शिवाजी महाराजांबद्दल एक कथा


शाहिस्तेखानला रोज "डायरी"
लिहिण्याची सवय
होती. त्या डायरीचे नाव "शाहिस्तेखान
बुर्जी"
असे आहे. त्यामध्ये "शिवरायांनी"
केलेल्या हल्ल्याच्या प्रसंग त्याने नमूद
केलेला आहे. आणि याच बुर्जीत खानानं
आणखी एक घटना नोंदवली आहे.
तो असं लिहितो,,,
"शिवराय आले तसे तुफान वाऱ्यासारखे
लालमहालातून निघून गेले. काही वेळाने गोंधळ
थांबला. शाहिस्तेखानाची एक बहिण धावत धावत
खानाकडे आली आणि म्हणाली, 'भाईजान
मेरी बेटी लापता हैं!...मेरी बेटी लापता हैं,
भाईजान!' त्यावेळी आपली बोटं
छाटलेला शाहिस्तेखान स्मितहास्य करत
म्हणाला,...'शिवाजीची माणसं तिला पळवणार
नाहीतच,
पण!
जरी त्यांनी पळवली असेल
तरी "बेफिक्र" राहा.
कारण! तो "शिवाजी राजा"
पोटच्या लेकीसारखी तिची काळजी घेईल.
"अरे! कोण विश्वास
दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर...!"
"अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून
बसली होती, नंतर
ती सापडली".
मित्रांनो हि गोष्टं सांगण्याच तात्पर्य एवढचं
कि, " आज या सबंध भारतीय
समाजाला "शिवाजी महाराजांसारख्या"
चारित्र्यवान
महापुरुषाच्या आदर्शाची खरी गरज
आहे".
!!!छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!!
!!! - जय शिवराय !!! —
अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात
"शिवाजी द मॅनेजमेंट गुरू" हा 100
मार्काचा पेपर
घेतला जातो.
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात
"आदर्श राजा असा असावा"
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो.
💥अनेक देशांमध्ये आदर्श राजे
छत्रपतींचा इतिहास
अभिमानाने शिकवतात.
पण आमचं दुर्दैव.......
आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो.
गर्व असेल
शिवाजी महाराजांच्या भूमीत
जन्म घेतल्याचा तर आदशॆ ठेऊण शेयर करा ..
शिवाजी महाराज जर मुसलमानांचे
विरोधक असते
तर …
शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख
कोण होता ?
…. "इब्राहीम खान"...!
…. ,
शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख
कोण होता ?
…"दौलत खान"....!
…,
शिवाजी महाराजांच्या
घोड-दलाचा प्रमुख कोण होता ?….
"सिद्दी हिलाल"......!
शिवाजी महाराजांचा पहिला
सर-सेनापती कोण होता ?
…. "नूर खान"…. !
शिवाजी महाराजांबरोबर
आग्र्याला गेलेला …
"मदारी मेहतर"…. …।
शिवाजी महाराजांचा एकमेव वकील
…."काझी हैदर" …।
शिवाजी महाराजांचे एकमेव
चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे
नाव
...."मीर मोहम्मद" ……
आणि
शिवाजी महाराजांना
अफझलखानाचा वध
करण्यासाठी वाघनख्या पाठवून
देणारा…
"रुस्तुमे जमाल" हा हि मुसलमान…।
जर एवढे मुसलमान
अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात
असू शकतात तर शिवाजी महाराज
मुसलमानाचे विरोधक असू शकतात
काय ?…।
शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड
होते त्यापैकी 10 मुसलमान होते … ….
शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद
पाडली नाही । एकही कुराण जाळले
नाही ….
याचा गांभीर्याने विचार या देशात
झाला पाहिजे ….
रायगड
किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे
जगदीश्वराचे मंदिर बांधले …
महाराजांनी मंत्र्याला विचारले,"जगदीश्
वराचे मंदिर बांधले" पण
माझ्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद कुठे
आहे ?…
मंत्र्याने विचारले महाराज
जागा दाखवा ….??
महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील
जागा दाखवली आणि तेथे
आपल्या मुसलमान
सैनिकासाठी मस्जिद बांधून घेतली
… हा इतिहास आपल्या देशात
का सांगितला जात नाही ?….
हा इतिहास जर समाजापुढे गेला तर
या देशात सामाजिक दुरी निश्चित
नाहीशी होईल ….
अफझल खानाला मारल्यानंतर
शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले
……
जिजाऊनि विचारले ,
अफझल खानाचे काय झाले ?
महाराज उत्तरले,
'मासाहेब'
अफझल खान मारला गेला ….
जिजाऊनि विचारले
त्याचं प्रेत कुठ आहे ?
….
महाराज उत्तरले,
प्रतापगडाच्या पायथ्याशी ….
काय म्हणाल्या जिजाऊ ?
…. शिवबा... अफझल खान जिवंत
असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, अफझल
खान संपला(मेला ) आता वैरही संपले...
तुझ्या राज्यात
कोण्या प्रेताला कोल्हया-कुत्र्याने
तोडावे हे शोभणार नाही ….
त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन कर …
आणि तुझ्या विजयाचे प्रतिक म्हणून
तेथे स्मारक बांध …। .
शिवाजी महाराजांनी अफझल
खानच्या प्रेताचे
प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले
व तेथे त्याची कबर बांधली ….
"जय शिवराय "
""16 व्या शतकात शिवनेरीवर एक
तारा चमकला ...
जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला,
पुढे हाच सिंह रयतेचा वाली झाला ,
ज्याच्या हातुन महाराष्ट्र घङला .""
कृपा करुन
हा आपल्या राजाचा इतिहास
लोकांसमोर आणून
जगाला दाखवा की,
"
आपला राजा कुठल्याही धर्माविरुद्ध
नसुन तो फक्त अन्यायाविरुद्ध होता"!!
सर्वाना विनंती आहे कि,
काळजीपूर्वक वाचा व विचार करा .
शक्य तेवढा फोरवर्ड करा..
लाईक आणी कमेंट करण्यापेकश्या शेयर
कले तर खुप आनंद होईल...

औचित्यभंग

selfie
लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर तरुण महिला खासदारांनी सभागृहातच जे 'फोटोसेशन' केले, ते सर्वथा औचित्यभंग करणारे होते. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा सोमवार हा पहिलाच दिवस. त्यामुळे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचे औपचारिक कामकाज अर्ध्या तासात संपले. त्यानंतर, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ज्या नऊ महिला खासदारांना ही फोटोसेशनची स्फूर्ती झाली, त्यांच्यात रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या दोन खासदारही होत्या. या तसेच इतर महिला खासदारही प्रथमच या लोकसभेत निवडून गेल्या असल्याने त्यांच्या मनात संसदतेल्या प्रत्येक गोष्टीची नवलाई आणि नव्हाळी असणे, स्वाभाविक आहे. आपण देशातल्या सर्वोच्च सभागृहाच्या सदस्य आहोत, याचा त्यांना अभिमानही वाटणे साहजिक आहे. मात्र, या सभागृहाचा त्यांनी स्टुडिओ बनविणे व दिल्लीतल्या उदित राज या भाजप खासदारांना तात्पुरता फोटोग्राफरचा रोल देणे, हे अनुचित घडले. संसदेचे कामकाज पाहण्यासाठी नागरिक एक तासाचा पास काढून गॅलरीत जातात, तेव्हा त्यांना असंख्य सूचना दिल्या जातात. खाली कामकाज चालू असताना एखाद्याने अगदी बसल्याबसल्या मांडी बदलली तरी सुरक्षारक्षक हलकेच जवळ येऊन दटावू शकतो. संसदेचे गांभीर्य, पावित्र्य व महत्त्व अबाधित राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. मग हाच नियम खासदारांना का नाही, असा प्रश्न मतदारांना पडू शकतो. सभागृहात दहा मिनिटे हे मोबाईल फोटोसेशन चालू होते, तेव्हा ते सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निश्चित लक्षात आले असणार. मग त्यांनी नम्रपणे या खासदारांना हा औचित्यभंग लक्षात का आणून दिला नाही? सभागृहाचे चित्रण किंवा तेथे फोटोग्राफी करण्याबाबत अत्यंत कडक नियम आहेत. अध्यक्षांची पूर्वानुमती घेतल्याशिवाय एकही कॅमेरा अगदी रिकाम्यादेखील सभागृहात प्रवेश करू शकत नाही. या खासदारांना या प्रथा आणि परंपरा कदाचित माहीत नसतील. पण त्या असे काहीतरी करीत आहेत, हे लक्षात येताच सत्ताधारी पक्षाचे प्रतोद किंवा इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आवरायला हवे होते. तसे झालेले दिसत नाही. तंत्रज्ञानाच्या घोडदौडीने हातातल्या मोबाईलमध्ये कॅमेरा आला हे खरे, पण तो कुठे वापरायचा आणि कुठे नाही, याचा विवेक सर्वांनीच बाळगायला हवा. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना आता नव्यानेच एक वर्तनावली जारी करावी लागणार, हे मात्र निश्चित.

