तू अन मी .....



हिरव्यागार रानात 
निळ्याशार नभात
तू अन मी .....

सागराच्या पाण्यात
केवड्याच्या बनात
तू अन मी .....

गार गार वाऱ्यात
उन्हाच्या पाऱ्यात
तू अन मी .....

गरमागरम वाळवंटात
गारेगार बर्फात
तू अन मी .....

सोनेरी उन्हात
काळ्याश्या नभात
तू अन मी .....

तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

👉 _*तुमच्या 'आधार'चा गैरवापर तर होत नाही ना?*_

_*LetsUp I Current Affairs*_

बँक, मोबाईल नंबर, पॅन कार्ड आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. बँकेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी आधार कार्ड वापरले जात असल्याने त्याची खबरदारी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच तुमचे आधार कार्ड कुठे वापरले तर जात नाही ना, याची पडताळणी करणे महत्वाचे ठरते. आता uidai ने हि सुविधा आधारधारकांना दिली असून वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या आधारचा वापर कुठे होतोय हे चेक करू शकता.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_ 

1) सर्वात आधी https://resident.uidai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

2) या संकेतस्थळावर Aadhaar Authentication History वर क्लिक करा.

3) यानंतर OTP जनरेट करा, तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP नंबर येईल.

4) OTP नंबर टाकल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स मिळतील. त्यानंतर निश्चित वेळेत तुम्हला तो टाकावा लागेल.

5) तुमच्या आधार नंबरच्या डिटेल्सवरून तो कधी कधी वापरला गेला आहे हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये जर काही गडबड असेल तर तुम्ही तक्रार करू शकता.

6) जर खरच तुमच्या आधारचा गैरवापर होत असेल तर तुम्ही आधार ऑनलाइन लॉक करू शकता.

👉 _*2023 चा वर्ल्डकप भारतात रंगणार*_

2023 चा वनडे वर्ल्डकप आणि 2021 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या मानाच्या स्पर्धांचे यजमानपद भारताकडे असणार आहे. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारताने याआधी 1987, 1996 आणि 2011 मध्ये वनडे वर्ल्डकपचे यजमानपद भूषविले आहे.

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्डकपच्या यजमानपदासह भातीय संघ अफगाणिस्तानच्या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्याचे यजमानपदही भूषविणार आहे. 2019-2020मध्ये हा सामना भारतात होईल. सोबतच या बैठकीत 2019 ते 2023 पर्यंतचा भारतीय संघाचा कार्यक्रमही जाहीर झाला. या पाच वर्षांत भारतीय संघ घरच्या मैदानावर 306 दिवसात 81 सामने खेळणार आहे.

👉 _*फेसबुकचे नवीन ‘ग्रीटिंग्ज फिचर’*_

फेसबुकवर लवकरच नवीन फिचर येणार असून ‘ग्रीटिंग्ज फिचर’असे या नव्या फिचरचे नाव आहे. फेसबुकच्या या ग्रीटिंग फिचरद्वारे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत वेगळ्या पद्धतीने चॅट करू शकणार आहात. या नवीन फिचरमधून तुम्ही पोक, विंक किंवा हाय-फाय हेही पर्याय उपलब्ध होणार आहेत. सध्या या फिचरची चाचणी ब्रिटन, थायलँड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि फ्रान्स येथे सुरू असून लवकरच ते जगभरात लाँच होणार असल्याचे फेसबुकने सांगितले आहे.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/m9sEMa )*_

गाव

➰➰➰➰➰➰➰➰➰
*।।गाव।*

खरं खरं सांगतो राव,
उगीच न्हायी ठेवत नाव....

या मोबाइलनं बिघडवलं
आता सारं माझ गांव....

वडाचा मोठा पार होता,
वारा थंडगार होता.....

गप्पा ,निरोप,खुशाली,
कहाण्यांचा बाजार होता....

काय चाललंय?कसं चाललंय?
एकमेकांत संवाद हाेता....

कबड्डी होती,कुस्ती होती,
आट्या - पाट्या,लपा-छपी,

सुर-पारंब्यावरचे झोके होते,
ओढ्याच्या डोहात पोहणे हाेत.

