यासाठी टॅक्ट्रर वापरावा की बैलाचा नांगर,,तणी काढणी मजूरांच्या सहाय्याने करावी की, तणनाशक वापरावे इ. यापैकी कोणता पर्याय वापरावा; किंवा कमी खर्च व तेवढेच उत्पन्न मिळ्विण्यासाठी दोन घटकांचे संयुक्ती करण कसे करावे , याचा निर्णय पर्यायनाच्या तत्वाव्दारे घेता येतो. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे तत्व उपयुक्त ठरते .
४) तुलनात्मक फायद्याचे तत्व ( Principale of Comparative Advantage ) - उत्पादकाला जास्तीत जास्त फायदा मिळ्विण्यासाठी पिकांची निवड करतांना पिकाचा उत्पन्नखर्च व बाजाभाव विचारात घेवून तुलनात्मक किंवा टक्केवाररीने सर्वात जास्त फायदा देणारे पीक निवडावे . उदा. नाशिक –द्राक्षे, महाबळेश्वर -स्ट्रॉबेरी
५) उपक्रमाच्या संयुक्ती करणाचे तत्व / व्यवसायमिळाचे तत्व (Principale in combining Enterprises ) – या तत्वाव्दारे जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करावा हे कळते.शेतकरी शेती करतांना शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व पशूपालन या व्यवसायांची खालील प्रकारे निवड करू शकतो.
अ)स्वतंत्र उपक्रम (Independent Enterpreses ) - यात शेती व्यवसाय, दुग्ध व्यवसाय व पशूपालन या तीनपैकी एकाची निवड करतात . उपक्रम स्वतंत्र असतो.

1 comments:

MODERN AGRICULTURE said...

Usefull information

Post a Comment