आर्थिक आणि राजकीय आव्हाने

economic and political challenges
माधव दातार

मर्यादित राजकोषीय तूट, अल्प किंमतवाढ आणि स्थिर परकीय चलनदर ही दीर्घकालीन आर्थिक विकासाची त्रिसूत्री मानली जाते. राजकोषीय समतोल राखण्याच्या वर्तमान वेळापत्रकानुसार २०१५-१६मध्ये वित्तीय तूट ३.६ टक्के राखण्याचे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहे. मात्र राष्ट्रीय उत्पन्नवाढ अधिक गतिमान करण्यासाठी सार्वजनिक (सरकारी) गुंतवणुकीस चालना द्यावी असा एक मतप्रवाह आहे. मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनीही या मताला दुजोरा दिला आहे. यामुळे पुढील वर्षी वित्तीय तूट किती असेल ही एक महत्त्वाची बाब आहे.

प्रश्न सरकारने गुंतवणूक खर्च वाढवावा किंवा वाढवू नये, असा नसून गुंतवणूक वाढवण्यासाठी वित्तीय तूट कमी करण्याचे धोरण तहकूब करायचे का, हा आहे. एक तर सरकारच्या खर्चव्यवस्थापनाचा पूर्वानुभव बघितला तर महसुली खर्च नियंत्रणात न राखता आल्याने बहुदा भांडवली (गुंतवणूक) खर्चावर कात्री चालवली जाते. त्यामुळे गुंतवणूक वाढविण्याच्या उद्देशाने वित्तीय शिस्त सैलावली, तरी वास्तवात महसुली तूट वाढून भांडवली खर्च कमी तरी होतो, किंवा फार तर स्थिर रहाण्याचा धोका कायम असतो. क्रूड पेट्रोलियमचे भाव कमी झाल्याने सबसिडी कमी होणार आहे व क्रूडवरील आयात कर वाढविल्याने करउत्पन्नही वाढेल. ही महसुली उत्पन्नातील वाढ आणि महसुली खर्चातील बचत यामुळे वित्तीय तूट जेवढी कमी होईल, त्याप्रमाणात भांडवली खर्च वाढवला (राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत अंदाजे ०.५ टक्के ते ०.७ टक्के) तरी एकंदर वित्तीय तूट वाढणार नाही; पण असे करण्यासाठी सबसिडी आणि इतर महसुली खर्च नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान आहे.

खर्च वाढविणे नेहमीच सोपे असल्याने तसे करण्याचा सर्व सरकारांना मोह होतो, पण भांडवली खर्चाचे अपेक्षित सुपरिणाम वेळेत अनुभवास आले नाहीत म्हणजे त्याचे परिणाम फुगलेली वित्तीय तूट, देशांतर्गत भाववाढ व त्यामुळे वाढणारी व्यापार तूट आणि घसरणारा विनिमय दर यात ​दिसण्याचा आपला ताजा अनुभव आहे. २००८ साली जागतिक वित्तीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला दिलेला बूस्टर डोस गेल्या काही वर्षातील महागाईचे एक महत्त्वाचे कारण होते. आताही गुंतवणूक वाढवण्याच्या उदात्त उद्देशाने वित्तीय शिस्त झुगारली, तर त्यामुळे अर्थव्यवस्थेला लगेच काही काळ गती मिळाली, तरी वित्तीय तूट नियंत्रणास उशीर झाला की (व तसे अनेक कारणांनी होऊ शकते) राजकोषीय आणि वित्तीय अस्थैर्याची शक्यता बळावते. शिवाय परकीय वित्त भांडवल प्रवाहांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर अटळ परिणाम होत असल्याने आपली आर्थिक स्थिती आणि धोरणे याबाबत आंतरराष्ट्रीय वित्तीय निरीक्षक आणि गुंतवणूकदार यांना काय वाटते हा घटक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे तूट वाढवण्यातील संभाव्य धोके विचारात घेऊन ​वित्तीय तुटीबाबतच्या कार्यक्रमास धक्का न लावता सरकारी आणि मुख्यतः खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची नीती स्वीकारावी लागेल.

भारतातील प्रत्यक्ष करांचे प्रमाण खूप कमी​ आहे व त्यात लक्षणीय वाढ होणे आर्थिक समानतेसाठी पूरक तर ठरतेच पण शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सोयी विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य करण्यासही ते मदतीचे ठरते. भांडवली लाभ आणि लाभांश या उत्पन्न स्रोतांना किती सवलती असाव्यात यांचा जसा फेरविचार आवश्यक आहे, त्याच प्रमाणे असंघटित क्षेत्रातील प्रत्यक्ष करवसुली वाढवणे गरजेचे आहे. वारसाहक्काने जे उत्पन्न/ संपत्ती संक्रमित होते त्यावर वारसा कर पुन्हा सुरू करता येईल. विविध सरकारी विभागांकडील माहितीचे विश्लेषण (budget analysis) करून करवसुली वाढवण्याचे प्रयत्न आवश्यक आहेत. प्रत्यक्ष कराची मर्यादा आणि प्रमाणित सूट या बाबीही भाववाढीशी निगडित करून त्या ठराविक कालावधीने (दोन-तीन वर्षांनी) बदलणे प्रत्यक्ष करपद्धती सुलभ बनविण्यास उपयुक्त ठरेल. अप्रत्यक्ष करांबाबत असेच धोरण अपे​क्षित असले, तरी प्रत्यक्षात कराच्या दरात adhoc बदल करण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. त्याबाबतही फेरविचार आवश्यक ठरेल.

सार्वजनिक उद्योगांच्या भागभांडवलाचा काही भाग खासगी क्षेत्राला उपलब्ध करण्याची पद्धत सुरू होऊन अनेक वर्षे झाली, तरी त्याबाबत अद्याप पुरेशी वैचारिक स्पष्टता नाही. त्यामुळे अंदाजपत्रक सादर करताना तूट नियंत्रणात राखण्यासाठी निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठरवणे हा सुलभ उपाय ठरतो व अनेकदा हे उद्दिष्ट साध्य न झाल्याने वित्तीय तूट वाढण्याचे ते एक कारण बनते! उपक्रमावरील सरकारचे नियंत्रण कायम राखत १०/१५/२० भाग भांडवलाची निर्गुंतवणूक करण्यातून ना सार्वजनिक क्षेत्र बदलते, ना ते अधिक स्पर्धात्मक बनते! जे उद्योग तोट्यात चालतात त्यांना चांगली किंमत मिळत नसल्याने त्यांची विक्री करता येत नाही आणि जे चांगले नफ्यात चालतात ते सरकारला आपल्या कब्जात राखायचे असतात. सार्वजनिक उद्योगांची फेररचना करण्याचा एक मार्ग या पद्धतीने निर्गुंतवणुकीचा विचार केला, तर कोणत्या उपक्रमातून सरकार बाडेर पडेल.

वित्तीय क्षेत्रात सरकारच्या मालकीचे अनेक उपक्रम आहेत व त्याबाबतही वैचारिक स्पष्टता आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्यवस्थापन कसे सुधारायचे, याबबात पी. जे. नायक समितीने अनेक सुधारणा सुचविल्या आहेत. त्याबाबत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट होणे अगत्याचे आहे. फक्त अतिरिक्त भांडवल पुरवून सरकारी बँकांचे प्रश्न सुटणार नाहीत आणि त्यांची कार्यक्षमता सुधारल्याशिवाय त्यांना बाजारातून पुरेसे भांडवलही उभारता येणार नाही. वित्तीय क्षेत्राच्या विविध नियंत्रकांच्या कार्यपद्धतीत सुधारणा/ बदल होण्याची गरज नियमितपणे वारंवार होणाऱ्या गैरप्रकारांवरून दिसते. या बाबतीत श्रीकृष्ण समितीच्या शिफारसींवर सरकारच्या कृती कार्यक्रमाची दिशा अंदाजपत्रकातून प्रतिबिंबित व्हायला हवी.

(अर्थशास्त्राचे अभ्यासक व लेखक)

उद्योजकतेची ‘व्ह्यूक्लिप’

VU-clip
>> सिद्धार्थ केळकर

उद्योजकतेचीही आस असावी लागते. ती एक अडथळ्यांची शर्यत आहे, हे माहीत असूनही आणि नोकरी करून 'सुखी' आयुष्य जगणे शक्य आहे, हे माहीत असूनही काहीजण त्यात पडतात. मूळचा पुण्याचा आणि आता अमेरिकेत उद्योग करणारा निखिल जकातदार याच वर्गात मोडतो...
....