आंब्याच्या झाडावरच बसून,
कच्चे-पिकलेले आंबे खायची मजा होती...

विटी-दांडु,खेळाचं मैदान होतं,
इतर अनेक मैदानी खेळ होते...

उनाडक्या होत्या,मस्ती होती,
आप-आपसात मेळ होता...

चिंचा होत्या,बोरं होती,
आंबे होते,ऊस होता...

गोठाभर ढोरं होती...
ढोरां बरोबर पाेर हाेती....

जिवाला जीव देणारे,
दिलदार मित्र होते......

किर्तन होतं,भजन होतं,
जात्यावरचं गाणं होतं.…

शाळेतल्या कवितेला,
आनंदाचं उधाण होतं...

पण..............

जसं गावात हा कोठून,
मोबाइल आला,नेट आलं....

चँनलच कनिक्शन,
घरा घरात थेट आलं...

गजबजलेलं गाव माझं,
आता निर्जन बेट झाले....

सकाळ संध्याकाळ सारी माणसं,
टीव्हीलाच चिकटून राहिली..

रस्त्यावर वर्दळ करणारी माणसे,
टी वी पुढंच सेट झालीत.....

मैदानावरील मुलं सारी,
देवळामागच्या अंधारात...

मोबाइल मध्येच गुंतली सारी......

सुने सुने झाले वडाचे पार,
मुके झाले देवळाचे ओटे....

दिवस-रात्र मोबाईल वर,
नुसती फिरवत राहतात बोटे.....

खरं-खरं सांगतो राव.....
या मोबाइलनंच बिघडवलं माझं सारं गाव !
✨✨✨✨✨✨✨

पीडीएफ स्वरुपातील उपलब्ध लेख*

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

_*सप्रेम नमस्कार...*_

आपल्या *कृषिसमर्पण* समूहाद्वारे आजतागायत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या *पीडीएफ* स्वरुपातील सर्व लेख आपणांकरिता एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत... याकरिता आपण आपल्या समूहाच्या टेलिग्राम चैनेलला फॉलोव करावयाचे आहे... जवळपास ३५ सविस्तर लेख आपण पीडीएफ स्वरुपामध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत...

📚 *पीडीएफ स्वरुपातील उपलब्ध लेख* 📚
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

👉🏻 हरभरा लागवड
👉🏻 म्हशींच्या जाती
👉🏻 लिंबू लागवड
👉🏻 शेवगा लागवड
👉🏻 संञा-मोसंबी आंबे बहार व्यवस्थापन
👉🏻 डाळिंब आंबे बहार व्यवस्थापन
👉🏻 सीताफळ लागवड
👉🏻 हळद लागवड
👉🏻 डाळिंब हस्त बहार व्यवस्थापन
👉🏻 द्राक्ष अॉक्टोबर छाटणीपासूनचे व्यवस्थापन
👉🏻 पपई जाती व रोपनिर्मिती
👉🏻 बांबू लागवड
👉🏻 भुईमूग लागवड
👉🏻 भेंडी लागवड
👉🏻 कोरपड लागवड
👉🏻 मिरची लागवड
👉🏻 खरबूज लागवड
👉🏻 खजूर लागवड
👉🏻 कलिंगड लागवड
👉🏻 कांदा प्रक्रिया उद्योग
👉🏻 कांदा बीजोत्पादन
👉🏻 गवती चहा लागवड
👉🏻 गांडूळ खत
👉🏻 झेंडू लागवड
👉🏻 अननस लागवड
👉🏻 ॲस्टर लागवड
👉🏻 आंबा पुनरुज्जीवन
👉🏻 आंबा मोहोर संरक्षण
👉🏻 आंबा सघन लागवड
👉🏻 ईएम द्रावणे
👉🏻 अॉईल पाम लागवड
👉🏻 कढीपत्ता लागवड
👉🏻 हिरवळीचे खते
👉🏻 कांदा लागवड
👉🏻 अंजीर लागवड

सदर लेख विविध वर्तमानपञे, विशेषांक, साप्ताहिके तसेच मासिकांमध्ये प्रकाशित झालेले असून यापैकी काही लेखांना *उत्कृष्ठ लेखन* पारितोषिकही मिळालेले आहे...

