तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

👉 _*तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

_*LetsUp I Current Affairs*_

बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरले जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड कुठे वापरले तर जात नाही ना, याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. आता uidai ने हि सुविधा आधारधारकांना दिली असून वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारचा वापर कुठे होतोय हे चेक करू शकता.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_ 

1) सर्वात आधी https://resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) या संकेतस्थळावर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

3) यानंतर OTP जनरेट करा, तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल.

4) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. त्यानंतर निश्चित वेळेत तुम्हला तो टाकावा लागेल.

5) तुमच्या आधार नंबरच्या डिटेल्सवरून तो कधी कधी वापरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

6) जर खरच तुमच्या आधारचा गैरवापर होत असेल तर तुम्ही आधार ऑनलाइन लॉक करू शकता.

👉 _*2023 चा वर्ल्डकप भारतात रंगणार*_

2023 चा वनडे वर्ल्डकप आणि 2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताकडे असणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारताने याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकपच्या यजमानपदासह भातीय संघ अफगाणिस्तानच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. 2019-2020मध्ये हा सामना भारतात होईल. सोबतच या बैठकीत 2019 ते 2023 पर्यंतचा भारतीय संघाचा कार्यक्रमही जाहीर झाला. या पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर 306 दिवसात 81 सामने खेळणार आहे.

👉 _*फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’*_

फेसबुकवर लवकरच नवीन फिचर येणार असून ‘ग्रीटिंग्ज फिचर’असे या नव्या फिचरचे नाव आहे. फेसबुकच्या या ग्रीटिंग फिचरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने चॅट करू शकणार आहात. या नवीन फिचरमधून तुम्ही पोक, विंक किंवा हाय-फाय हेही पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या या फिचरची चाचणी ब्रिटन, थायलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि फ्रान्स येथे सुरू असून लवकरच ते जगभरात लाँच होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_

0 comments:

Post a Comment