वीस वर्षांपूर्वी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून (सीओईपी) इंजिनीअर झाल्यानंतर निखिल जकातदारलाही कदाचित चारचौघांसारखी एखादी नोकरी पकडून 'सेटल' होता आले असते; मात्र, त्याने जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू केला, तेव्हा स्वतःचे काहीतरी निर्माण करून ते टिकविण्यामध्ये असलेली 'पॅशन' त्याने अनुभवली. हे 'स्वतःचे काहीतरी' निर्माण करण्याची 'किक' बसण्यासाठीही 'काहीतरी' निमित्त लागते. इंजिनीअरिंग झाल्यानंतर निखिलने उच्च शिक्षणासाठी अमेरिका गाठली. तेथे मास्टर्सनंतर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया येथे पीएचडी करताना या उद्योजकतेच्या स्वप्नाने त्याची झोप उडवली. तो सांगतो, 'कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी आदर्श स्थिती या ठिकाणी होती. इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि कम्प्युटर सायन्स या विषयांतील पीएचडी प्रबंधाचे उद्योजकीय कल्पनेत रुपांतर करण्याचा माझा मनोदय होता; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे मला माझी 'पॅशन' या निमित्ताने गवसली.'

स्वतंत्र व्यवसाय करण्याचा निखिलचा प्रवास खूप रोचक आहे. त्यासाठीची पहिली मूळ कल्पना ही निखिल आणि त्याच्या कंपनीच्या सहसंस्थापक मित्रासाठी त्यांचा पीएचडीचा प्रबंध हीच होती. त्यात इतरांच्या सहकार्याने त्यांनी काही बदल केले आणि नवी दिशा निश्चित केली. या कल्पनेतून साकारलेल्या योजनेला बर्कले हास बिझनेस स्कूलतर्फे आयोजिण्यात येणाऱ्या 'बर्कले बिझनेस प्लॅन' स्पर्धेत पारितोषिक मिळाले. निखल सांगतो, 'या स्पर्धेकरिता सिलिकॉन व्हॅलीतील व्हेन्चर कॅपिटलिस्ट परीक्षक होते. त्यातील एकाने आमच्या कंपनीसाठी निधी उभारण्याची तयारी दर्शवली. आम्ही कॉलेजमध्ये शिकत असताना कंपनीसाठी तीन लाख डॉलर उभे केले. मात्र, आमच्या व्हेन्चर कॅपिटलिस्टने भांडवल घालण्याचे मान्य केल्यानंतर आम्हाला सर्वप्रथम आमचा बिझनेस प्लॅन पुन्हा नव्याने लिहून काढायला सांगितले. याचे कारण असे, की स्पर्धेमध्ये आमचे परीक्षण करताना त्याला आवडली होती, ती आमची कल्पना आणि इच्छाशक्ती. त्याच्या मते, बिझनेस प्लॅनचा तपशील बाळबोध होता. त्यामुळे तो अधिक व्यावहारिक करण्यासाठी पुन्हा लिहून काढण्याचा सल्ला त्याने दिला! व्यवहारात काय उपयोगी पडेल, यावर लक्ष केंद्रित करण्याचा धडा मी यातून शिकलो!'

निखिलने त्यानंतर उद्योजकतेची गाडी पकडली आणि करिअरचा प्रवास वेगाने होत राहिला. सतत वेगळे काही करण्याची आणि दरवेळेस अधिकाधिक सुधारणा करण्याची ऊर्मी असेल, तर उद्योजकतेचे क्षितिज कसे विस्तारते, याचे निखिल हे उत्तम उदाहरण. निखिलने आतापर्यंत स्वतः सुरू केलेल्या तीन कंपन्या काहीशे मिलियन अमेरिकन डॉलर्सला विकल्या गेल्या आणि आता चौथी 'व्ह्यूक्लिप' नावाची कंपनी तो चालवतो आहे. तीन कंपन्या विकून चौथी सुरू करण्याचे कारण काय? निखिलकडे याचे इंटरेस्टिंग उत्तर आहे. तो सांगतो, 'ज्या व्यवसायात थेट ग्राहकांशी संपर्क येतो, असा व्यवसाय करून पाहायचा होता. पहिल्या तीन कंपन्यांच्या कामकाजात हा थरार नव्हता. तो मी शोधला.'

निखिलची ही व्ह्यूक्लिप कंपनी काय करते, तर ती कोणत्याही मोबाइल हँडसेटवर उत्तम दर्जाचा व्हिडिओ पाहायची मुभा देते. अर्थात, त्यासाठी इंटरनेट कनेक्शन ही प्राथमिक अट आहेच; पण जी मुभा केवळ स्मार्टफोन किंवा अँड्रॉइड वा अन्य मोजक्या ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या फोनमध्ये मिळू शकते, ती कोणत्याही साध्या मोबाइल हँडसेटवर मिळते, हे याचे वैशिष्ट्य. स्वस्तात आणि केव्हाही उपलब्ध असलेले मनोरंजन ही आता गरज बनली आहे. त्यातून भारतात ज्या प्रमाणात मोबाइल फोन्सची संख्या वाढते आहे, ते लक्षात घेता, याला प्रचंड मागणी असणार. शिवाय कोणत्याही हँडसेटवर ही सेवा घेणे शक्य असल्याने 'केवळ काही जणांसाठी' असेही 'व्ह्यूक्लिप'च्या सेवेचे स्वरूप नाही. निखिलच्या कंपनीचा हाच 'बिझनेस सेन्स' त्यांना इतरांपेक्षा चार पावले पुढे ठेवून आहे. संशोधन आणि विकास हा त्याच्याही व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे; पण निखिलची संशोधन आणि विकासाची व्याख्या काय, असे त्याला विचारले, तर उत्तर मिळते, 'सातत्याने सुधारणा. कायम कालसुसंगत आणि ग्राहकांच्या अपेक्षांशीही सुसंगत राहणे. माझ्यासाठी संशोधन आणि विकास म्हणजे केवळ बाजारपेठेच्या आवश्यकतेला पूरक असा व्यावहारिक विकसनशील दृष्टिकोन अवलंबणे इतकेच नसून, मुळात ग्राहकांशी संवाद साधून बाजाराच्या आवश्यकता जाणून घेणे.'

निखिलची दैनंदिनी फार इंटरेस्टिंग आहे. निखिलचा दिवस कॅलिफोर्नियात स्थानिक वेळेप्रमाणे पहाटे अडीचला सुरू होतो. भारतात त्यावेळी दुपारचे तीन वाजलेले असतात, तर आग्नेय अशियात साडेपाच. त्यामुळे कंपनीच्या या ठिकाणच्या कार्यालयांशी संपर्क साधून निखिलला आढावा घेणे शक्य होते. पहाटेच्या आढाव्यानंतर ऑफिसला जाताना अर्ध्या तासाच्या प्रवासात तो गाडीतून अमेरिकेच्या बाहेरच्या कार्यालयांशी संपर्क साधतो. ऑफिसमध्ये ९ ते ११ बैठक आणि नंतर नियमित काम. त्याचा दिवस रात्री ११ला संपतो!

गोल्फ हा निखिलचा आवडता खेळ. तो तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, स्थिर राहायला शिकवतो, असे त्याचे म्हणणे. निखिलने त्याची 'टिंबर टक्नॉलॉजीज' ही पहिली कंपनी ज्या 'तोक्यो इलेक्ट्रॉन' या जपानी कंपनीला विकली, तेथे गोल्फ हा व्यवसायाचा एक भाग होता. त्यांच्या अनेक बैठका तर गोल्फ कोर्सवरच झाल्या होत्या. निखिल सांगतो, 'आताच्या पिढीत प्रचंड आत्मविश्वास आहे. त्यांना तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. नऊ ते पाच नोकरी सोडून त्यांना स्वतःच्या कल्पनाही राबवायच्या आहेत. त्यासाठी गरज आहे, ती उद्योजकतेची ज्योत तेवत ठेवण्याची, आपल्या कल्पनेवर विश्वास ठेवण्याची आणि अपार मेहनत घेण्याची. एवढे करूनही कदाचित कल्पना अयशस्वी ठरेल; पण तुमच्यातील 'पॅशन' तुम्हाला सर्व अडथळ्यांमध्ये टिकून राहायला मदत करेलच.'