शेतकरी बंधू-भगिनींच्या मागण्यांना मान राखून लिहिलेले हे सविस्तर लेख काळजीपूर्वक वाचा... संग्रही ठेवा... आपल्या परिचितांना याविषयी नक्की कळवा...

*आपल्या समूहाच्या टेलिग्राम चैनेलचा दुवा...* 👇🏻
https://t.me/krushisamarpan
👆🏻 येथे क्लिक-टच करुन आजच्या आपल्या टैलिग्राम चैनेलचे फॉलोवर बना व मिळवा एकात्मिक शेतीची हंगामनिहाय माहिती, शेतीपुरक व्यवसायांची शास्ञोक्त माहिती...

आपल्या एंड्रोइड मोबाईलमध्ये 'टेलिग्राम' हे ॲप इंस्टॉल नसेल तर सर्वप्रथम हे 'गुगल प्ले स्टोअर'वरुन हे डाऊनलोड करुन ते इंस्टॉल करा..

*टेलिग्राम ॲप डाऊनलोड करण्यासाठीचा दुवा...*
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​* 👇🏻
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🎖 *अत्यंत अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_

मीठाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?*_

👉 _*मीठाचे 'हे' उपयोग तुम्हाला माहिती आहेत का?*_

_*LetsUp I Tips & Tricks*_

जेवणाची चव वाढवण्यासोबतच मीठाचे अनेक फायदे आहेत. यामध्ये उपलब्ध सोडियम बॉडीला आजार आणि इंफेक्शनपासून वाचवते. पण या व्यतिरिक्तही मीठाचे अजून काही महत्वपूर्ण उपयोग आहेत, जे तुम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी ठरतील. चला तर मग पाहूया मीठाचे काही उपयोग...

👉 शरीरावरील मृत त्वचा काढण्यासाठी अंघोळीनंतर त्वचा ओली असताना कोरड्या मिठाने घासावी. यामुळे रक्ताभिसरणदेखील वाढते. हा मसाज झाल्यावर पुन्हा अंग पाण्याने स्वच्छ करावे.

-------------------------------
*तुमचा सीबील स्कोर चेक करण्यासाठी क्लिक करा* 👉 https://goo.gl/nP1UCh
-------------------------------

👉 मीठाच्या पाण्याने नियमित अंघोळ करुन शरीराची आखड दूर करता येते. हे संधीवात, शुगर किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे मासपेशिंमध्ये होणा-या वेदना दूर करते.

👉 जर तुमच्या शरिरावर मधमाशीने डंख केला असेल तर वेदना होणार्‍या जागेवर मीठ लावा. वेदना आणि सूज दोन्हीही गायब होतील.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/rWVQVi )*_

👉 कधी कधी दिवसभरातील कामाच्या अतिरेकात डोळ्यांना ताण आणि थकवा जाणवतो. अशावेळी कोमट मीठाच्या पाण्यात एखादं स्वच्छ कापड भिजवा, आणि ते डोळ्यांवर ठेवून काहीवेळासाठी आराम करा. डोळ्यांचा त्रास कमी होईल.

👉 एक चमचा मीठ हे उत्तमप्रतिचे दंतमंजन आहे. एक चमचा मीठ आणि बेकिंग पावडर यांच्या मिश्रणाने रोज दात घासल्यास, दातांचा पिवळसरपणा जाऊन दात पांढरेशुभ्र होतात.

👉 अर्धा चमचा मीठ आणि बेकिंग पावडर एक कप पाण्यात घालून त्याच्या गुळण्या केल्यास तोंडातील दुर्गंधी नष्ट होते.

👉 अंघोळीदरम्यान थोडेसे मीठ डोक्यावर टाकून केस धुतल्यास डोक्यातील कोंडा नाहीसा होतो.

👉 घसा खराब झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यातील सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मामुळे घशाला आराम पडतो.

👉 बर्‍याचदा सफरचंद, बटाट्यासारख्या फळांचे काप उघड्यावर ठेवल्यास थोड्याच वेळात त्याच्यावर लालसर डाग दिसू लागतात. हे डाग न येण्यासाठी या फोडी मीठाच्या पाण्यात ठेवा.

👉 फ्रिज साफ करताना बेकींग सोडा आणि मीठाच्या पाण्याचे मिश्रण वापरा. यामुळे फ्रीजमधले सगळे डाग सहज दूर होतील. सोबत फ्रीजचे अंतरंग गंधमुक्त आणि चमकदारही होईल.

👉 घरामध्ये तांब्यापासून बनलेला वस्तू किंवा भांडी असतील तर त्यांना चमक आणण्यासाठी व्हिनेगर आणि मीठ एकत्र करून पॉलीश करा.

_*(अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा  goo.gl/rWVQVi )*_

संत्रा, मोसंबी, लिंबू सल्ला*

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

🍊 *संत्रा, मोसंबी, लिंबू सल्ला* 🍊

डिसेंबर महिन्यामध्ये लिंबूवर्गीय फळबागेमधील विविध स्थिती असून, त्यानुसार योग्य काळजी घ्यावी.

_*- डाॅ एम. एस. लदानिया, दिनकरनाथ गर्ग*_

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🍊 *अांबीया बहर व्यवस्थापन* 🍊

- अांबीया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित काबेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात अांबीया बहर घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्या प्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईड २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
- झाडाखालील तणे काढून बाग स्वच्छ करावी.
- बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.

🍊 *मृग बहर व्यवस्थापन* 🍊

- मृग बहर धरलेल्या संत्रा व मोसंबी झाडांसाठी ठिंबक सिंचन पद्धतीने सिंचन करावे. या काळात ६ वर्षांच्या झाडाला प्रतिदिन ४१ लिटर, ८ वर्षांच्या झाडाला ६५ लिटर, आणि १० वर्षांच्या झाडाला ८२ लिटर पाणी द्यावे.
- लिंबू झाडांसाठी ६ वर्षे वयाच्या झाडाला प्रतिदिन २३ लिटर, १० वर्षांच्या झाडाला ७५ लिटर पाणी द्यावे.
- मृग बहराच्या फळांचा आकार वाढविण्याकरिता, फवारणी
- एक ग्रॅम जिबरेलिक आम्ल अधिक मोनो पोटॅशिअम फाॅस्फेट किंवा डाय अमोनियम फॉस्फेट किंवा पोटॅशिअम नायट्रेट यापैकी एक १.५ किलो प्रति १०० लिटर पाणी.
- १५-२० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

https://www.facebook.com/groups/1793392297578307/

🐛 *कीड व्यवस्थापन* 🐛

लिंबूवरील पाने पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी,फवारणी प्रतिलिटर पाणी
क्विनालफाॅस दीड मिलि किंवा नोव्हॅल्युरॉन १ मिलि. किंवा डायमिथोएट १.५ मिलि.
- आवश्यकता भासल्यास वरीलपैकी कीटकनाशक बदलून पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
- या महिन्यामध्ये मृग बहरांच्या फळांवर कोळी कीडीचा प्रादुर्भाव दिसतो. कोळी प्रादुर्भावामुळे हिरव्या फळांवर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. पुढे हळूहळू ते काळ्या रंगाचे होतात. स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘लाल्या’ संबोधले जाते.
- कोळी नियंत्रणाकरिता, फवारणी प्रतिलिटर पाणी
डायकोफाॅल १.५ मिलि. किंवा इथिआॅन २ मिलि. किंवा द्राव्य गंधक ३ ग्रॅम
- आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.

🍋 *रोग व्यवस्थापन* 🍋

- झाडाच्या बुंध्यावर २ फुटांपर्यंत बोर्डोपेस्ट ब्रशने लावावी. बोर्डोपेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना प्रत्येकी ५ लिटर पाण्यात वेगवेगळा रात्रभर भिजवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून पेस्ट करावी.
- संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंक्याचा स्राव सुरू असल्यास तीक्ष्ण चाकूने खरडून स्वच्छ करून घ्यावा. त्या ठिकाणी मेटॅलॅक्झील एम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल यांची पेस्ट बनवून लावावी.