पक्ष संसदेत, नेता सुटीवर!

rahul-gandhi
स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात मध्यवर्ती राहिलेल्या काँग्रेस पक्षाने पक्षांतर्गत उद्रेकाच्या अनेक यादवी पचवल्या आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील कामराज योजना असो की, इंदिरा गांधी यांच्या कालावधीतील ओल्ड गार्ड‍ विरुद्ध यंग टर्क असो. पक्षांतर्गत उद्रेकातून दरवेळी काँग्रेसची पडझड झाली तरी नेहरू-गांधी परिवाराच्या मागे उभ्या राहिलेल्या काँग्रेसला त्यातून कायम बळ मिळत आले आहे. हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पक्षांतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर उभा आहे, असे दिसते. पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध राहुल गांधी आणि त्यांची टीम असा संघर्ष सुप्त स्वरूपात गेले कित्येक दिवस सुरू असून तो आता अगदी टोकाला पोहोचलेला दिसतो. राहुल गांधी यांनी ऐन अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या तोंडावरच सद्य राजकीय परिस्थितीचे चिंतन करण्यासाठी घेतलेल्या सुटीमागील खरे कारण हेच आहे, असे गांधीपरिवाराच्या जवळच्या नेत्यांचेही म्हणणे आहे. राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या काळात यश कशाला म्हणतात हे जणू काँग्रेस पक्ष विसरल्यातच जमा झाला आहे. त्यामुळे, या अपयशाचे खापर अध्यक्षपदाकडे वाटचाल करणाऱ्या राहुल यांच्यावर फुटणे स्वाभाविकच होते. राहुल आणि त्यांच्या टीमचे मात्र याबाबत वेगळे मत आहे. राहुलना काँग्रेस पक्षात अनेक बदल करावयाचे आहेत. पक्षातील जुन्या नेत्यांना ते मान्य नसल्याने ते यात अडथळे आणतात. त्यामुळे, राहुल यांना मनाप्रमाणे व्यूहरचना आखता येत नाही आणि पराभव झाल्यावर मात्र त्याचे संपूर्ण खापर त्यांच्या माथी फोडले जाते, असे राहुल यांना वाटते. यात राहुल यांचा सर्वाधिक रोष हा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल तसेच जनार्दन द्विवेदी यांच्यावर असल्याची उघड चर्चा काँग्रेस पक्षात सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या संयमी स्वभावामुळे तसेच त्यांची एकंदरीत खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांना फार त्रास होऊ नये म्हणून या जुन्या लोकांशी टोकाची लढाई लढताही येत नाही आणि त्यांना पक्षातील महत्त्वाच्या पदांवरून दूरही करता येत नाही, अशा कचाट्यात राहुल गांधी सापडल्यामुळेच त्यांनी या लढाईला वेगळ्या पद्धतीने टोकापर्यंत नेले आहे. १९६९ साली इंदिरा गांधी यांनादेखील बँक राष्ट्रीयीकरण असो अथवा संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय असो पक्षातील तेव्हाचे जुने नेते मोरारजीभाई देसाई, संजीव रेड्डी, निजलिंगप्पा, स. का. पाटील आदींनी तीव्र विरोध केला होताच. मात्र, जनतेची नाडी अचूक ओळखणाऱ्या इंदिरा गांधी यांनी या सर्व जुन्या नेत्यांना एकटे पाडले आणि पक्षावर भक्कम पकड बसवली. मात्र, इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात खूप फरक आहे. जनता पार्टीने पराभव केल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी इंदिराजी स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. बिहारमधील बेलची येथे दंगा झाला. वाहन मिळाले नाही तेव्हा इंदिरा गांधी हत्तीवरून त्या गावात पोहोचल्या होत्या. आणीबाणीमुळे नाराज झालेले भारतीय जनमानस क्षमाशील आहे, यावर विश्वास असलेल्या इंदिरा गांधींनी लोकसंपर्क सोडला नाही. राहुल गांधी यांच्या आजवरच्या वाटचालीत आपल्या आजीतील एकही गुण अजूनतरी दिसलेला नाही. राजकारण वर्षाचे ३६५ दिवस व दिवसाचे २४ तास करावे लागते. त्यात पक्षांतर्गत वा पक्षाबाहेरील आव्हानांमुळे उद्विग्न होऊन सुटीवर जाणे, हा काही उपाय नसतो. राहुल गांधी यांची पक्षाला नवा चेहरा देण्याची लढाई योग्य असली तरी त्यांनी निवडलेले हत्यार चुकीचे आहे. त्याने त्यांची प्रतिमा अधिकच मलीन होण्याचा धोकाच अधिक संभवतो.

केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीटेक कसं करू?


स्वाती साळुंखे

मी १९९५ मध्ये डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग केलं असून एका नामांकित संस्थेत नोकरी करत आहे. चांगल्या करिअरसाठी आणि पगारवाढीसाठी मला केमिकल इंजिनीअरिंगमध्ये बीई किंवा बीटेक करण्याची इच्छा आहे. कोणत्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून मला कॉरस्पाँडन्स पद्धतीने मला डिग्री कोर्स करता येईल? कर्नाटक ओपन स्टेट युनिव्हर्सिटी ही एआयसीटीइ आहे की यूजीसी?

- श्रीकांत शिंदे

विश्वासार्ह इन्स्टिट्यूट्सची माहिती मिळवण्यासाठी डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोच्या वेबसाइटला भेट द्या. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक पात्रता आणि निकष काय याची माहितीसुद्धा तुम्हाला वेबसाइटवर मिळेल. कर्नाटका ओपन स्टेट युनिव्हर्सिटी ही एक मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी आहे. यूजीसी/एआयसीटीईच्या वेबसाइटवरून तुम्हाला मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटींची यादी मिळवता येईल. याव्यतिरिक्त इतर पर्यायांसाठी तुम्ही इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (एएमआयई)शी संपर्क साधू शकता.

माझ्या मुलीला एसएससीला ७९ टक्के मार्क्स मिळाले आहेत. ती आता बारावी कॉमर्सला आहे. तिने गणित विषय घेतला आहे. तिला आर्किटेक्ट, कम्प्युटर किंवा तत्सम कल्पक विषयात रस आहे. तिने पुढे काय करावं?

- संजय सोनावणे

आर्किटेक्चर कोर्सला प्रवेश घेण्यासाठी बारावीला (गणित विषयासह) किमान ५० टक्के मार्क्स मिळणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रवेश परीक्षा आणि अॅप्टिट्यूड टेस्ट पास व्हावी लागते.याव्यतिरित्त तुमच्या मुलीसाठी आयटी, डिझायनिंग आदी पर्याय आहेत. याशिवाय, ती ग्राफिक्स, वेब डिझायनिंग आदीपैकी कोणताही शॉर्ट टर्म किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकते.

मी आताच इकॉनॉमिक्समध्ये बीए केलं आहे. मला आयएमएफ आणि इंटरनॅशनल कमॉडिटी मार्केट विषयात संशोधन करायचं आहे. या संबंधित एखादा कोर्स आहे का?

-अविनाश कदम

तुम्ही एमसीएक्स, एनसीडीइएक्स इन्स्टिट्यूट ऑफ कमॉडिटी मार्केट्स अँड रिसर्च यासारख्या संस्थांमधून पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स किंवा ट्रेनिंग घेऊ शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आयएमएफच्या अधिकृत वेबसाइटला भेट देता येईल आणि त्या अनुषंगाने तयारी करा.

परीक्षेला जाताना....

आनंद मापुस्कर

फेब्रुवारी-मार्च महिना म्हणजे बोर्ड परीक्षांचा हंगाम. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या डोक्यावर प्रचंड टेन्शन असतं. वर्षभर भरपूर अभ्यास केल्यानंतर आता प्रत्यक्ष परीक्षेची वेळ आलीय. या काळात नेमकी काय-काय काळजी घ्यायला हवी, ते आम्ही सांगतोय खास तुमच्यासाठी...

करिअरच्या दृष्टिने पुढील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बोर्ड परीक्षेतल्या गुणांना खूप महत्त्व असतं. त्यामुळे विद्यार्थी वर्षभर भरपूर अभ्यास करत असतात. या अभ्यासानंतर प्रत्यक्ष परीक्षेची वेळ जसजशी जवळ येते तसतसं अनेक विद्यार्थ्यांचं टेन्शन वाढायला लागतं. प्रत्यक्ष परीक्षेच्या काळातलं नियोजन योग्य पद्धतीने केल्यास परीक्षेत यश मिळवणं अवघड नाही.

घरामधलं वातावरण

हल्ली बोर्डाच्या परीक्षेसाठी बहुसंख्य पालक सुट्टी काढतात. विद्यार्थ्याच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाते. अति काळजी केली जाते. या सर्व वातावरणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होतो आणि त्यांच्या मनावर ताण येतो. अनेकांना परीक्षेचा ताण असह्य होतो आणि पर्यायाने त्यांचा परफॉर्मन्सही घसरतो. परीक्षेच्या काळातील घरचं वातावरण हे आनंदी व नेहमीप्रमाणे असलं पाहिजे.

परीक्षेपूर्वीचं व्यवस्थापन

परीक्षेतल्या यशासाठी वर्षभर सातत्याने केलेले प्रयत्न आवश्यक असतातच. पण परीक्षेच्या ऐन तोंडावर काय लक्षात घ्यायला हवं, त्याचा प्रामुख्याने विचार करू. परीक्षा जशी जवळ येऊ लागते, तसा मानसिक ताण वाढत जातो. योग्य ताण हा तुमचा ड्रायव्हिंग फोर्स ठरू शकतो. पण 'अतिताण' हा नकारात्मक परिणाम करू शकतो. मग मनावरचा ताण योग्य तेवढाच आहे की नाही, हे कळणार कसं? पुढील काही लक्षणं पाहा.