☎  *अधिक माहितीकरिता संपर्क-*
*डाॅ. एम. एस. लदानिया*,
०७१२-२५००३२५
*दिनकरनाथ गर्ग*,
९८२२३६९०३०
(केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

📚 *स्ञोत-* ॲगोवन

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​*
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

*​​टेलेग्राम चॅनेल-​​*
https://t.me/krushisamarpan

🎖 *अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_

रक्तगट आणि स्वभावाचं गणित...*_

👉 _*रक्तगट आणि स्वभावाचं गणित...*_

*LetsUp I Knowledge Katta*

एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि रक्तगट यांचा एकमेकांशी संबंध असतो. कदाचित हे ऐकायला आणि वाचायलाही हास्यास्पद वाटत असेल मात्र हे खरं आहे. कारण जशी हाताची बोटं एकसारखी नसतात तसे स्वभावही आणि रक्तगटही सारखे नसतात. जपानमधील तरूण-तरूणी चेहरा बघून नाही तर रक्तगट तपासून आपला जोडीदार निवडतात. चला तर आज जाणून घेऊया रक्तगट आणि स्वभावाचं गणित...

👉 _*A पॉझिटीव्ह*_ :

* या रक्तगटाच्या व्यक्ती उत्तम वक्त्या असतात.

* स्वभावाने हळुवार असलेल्या या व्यक्ती प्रामाणिक असतात.

* निस्वार्थी असल्याने त्या उत्तम समाजसुधारक असतात.

* यांच्या डोक्यात सतत दुसऱ्यांचं चांगलं कसं करता येईल? याचाच विचार असतो.

( _*अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवा तुमच्या WhatsApp वर FREE. त्यासाठी जॉईन करा  LetsUp - डिजिटल मॅगेझीन आणि मिळवा न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन , जॉईन करण्यासाठी क्लिक करा*_  https://goo.gl/rWVQVi )

👉 _*B पॉझिटीव्ह*_ :

* या रक्तगटाच्या व्यक्ती इतरांसाठी आदर्श व्यक्ती असतात.

* यश मिळवण्यासाठी झपाटलेल्या असतात.

* या व्यक्तींना चारचौघांत वावरण्याची आवड असते.

* मनाने संवेदनशील असलेल्या या व्यक्ती जबाबदार असतात.

* ही माणसे सत्यवचनी असतात.

👉 _*AB रक्तगट*_ :

* या रक्तगटाच्या व्यक्ती उत्तम मित्र बनू शकतात.

* मनाने स्वच्छ व निर्मळ असलेल्या या व्यक्ती पटकन कोणावर विश्वास ठेवत नाहीत.

* तसेच त्यांना कसलाही देखावा करायला आवडत नाही.

👉 _*O रक्तगट*_ :

* या रक्तगटाची माणसं सकारात्मक विचार करणारी असतात.

* यांच्यात आत्मविश्वास ठासून भरलेला असतो.

* त्यांच्याकडे उत्तम नेतृत्वगुण असतात.

* कष्टाळू वृत्ती असल्याने यश सहज मिळवतात.

* दुसऱ्यांना आनंदीत ठेवण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात.

शेततळ्यामधील मत्स्यसंवर्धनासाठी आवश्‍यक बाबी* 🐠

🌳 *कृषिसमर्पण* 🌳

🐠 *शेततळ्यामधील मत्स्यसंवर्धनासाठी आवश्‍यक बाबी* 🐠

शेततळ्यातील माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात मिळविण्यासाठी सुधारित मत्स्यसंवर्धन पद्धतीचा अवलंब करावा. तळ्यामध्ये माशांसाठी चांगली खाद्यनिर्मिती होण्यासाठी खतांचा वापर, पूरक खाद्य व्यवस्थापन आणि माशांच्या संरक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.

_*उमेश सूर्यवंशी*_

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

शेततळ्यामध्ये प्रामुख्याने रोहू, कटला, मृगळ, देशी मागूर, मरळ, तीलापिया, पंकज इ. माशांचे संवर्धन केले जाते.

- तलावामध्ये मत्स्यबीज सकाळी लवकर अथवा संध्याकाळी उशिरा सोडावे.
- तळ्यातील संवर्धनयुक्त मासे जसे की कटला, रोहू, मृगळ, कोंबडा, चंदेरा, गवत्या यांचा संवर्धन कालावधी सर्वसाधारणपणे एका वर्षाचा असतो.
- देशी मागूर या जातीच्या माशांचा संवर्धन कालावधी ५ ते ६ महिन्यांचा असतो.
- मरळ, पंकज, तिलापिया या जातीच्या माशांच्या विक्रीयोग्य वाढीचा सर्वसाधारण कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असतो.
- मत्स्यसंवर्धन करताना योग्य जागेची निवड करणे आवश्‍यक असते.

🐟 *मत्स्यबीजापेक्षा मत्स्य बोटुकली फायदेशीर* 🐟

- मत्स्यबीजापेक्षा तळ्यामध्ये मत्स्य बोटुकली सोडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
- बोटुकलीचा आकार मोठा असल्यामुळे त्यांच्या वाढीसाठी कालावधी कमी लागतो.
- मत्स्य बोटुकली इतर भक्षक माशांना कमी प्रमाणात बळी पडतात.
- मरतुकीचे प्रमाण कमी असते, त्यामुळे तळ्यातील उत्पादनवाढीस मदत मिळते.
- मत्स्य बोटुकली आकाराने मोठ्या असल्यामुळे बोटुकली नेमक्‍या हव्या त्याच प्रजातीच्या आहेत किंवा नाही हे ओळखणे सोपे जाते. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्‍यता कमी असते.
- बोटुकली संवर्धन केल्यानंतर मासे जातीप्रमाणे साधारण ८ ते १० महिन्यांत विक्री योग्य होतात, त्यामुळे तळ्यात बारमाही पाणी असणे गरजेचे नसते.
- आकार मोठा असल्यामुळे बोटुकली कृत्रिम खाद्यास चांगला प्रतिसाद देतात.
- साधारणपणे तळ्यामध्ये संवर्धनासाठी बोटुकलीचा आकार ५० ते १०० मि.मी. एवढा असावा.
- तळ्यामध्ये बोटुकलीची संचयन घनता योग्य असावी. जास्त संख्येमुळे माशांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतात.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

🐬 *तळ्याचे व्यवस्थापन* 🐬

- तळ्यामध्ये मत्स्यबीज संवर्धनापूर्वी चुना मारून घ्यावा. चुन्यामुळे तलावाच्या तळाशी साठलेले विषारी वायू नाहीसे होतात. आम्लाचा निर्देशांक वाढून तो स्थिर राहण्यास मदत होते.
- तळ्यातील पाण्यात असणारे अतिरिक्त जैविक घटक चुन्यामुळे मोकळे झाल्यामुळे वनस्पती व प्राणी प्लवंगाची वाढ योग्य प्रमाणात होते, तसेच मत्स्य बीजामध्ये रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी होते.
- एक हेक्‍टर क्षेत्राला २५० किलो या प्रमाणात तळभागावर चुना मारून घ्यावा किंवा चुना तळ्याच्या पाण्यात मिसळावा.शेततळ्यात हेक्‍टरी १००० किलो शेणखत, युरिया हेक्‍टरी ५० किलो, फॉस्फेट हेक्‍टरी ५० किलो या प्रमाणात खते वापरावीत.
- संवर्धन तलावात एकाच वेळी दोन ते तीन खते वापरली जाऊ शकतात.
- मत्स्यसंवर्धन करताना तलावातील पाण्याच्या रंगाबाबत माहिती असणे आवश्‍यक बाब आहे. तलावातील पाणी स्वच्छ असू नये. संवर्धन तलावात जमिनीचा तळ दिसत असेल तर माशांच्या आहारातील मुख्य घटक असलेल्या प्लवंगाची उत्पत्ती पाण्यात कमी आहे असे समजावे. मातीसारखा किंवा चहासारखा रंग पाण्यातील मातीच्या सूक्ष्म कणांची उपस्थिती दर्शवितो, जे मत्स्यसंवर्धनासाठी पोषक नसते. पाण्याचा हिरवा रंग वनस्पती प्लवंग दर्शवितो. पाण्याचा बदामी किंवा तपकिरी रंग प्राणी प्लवंग दर्शवितो अशा पाण्यात माशांची वाढ जलद गतीने होते.
- मत्स्य तळ्यात सुरवातीला क्षेत्रफळानुसार खते वापरून झाल्यानंतर पाण्यामध्ये वनस्पती व प्राणी प्लवंग तयार व्हायला सुरवात होते. खते मारून झाल्यानंतर सुरवातीला सर्वसाधारणपणे १५ दिवसांनंतर तळ्यात बोटुकली सोडावीत.
- माशांच्या योग्य वाढीसाठी मत्स्यसंवर्धन तलावात प्राणवायूचे प्रमाण ५ ते १० मिलिग्रॅम/ लिटर एवढे असावे.