नाडीचे ठोके अतिजलद पडणं. हृदयाची धडधड वाढून मन त्यावर केंद्रित होणं.

हातापायांची चुळबुळ होणं, मुंग्या येणं.

डोळ्यांना थकवा आल्यासारखं वाटणं.

नकारात्मक विचार मनात येणं. उदा. परीक्षेत आपल्याला काही आठवणार नाही, अभ्यासक्रमाबाहेरचं किंवा ऑप्शनला टाकलेल्या भागांवरच प्रश्न विचारले जातील इत्यादी.

शरीरात जडपणा, मंदपणा येऊन थकवा वाटणं इत्यादी.

भूक मंदावणं / अति खावंसं वाटणं

वरील लक्षणं दिसत असल्यास आपल्या मनावर अवाजवी ताण आहे, असं समजावं. या ताणाचं आधी योग्य व्यवस्थापन करायला हवं. त्यासाठी काही पर्याय पुढीलप्रमाणे असू शकतात.

दीर्घ श्वसन

मन आणि शरीराचं संतुलन टिकवण्यासाठी श्वसनावर नियंत्रण ठेवायला हवं. मेंदूला प्राणवायूचा पुरवठा नीट झाल्याने थकवा पळून जातो. त्यामुळे कार्यक्षमता वाढवण्यासाठी दीर्घ श्वसनाचा उपयोग होतो. हा दीर्घ श्वास सावकाश घ्यावा. काही क्षण तो फुफ्फुसांमध्ये रेंगाळून देऊन हळूहळू बाहेर सोडावा. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका समोर आल्यावर आलेला तणावही अशा दीर्घ श्वसनाने झटक्यात नियंत्रणात येऊ शकतो.

कल्पनाचित्रं (Visualisation)

परीक्षेचा येणारा तणाव हा वर उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्याला काही आठवणार नाही, प्रश्न कठीण असतील अशा नकारात्मक विचारांमुळे निर्माण होतो. अशावेळी एका ठिकाणी शांतपणे बसून सात-आठ वेळा प्रथम दीर्घ श्वसन करावं. शक्यतो मन प्रसन्न करणारं शांत सुरावटींचं संगीत ऐकावं. डोळे बंद करून मनाला आता परीक्षेच्या बाबत सकारात्मक चित्र दाखवावं. उदाहरणार्थ, माझा पूर्ण अभ्यास झाला असल्याने मी आत्मविश्वासाने परीक्षाकेंद्रात जात आहे, पेपरमध्ये आलेले प्रश्न आपल्याला चांगले लिहिता येत आहेत, आपण अचूक उत्तरं लिहीत आहोत अशा कल्पनाचित्रामुळे मनोबल वाढायला मदत होते, हे संशोधकांनी सप्रमाण सिद्ध केलं आहे. थोडा वेळ टीव्ही पाहणं, संगीत ऐकणं, लहान बाळांशी खेळणं, बाहेर फिरून येणं अशा उपायांनीही तणाव नियंत्रित करता येतो.

बहुतेक विद्यार्थी शेवटच्या क्षणीदेखील नवीन नोट्स, पुस्तकं मिळवण्याच्या नादात असतात. परीक्षेच्या महिनाभर आधी नवीन अभ्यास करण्याऐवजी आतापर्यंत केलेल्या गोष्टींचा सराव करावा. केलेला अभ्यास अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी काय करता येईल, याचा विचार करा. उदाहणार्थ, मुद्यांना अधोरेखन करणं, सुवाच्य-सुटसुटीत पद्धतीने लिहिणं, सुबक आकृत्या, ग्राफचा सराव करणं इत्यादी.

परीक्षा काळातले आहार-विहार

परीक्षेच्या काळात तणावामुळे आपल्या आहार आणि विहाराच्या सवयी बदलतात. जास्त अभ्यास करण्याच्या नादात जागरणं वाढतात. याचवेळी तेलकट, अरबट-चरबट पदार्थ खाल्ले जातात. मित्रांनी मिळून अभ्यास करताना हॉटेलमध्ये खाणं होतं. स्वाभाविकच या सर्वाचा परिणाम शरीरावर होतो. अ‍ॅसिडिटी वाढणं, डोके दुखणं आदी गोष्टी सुरू होतात.

काय खाल?

दूध, ताक, लोणी, तूप.

फुलका, पोळी, ज्वारी-बाजरीची भाकरी, वरण-भात, खिचडी आदी पदार्थ.

मूग, तूर, मटकी, मसूर आदींच्या उसळी.

पालक, मेथी, दुधी, पडवळ, भेंडी, घोसाळी, आदी भाज्या.

द्राक्षं, पपई, सफरचंद, संत्री, मोसंबी, डाळींब आदी फळं.

काय टाळाल?

चीज, पनीर, श्रीखंड, आंबट दही, आइस्क्रीम, कोल्ड्रींक्स, सीताफळ, पेरू, फळांपासून तयार केलेले मिल्कशेक्स, प्रोसेस्ड फूड.

परीक्षाकाळातला दिनक्रम

सकाळी लवकर उठावं.

थोडा वेळ बाहेर फेरफटका मारावा. सूर्यनमस्कारसारखा व्यायाम करावा. जेणेकरून शरीरात रक्ताभिसरण होऊन ताजंतवानं वाटेल आणि मनावरचा ताणदेखील हलका होईल. घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी वा स्कार्फ घालावा. कडक उन्हापासून डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा.

बराच वेळ अभ्यास करून डोळ्यांवर ताण येतो. तेव्हा थोडा वेळ डोळे बंद करून त्यावर काकडीचे काप ठेवावेत.

परीक्षाकाळातील व्यवस्थापन

रात्रीचं जागरण टाळावं. अकारण साहसी प्रयोग करू नयेत. (झाडावर चढणं, अवजड वस्तू उचलणं). सुरी, कात्री वगरे धारदार वस्तूंचा जपून वापर करावा. परीक्षेच्या ठिकाणी जाताना सायकल वा अन्य वाहन जपून चालवावं.

परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यावर तसंच पेपर लिहिताना कोणाशीही बोलू नये. घशाला कोरड पडत असल्यास लिमलेटच्या गोळ्या जवळ ठेवाव्यात. उत्तरपत्रिकेवर बारकोड स्टिकर व हॉलोक्राफ्ट स्टिकर योग्य ठिकाणी चिकटवावं. उत्तरपत्रिकेवर योग्य ठिकाणी स्वतःची सही करावी. उत्तरपत्रिकेवर कुठेही स्वतचं नाव, पत्ता, फोन नंबर, जात, धर्म इत्यादी गोष्टी लिहू नका.

प्रत्यक्ष उत्तरपत्रिका लिहिण्यास सुरुवात करण्याआधी समास आखून घ्या. अक्षर शक्य तितकं नेटकं व स्वच्छ काढा. एखादं उत्तर बदलायचं असल्यास जुन्या उत्तरावर काट मारून नवीन उत्तर लिहा. परीक्षेच्या काळाचंही व्यवस्थित नियोजन करा.

आधी सर्व प्रश्नपत्रिका वाचून काढा. जो प्रश्न सोपा वाटत असेल, तो आधी सोडवा. पहिल्या अर्ध्या ते एक तासामध्ये गाळलेल्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरं लिहा. यासारखे पैकीच्या पैकी गुण मिळवणारे प्रश्न सोडवा. त्यानंतर थोडक्यात उत्तरं द्या. नंतर निबंधासारख्या दीर्घोत्तरी प्रश्नांकडे जा. थोडा विचार करून लिहिण्याची उत्तरं शक्यतो नंतर लिहावीत.

गणितासारख्या विषयामध्ये स्टेप्सना गुण दिले जातात. त्यामुळे विज्ञान वा गणित विषयाची उत्तरं लिहिताना स्टेप्सना महत्त्व आहे. यात अंतिम उत्तर चुकलं तरी स्टेप्सना मार्क दिले जातात.

उत्तरपत्रिकेत मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आकृत्या तसंच आलेखांचा वापर करावा. आकृत्या एचबी पेन्सिलने काढाव्यात.

भूमितीच्या परीक्षेत आकृत्या वा रचना काढण्यासाठी कंपासपेटीतील साधनांचा वापर करा.

दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरं लिहिताना उत्तरांचे मुद्यांनुसार भाग करावे. नवीन मुद्दा लिहिताना त्याला अंडरलाईन करा, तसंच नवीन परिच्छेद करा.

सारांश लेखन करताना त्यातले मुद्दे लक्षात घेऊन त्याचाच सारांशात उल्लेख करावा. निबंध लेखन करताना वर्तमानपत्रं, साप्ताहिकं यांच्यातले लेखांचा उपयोग होऊ शकतो. निबंधामध्ये एखाद्या विषयावरील तुमचे विचार, विषयाची मांडणी हे महत्त्वपूर्ण असतात. त्या विषयातील अद्ययावत माहितीसुद्धा उपयुक्त ठरू शकेल.

गणितासारख्या विषयात सूत्रं लक्षात ठेवावीत. भाषांमध्ये व्याकरणाकडे नीट लक्ष द्यावं. गणितासारखे पैकीच्या पैकी मार्क्‍स आपल्याला व्याकरणात मिळू शकतात.

उत्तरपत्रिका लिहिताना परीक्षकांच्या मानसिकतेचा विचार केल्यास तुम्ही आपल्या लिखाणामध्ये योग्य बदल करू शकता. साधारणतः पाच ते दहा मिनिटं एक उत्तरपत्रिका परीक्षकासमोर असते. आपलं अक्षर सुवाच्च व नेटकं असेल, खाडाखोड कमी असेल, तर उत्तरपत्रिका तपासताना परीक्षकांना नक्की बरं वाटेल.

पेपर संपवून बाहेर आल्यानंतर शक्यतो त्यासंबंधी चर्चा करणं टाळावं. काय काय उत्तरं लिहिली आहेत, हे ताडून पाहण्याचा मोह विद्यार्थी व पालकांनी टाळावा.

परीक्षेच्या काळात पालकांनी तसंच हितचिंतकांनीसुद्धा आपल्या उत्साहाला आणि चिंतेला आवर घातला पाहिजे. दहावी, बारावी, पदवी परीक्षा यांच्या काळात अगदी पेपरला जाईपर्यंत फोन करून शुभेच्छांचा भडिमार विद्यार्थ्यावर केला जातो. याचंदेखील विद्यार्थ्यांवर नकळत दडपण येतं हे लक्षात घ्यावं.

एखाद्या विषयात अभ्यासक्रमाबाहेरचा प्रश्न आला तर घाबरू नये. त्या परिस्थितीत बोर्डाकडून पूर्ण गुण दिले जातात.

थ्रीलिंग ‌हरिश्चंद्रगड


shrggad

भटकंती करणे हा माझा आवडता छंद. मग नेहमीच नवनवीन थरारक अशा ठिकाणांच्या शोधात असतो. यंदा ठरवलं होत काहीही झालं तरी या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच स्वागत हे अशा ठिकाणी करायचं की जे संपूर्णपाने मानवी हस्तक्षेपापासून दूर असल पाहिजे, आणि डोळ्यासमोर आला तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील हरिश्चंद्रगड- कोकणकडा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे तीन क्रमांकाचे शिखर म्हणजे तारामती शिखर.

३० तारखेच्याच मध्यरात्री कोल्हापूरहून हरिश्चंद्र गडाकडे गाडीने प्रयाण केले. थंडगार वाऱ्यातून गाडी सुसाट पुण्याच्या दिशेने निघाली. पुण्यातून पुढे पिंपरी चिंचवडमधून नाशिक रोडला गाडी लागली आणि पहाटेच्या गुलाबी थंडीत हळूच खिडकीतून आसपासचा प्रदेश न्याहाळू लागलो. सकाळी ७ च्या सुमारास आळे फाटा या गावी पोहचलो. हॉटेलमध्ये फ्रेश होऊन गरमा गरम पोहे आणि वाफाळत्या चहाचा मनसोक्त आस्वाद घेतला. आणि पुन्हा गाडीने हरिश्चंद्रगड- कळसुबाई शिखर या अभयारण्याच्या दिशेने आगेकूच केली.

जस-जस हरिश्चंद्रगड जवळ येत होता तस तस सह्याद्रीच रौद्र रूप उघड्या डोळ्यांनी अनुभवायला मिळत होत. उंचच्या उंच अशा डोंगर रंग, त्यामध्ये वसलेली छोटी गावे आणि घनदाट अशी झाडी या वातावरणात हरिश्चंद्रगड मनास अधिकच आतूर करत होता.अखेर वळणावळनाच्या एकेरी आणि दुतर्फा घनदाट रस्त्यावरून साधारण ११ च्या सुमारास मौजे पाचनई या गावी पोहचलो. याठिकानाहून आपणास कळसुबाई शिखराकडेही जाता येते. समोर हरिश्चंद्रगड हिमालयासारखा अजस्त्र भासत होता. हत्तीच्या सोंडेसारखा एक निमुळता पण लांब असा गडाचा भाग खूपच हुबेहूब दिसत होता.

ऊन डोक्यावर आलेलं तरीदेखील पायपीट करण्याचा निर्णय घेतला व रानातील मळलेल्या वाटेने गड चढण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा सोपी वाटणारी वाट हळूहळू बिकट होत होती. एकदमच अवघड असणाऱ्या ठिकाणी लोखंडी रेलिंग लावले आहेत. काही ठिकाणी तर अक्षरशः दरीच्या काठावरून चालव लागत होत. थ्रील अनुभवायचं होत तर हे सर्व मान्य करावच लागल. उंच अशा कातळामधून जणू ही वाट कोरलेलीच आहे अस वाटत होत. सुमारे दीड दोन तासांच्या पायपिटीनंतर ३.५ किलोमीटरचा हा पायी प्रवास पूर्ण झाला आणि समोर दिसू लागल मुख्य शिवलिंग असलेल मंदिर,हरिश्चंद्र मंदिर, तारामती शिखर, केदारेश्वर गुहा.

येथील बरीचशी मंदिरे ही भग्नावस्थेत आहेत. मुख्य मदिर मात्र अजूनही सुस्थितीत आहे. या ठिकाणी प्राचीन शिवलिंग आहे. या मंदिरावर नक्षीकाम केलं आहे ते नक्षीकाम इतर मंदिराप्रमाने नसून या नक्षीकामाचे वैशिष्ट म्हणजे ही नक्षी नंदीच्या पायाच्या ठसे दर्शवते. याच मंदिराच्या मागे स्वछ व पिण्यास योग्य पाण्याचे टाके आहेत. याच ठिकाणी जेवण उरकून थंडगार अशा पाण्याने मन तृप्त झालं. यानंतर कोकण कड्याकडे चालू लागलो. या कोकण काड्याच वैशिष्ट म्हणजे याची उंची ही १८०० फुटांपेक्षा जास्त आहे. पूर्णपणे उभा कातळ खरच सह्याद्रीच खर रूप दाखवतो. या ठिकाणाहून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका, पुण्यातील जुन्नर तालुका याचं विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. इथून दिसणारा नाणेघाट तर स्वप्नवत भासतो. याच ठिकाणी आम्ही आमचे तंबू उभारले. संध्याकाळी या ठिकाणाहून दिसणारा सूर्यास्त खरच मन मोहवून टाकतो. रात्री ठीक १२ वाजता या निसर्गाच्या सानिध्यात नाव वर्षाच खूपच चांगल्या रीतीने स्वागत झाल्याचा आनंद मनास मिळत होता. ती रात्र खरच न विसरण्याजोगी ठरली.

पहाटे मंद वाऱ्याच्या झुळकीने साखरझोपेला रामराम ठोकायला लावला. नाश्ता उरकून महाराष्ट्रातील तीन क्रमांकाच्या सर्वाधिक उंच अशा तारामती शिखराकडे प्रयाण केले. नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर पहिल्यांदाच कोणत तरी शिखर सर करतोय, बस एवढाच आनंद चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. तासाभराच्या अंगातून घाम काढणाऱ्या या चढाई नंतर अखेर तारामती शिखरावर पाऊल पडले आणि त्यावेळी एक जोराची आरोळी संपूर्ण गगनात घुमू लागली.

खरच, एखाद्या नव्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीने नव वर्षाच स्वागत वेगळ्या पद्धतीने केल्याच मनास समाधान लाभल होत, आणि अनुभवाची नवी शिदोरी माझ्या भटकंतीच्या गाठोड्यात जमा झाली होती.

तुमचे प्राध्यापक करतात काय?

professor
 
एरव्ही प्राध्यापक विद्यार्थ्यांची रोजच्यारोज 'हजेरी' घेत असतात. पण त्यांच्याच शिकवण्याचं मूल्यमापन करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळते. अर्थात, या मूल्यमापनाचा खरंच किती उपयोग होतो हा प्रश्नच आहे.

तुमचे प्राध्यापक विषय कसा शिकवतात? विद्यार्थ्यांशी ते मित्रत्वाने वागतात का? म्हणजे तुमचे प्राध्यापक नेमके करतात तरी काय, या प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांकडूनच घेण्यात येतात. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्राध्यापकांविषयीचं मत मांडण्याची संधी मिळते. या मूल्यांकनामुळे अनेक प्रिन्सिपल, प्राध्यापक मात्र नाखूश आहेत.

गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीवर टिप्पणी करण्याची संधी 'टिचर्स इव्हॅल्यूएशन'द्वारे मिळत आहे. बहुतेक कॉलेजांमध्ये शिक्षकांचं मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक प्रश्नावली दिली जाते. विद्यार्थ्यांनी त्यांना योग्य वाटेल त्या पर्यायावर गडद करायचा असतो. काही कॉलेजांमध्ये विद्यार्थ्यांचं नाव गुप्त ठेवलं जातं तर काहींमध्ये मात्र उघडपणे प्राध्यापकांचं परीक्षण करता येतं. मोजक्या कॉलेजांमध्ये डिजिटल स्वरूपात ते प्रश्न स्क्रीनवर दाखवले जातात. विद्यार्थ्यांनी रिमोटद्वारे या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. सध्या सगळ्याच कॉलेजांमध्ये ही सुविधा नसली तरी हळूहळू हे प्रमाण वाढताना दिसतंय.

विद्यार्थ्यांची पसंती

बहुतांश विद्यार्थ्यांना मात्र ही पद्धत योग्य वाटते. कारण कॉलेजमध्ये नोकरी पक्की होईपर्यंत काही शिक्षक चांगलं शिकवतात. मात्र काही दिवस सरले की ते पाट्या टाकण्याचं काम करतात असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आपलं नाव गुप्त ठेवून प्राध्यापकांच्या अध्यापनावर मत नोंदवणं मूल्यांकनामुळे विद्यार्थ्यांसाठी सोपं झालं आहे.

प्राध्यापकांचा विरोध

फक्त टाइमपास म्हणून ही प्रश्नावली सोडवली, तर प्राध्यापकांचं मूल्यांकन योग्यप्रकारे होईल हा खरा प्रश्न असतो. म्हणूनच या मूल्यांकनाला काही प्रिन्सिपल्सचा विरोध आहे. त्यांच्या मते, काही विद्यार्थ्यांना या गोष्टीचं गांभीर्यच नसल्यामुळे प्रोफेसर्सवर गंमत म्हणून ताशेरे ओढले जातात. नव्यानेच रूजू झालेल्या शिक्षकांच्या प्रगतीसाठी मारक ठरू शकतं.

तरीही प्रश्नचिन्हच

कॉलेजांमध्ये फक्त औपचारिकता म्हणून हे मूल्यमापन करून घेतलं जातं. पुढे त्या प्रश्नावलींचं काय होतं ते कळत नाही. प्रिन्सिपल त्या शिक्षकाला बोलावून खासगीत त्याची कानउघडणी करतात. तरीही जेमतेम २५ टक्के शिक्षकच बदलतात. बाकीच्यांची गाडी तशीच सुरू राहते असं चित्र दिसतंय.

प्रश्नावलीतले प्रश्न...

प्राध्यापक अभ्यासक्रमाशी वर्तमान घटनांची सांगड घालतात का? खडू- फळ्याऐवजी अत्याधुनिक साधनांचा वापर करतात का? प्राध्यापकांना त्यांचा विषय किती खुलवून शिकवता येतो? ते मित्रत्वाने वागतात का? प्राध्यापक वर्गाबाहेर विद्यार्थ्यांसाठी वेळ काढतात का?

ऑफसीझन फळं नको!

fruits

पेरू, आंबा, कलिंगड अशी फळं हल्ली वर्षभर बाजारात दिसतात. मात्र, ही ऑफसीझन फळं न खाणंच योग्य. बरेचदा निसर्गचक्राच्या विरोधात जाऊन आणि रसायनांचा वापर करून ती पिकवलेली असतात. यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

अनेकदा आपण फळं टवटवीत आणि चकचकीत दिसण्यावर भाळतो अन् फसतो. सध्या काहीही परिपूर्ण मिळत नाही अशी ज्येष्ठांची तक्रार असते ती याचमुळे. अनेक पदार्थांमध्ये भेसळ दिसते. यात पालेभाज्या आणि फळभाज्यांचाही समावेश होतो. चटकदार हिरव्यागार भाज्या, चकचकीत आणि रसरशीत फळं अगदी नैसर्गिक वाटतात; पण रसायनांच्या वापरामुळे हा आकर्षकपणा आल्यानं आपण दररोज आपल्या आरोग्यावर विकतचा आघात करत आहोत, याची अनेकांना कल्पना नसते.

रसायनयुक्त फळभाज्यांमुळे त्वचेचे आजार, स्मृतिभ्रंश, हृदयरोग, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे चकचकीतपणावर न जाता ऑरगॅनिक फळं आणि भाज्या खाणं आरोग्याला हितकारक आहे. तसंच सिझन नसतानाही मिळणाऱ्या फळभाज्या खाणं टाळायला हवं.

आंबा, पेरू, टरबूज ही फळं आपण आता ऑफसिझनमध्येही पाहतो. कोणत्याही सिझनेबल फळभाज्या आता वर्षभर मिळताना दिसतात. त्यामुळे त्यांना नेहमीसारखी चवही नसते. हे गंमतीशीर वाटतं; पण ऑफसिझनमधील पिकं, फळं अथवा भाज्यांवर रसायनांचा अतिवापर झालेला असतो. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात किटकनाशकांचा वापर केला जातो. भाज्यांची आकर्षकता आणि आकार वाढवण्यासाठी इंजेक्शन दिले जातात. अनैसर्गिक पद्धतीनं पिकवलेल्या फळभाज्यांमध्ये 'ऍसिटिलिन' हा विषारी वायू तयार होतो, जो अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतो. याचा आरोग्यावर घातक परिणाम होतो.

रसायनांचा परिणाम

रासायनिक खतांमध्ये भयंकर विषारी धातू कॅडमियम, शिसे इत्यादी असतात. कॉपरसल्फेट, रोडामाइन ऑक्साइड, मेलकाइट ग्रीन यांसारख्या घातक रसायनांमुळे 'अल्झायमर' (स्मृतिभ्रंश) होऊ शकतो. मानवी शरीरातील पेशींची ताकद कमी होऊन वृद्धत्वाला लवकर निमंत्रण मिळते. कॉपर सल्फेटमुळे यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम होतो. कॅल्शियम कार्बाईड पोटात गेल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होतो. आसॅनिकमुळे मज्जासंस्थेवर घातक परिणाम घडून येतात. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, उलट्या, जुलाब, चक्कर येणं, दृष्टिदोष, श्वसनरोग, वंध्यत्त्व, अचानक रक्तदाब वाढणं/उच्च रक्तदाब, मेंदूचे विकार, पाठीच्या कण्याचे आजार, केस अकाली पांढरे होणं यांसारखे आजार होऊ शकतात.

टवटवीतपणा कशामुळे?

कॉपरसल्फेट/मोरचूद, रोडामान ऑक्साइडसारख्या रसायनांमध्ये मेलकाइट ग्रीन आणि घातक कार्बाइड असतात. या रसायनांचा उपयोग भाज्या आकर्षक बनवण्यासाठी केला जातो. चटकदार हिरवेपणा हा मेलकाइट ग्रीन अथवा कॉपरसल्फेट या रसायनाच्या वापराचा परिणाम आहे. फळं पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा सर्रास वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइडमुळे कॅन्सर होत असल्याचं सिद्ध झालंय.

गच्चीवरील बागेचा पर्याय

ऑरगॅनिक पद्धतीनं फळभाज्या बाजारातही उपलब्ध आहेत; पण आपणच आपला भाजीपाला पिकवू शकतो. ही गरज पुढील काळात निर्माण होणार आहे. गच्चीवरच्या बागेत भाजीपाला पिकवता येईल. यामुळे रसायनांचा धोका टळतो. स्वत:च्या बागेत पिकवलेल्या भाज्यांची चवही मस्त असते. गच्चीवर दिवसभर भरपूर सूर्यप्रकाश असल्यानं रोपांची वाढ चांगली आणि नै‌सर्गिक पद्धतीनं होते. यामुळे सर्व जीवनसत्त्वं भाज्यांमध्ये असतात.

...तरच नवरा होममेकर

home-maker

घरकामात नवऱ्याची मदत आणि त्याचा पगार यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. आश्चर्य वाटलं ना. ब्रिटनच्या युनिव्हर्सिटीनं असा निष्कर्षच काढलाय.

मैत्रीणींनो, तुमचा नवरा नोकरीमध्ये उच्च पदावर कार्यरत आहे, की मध्यम? कारण यावर तो तुम्हाला घरात मदत करणार की नाही हे अवलंबून आहे. आता तुम्ही म्हणाल, की याचा नोकरी आणि घरात मदत करण्याचा काय संबंध? तर, संबंध आहे. तुमचा नवरा उच्च पदावर नोकरीला असेल, तर तो तुम्हाला घरात मदत करत नाही आणि मध्यम वर्गाच्या पदावर असलेले यजमान घरकामात सदैव मदत करायला उत्साही असतात. हा आश्चर्यकारक निष्कर्ष ब्रिटनच्या वाॅर्विक युनिव्हर्सिटीनं नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून काढला आहे.