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

🦈 *खाद्य व्यवस्थापन* 🦈

- माशांना जेवढे खाद्य खायला लागेल, तेवढेच खाद्य पुरवावे. अतिखाद्य अथवा कमी खाद्य माशांना पुरविल्यास त्याचे विपरीत परिणाम होतात.
- पूरक खाद्याचे प्रमाण तलावातील माशांचे एकूण वजन व त्यांच्या वाढीच्या अवस्था यावर अवलंबून असते.
- कटला, रोहू, मृगळ या भारतीय प्रमुख कार्प माशांना खाद्य म्हणून सरकी पेंड, शेंगदाणा पेंड, सोयाबीन पेंड द्यावी. इतर माशांचे खाद्य जाती- जातीप्रमाणे त्यांच्या खाद्य खाण्याच्या सवयीनुसार वेगवेगळे असते.
- खाद्य देण्यासाठी तलावामध्ये बांबू रोवून त्या बांबूला प्लॅस्टिकच्या पिशवीला छिद्र पाडून त्यामध्ये आवश्‍यक तेवढे खाद्य भरावे, जेणेकरून मासे पाहिजे तेवढे खाद्य खातील. त्यामुळे होणारे प्रदूषण देखील टाळता येते.

🐳 *माशांच्या संरक्षणासाठी उपाययोजना* 🐳

- पक्ष्यांपासून माशांचे संरक्षण करण्यासाठी तळ्याच्या वर पक्षिप्रतिबंधक जाळे बसवून घ्यावे.
- माशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी फिश डिसीज डायग्नॉसिस किट उपलब्ध आहेत. हे किट तळ्यावर ठेवून मशांमधील रोगाचा प्रादुर्भाव ओळखता येतो.
- मत्स्यबीज खरेदी करतेवेळी बीज रोगमुक्त असणे आवश्‍यक असते, त्यावर पुढील मत्स्यशेती व्यवस्थापन बरेच अवलंबून असते.
- माशांच्या योग्य वाढीसाठी संवर्धन कालावधीत मधून- मधून तळ्यात जीवनसत्त्वे आणि खनिजयुक्त खाद्य घटक सोडावेत.
- संहारक आणि मत्स्य भक्षक माशांच्या निर्मूलनासाठी तळ्यात वारंवार जाळी फिरवून स्थानिक व संहारक जातीचे मासे काढून टाकावेत.
- नवीन पाणी तळ्यात घेताना तलावाच्या आतल्या बाजूला बारीक जाळी बसवावी. काही रसायनांचा वापर करून देखील संहारक आणि मत्स्य भक्षक माश्‍यांचे निर्मूलन करता येते.

📲 *अधिक माहितीकरिता संपर्क -*
*उमेश सूर्यवंशी*,
९०९६९००४८९
(मत्स्यविज्ञान महाविद्यालय, महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर)

📚 *स्ञोत-* ॲग्रोवन

https://m.facebook.com/groups/1793392297578307?view=permalink&id=1980411785543023

_*​​​​|| कृषिमूलम् जगत् सर्वम् ||​​​​*_

*​​फेसबूक ग्रूप-​​*
https://www.facebook.com/groups/1793392297578307/

*​​टेलेग्राम चॅनेल-​​*
https://t.me/krushisamarpan

🎖 *अल्पावधीमध्ये '1 लाखांपेक्षा जास्त व्हिवस्' मिळवलेल्या एकात्मिक शेतीविषयक अग्रगण्य ब्लॉगला आजच भेट द्या...* 🎖
krushisamarpan.blogspot.in

_*अधिकाधिक शेअर करा...*_