युनिव्हर्सिटीच्या 'इन्स्टिट्यूट फॉर इम्प्लॉयमेंट रिसर्च'च्या क्लेरा ल्योनेटेनं यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी चौदा वर्षांखालील एक मूल असलेल्या जोडप्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. घरातला पुरुष कमी कमावतो, की जास्त यावर तो बायकोला मदत करणार, की नकार देणार हे ठरतं. विशेष म्हणजे आर्थिक उत्पन्नाच्या बाबतीत नवरा-बायको दोघंही उच्चस्थानी असतील, तर घर नेमकं कुणी स्वच्छ ठेवयाचं यावरून वाद वारंवार होतात, असा निष्कर्षही या सर्वेक्षणातून समोर आलाय.

आपण किती कमवतो यावर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. जास्त पैसा कमावणाऱ्या पुरुषांमध्ये सुप्त अहंकार असतो, जो घरातील कामं करायला सहजासहजी तयार होत नाही, असं विधान क्लेरानं मांडलंय. याच आधारावर कमी किंवा मध्यम उत्पन्न गटातील पुरुष घरातील कचरा उचलण्यात, भांडी धुण्यात आणि स्वयंपाकात मदत करायला मागं-पुढं पाहत नाही. मोठ्या उत्साहानं ते ही कामं करतात, असं चित्र सर्वेक्षणातून समोर आलं आहे. जास्त पगार घेणारा नवरा मात्र, घरकामात अजिबातच रस दाखवत नाही. बायकोला मदतीची गरज आहे, याची जाणीव त्यांना असते, मात्र त्यात स्वतः लक्ष घालण्यापेक्षा पैसे देऊन नोकर लावण्याला ते प्राधान्य देतात.

इतर मुद्देही महत्त्वाचे

नवऱ्याची वृत्ती, स्वभाव, तो कोणत्या वातावरणात लहानाचा मोठा झालाय, हेही महत्त्वाचं ठरतं. आई-वडिलांचा तो लाडका असल्यानं सगळ्या गोष्टी आयत्याच मिळण्याची सवय लागली असेल, घरातील हेकेखोर पुरूषप्रधान संस्कृतीत वाढला असेल आणि एकंदरितच पुरुषी अहंकार ही कारणंही त्यामागं आहेत.

कामाची विभागणी झाल्यानंच...

आपल्या समाजात पूर्वापार कामांची विभागणी झाली आहे. माझा बिझनेसमन नवरा कधीही मला एकटीला काम करू देत नाही. मात्र, घरी कुणी नातलग आणि पाहुणे असतील आणि तो किचनमध्ये डोकावलाच तर आश्चर्य व्यक्त केलं जातं. 'अरे तू काय हे करतोस, बाजूला हो, आम्ही करतो वा तुझी बायको करेल,' अशा प्रतिक्रिया येतात. मग ती चर्चा वाढते आणि उगाच त्याचं अवडंबर होतं. कुणी घरात असताना मग तो शांतपणे त्याचं-त्याचं काम करतो.

- करिष्मा लेले

आम्ही कामं विभागून घेतलीत

'माझा नवरा आयटी आहे. आम्ही घरातली कामं वाटून घेतली आहेत. ती करताना नीलेशला कमीपणाचं वाटत नाही. पगारापेक्षा तो कोणत्या वातावरणात लहानाचा मोठा झालाय यावर मदत करणं न करणं अवलंबून असतं. नवऱ्यानं जर आपल्या आई किंवा बहिणीला लहानपणी कामात मदत केली असेल, तर तो बायकोलाही मदत करायला नकार देत नाही,' असं मत ती नोंदवते.

- कविता गोविलकर

बोटं चार अंगठी एकच

ring
कीर्ती नेरकर

तुम्हाला अंगठ्यांची खूप आवड आहे? अगदी सगळ्या बोटांत अंगठ्या मिरवायला तुम्हाला आवडतात? पण इतक्या अंगठ्या ठेवायच्या कुठे हा ही प्रश्न पडतोय ना? त्यावर आलंय एक फॅशनेबल उत्तर... बोटं चार पण अंगठी एकच!

फॅशन म्हटली की निरनिराळे रंग, दागिने आणि कपड्यांचे बदलते ट्रेंडस आलेच. त्याशिवाय फॅशनची व्याख्याच पूर्ण होऊ शकत नाही. सध्या बाजारात दिसणारा एक लक्षवेधी ट्रेंड म्हणजे, एकमेकींना जोडलेल्या आगळ्यावेगळ्या अंगठ्या.

अंगठी म्हणजे अगदी छोटासा दागिना. पण आजच्या फॅशनविश्वात त्याला भलतंच महत्त्व आलेलं आहे. भल्यामोठ्या स्टेटमेंट रिंगपासून छोटुशा नाजूक अंगठ्यांपर्यंत सगळंच मुलींना आवडतंय. तर सध्या बाजारात आलेल्या अंगठ्यांचं वैशिष्ट्यं म्हणजे, ही अंगठी असते तर एकच पण सगळ्या बोटात जातील अशा इतर अंगठ्या तिला जोडलेल्या असतात. त्यामुळे प्रत्येक बोट आणि पेर या अंगठीने सजून दिसतं. काही अंगठ्या तर आणखी वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या बोटाच्या खालच्या पेरासाठी वेगळ्या आणि मधल्या पेरासाठी वेगळ्या अशाप्रकारे बनविलेल्या असतात. इतकंच नव्हे तर चार बोटांना एकत्र जोडणारी एकच अंगठीसुद्धा आहे बरं का!

आता चार बोटांत एकच अंगठी म्हटल्यावर पहिला प्रश्न पडेल आता ही अंगठी घातल्यावर आपण हात कसा हलवणार बुवा? पण ही इतक्या छान पद्धतीने घडवलेली आहे की, आपल्याला बोटं किंवा हात हलवायला अजिबात त्रास होत नाही. अंगठ्यांचा हा नवा प्रकार नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि कॉलेज, क्लासपासून ते अगदी एखादी पार्टी आणि लग्नसोहळ्यापर्यंत सगळीकडे तुम्ही या अंगठ्या घालून मिरवू शकाल.

हुंड्याचे कटू वास्तव


Dowry

हुंड्याच्या विरोधात कितीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असली, तरी त्याचा प्रभाव अद्याप कायम असल्याचे राज्यातील काही सामाजिक संस्थांनी केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे. मुंबई, कल्याण, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, बुलडाणा येथे याबाबत पाहणी करण्यात आली असून, आजचे तरुण-तरुणी लिंगभावाकडे कसे पाहतात, हुंड्यावर त्यांचे मत काय आहे, याची उत्तरे यातून शोधण्यात आली. त्यासाठी १८ ते २१ वयोगटातील पाचशेहून अधिक तरुणांशी संवाद साधला गेला. पाहणीसाठी निवडण्यात आलेल्यांच्या संख्येवरून राज्यभराचा निष्कर्ष काढणे संख्याशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य असले, तरी तो चूक आहे, असे म्हणण्यासारखी सामाजिक स्थिती नाही.

पाहणी केलेल्यांपैकी ७० टक्के तरुणांनी हुंड्याची प्रथा योग्य असल्याचे म्हटले आहे. हुंडा दिल्याशिवाय मुलीला चांगले स्थळ मिळत नाही, लग्नानंतर मुलगी सुखी राहण्यासाठी हुंडा देणे भाग पडते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. मुलाकडच्यांनी स्वतःहून हुंडा नाकारल्यास मुलामध्ये काहीतरी खोट असल्याची चर्चा होत असल्याकडेही काहींनी लक्ष वेधले. केवळ अठरा टक्के तरुणांनी हुंड्याच्या प्रथेला विरोध दर्शविला असून, हुंडाविरोधी कायद्यांचा काटेकोर अंमल होत नसल्याचे म्हटले आहे. या प्रातिनिधिक पाहणीतील ही निरीक्षणे समाजातील पुरुषप्रधान वास्तव अधोरेखित करतात. हुंड्याची प्रथा कायम राहण्याबरोबरच ती रक्कम पाच-सहा आकड्यांपर्यंत वाढत चालली आहे. उच्च शिक्षणाचा खर्च आणि हुंड्याची रक्कम समप्रमाणात वाढत असल्याकडे पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यंतरी लक्ष वेधले होते.

आज मुलीही उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेत असल्या; त्याचबरोबर त्या करिअर करीत असल्या, तरी त्यामुळे हुंड्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मोठाल्या लॉनवर खर्चिक लग्न करून खरी-खोटी प्रतिमा आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याचे आकर्षण मध्यमवर्गीय आणि नवमध्यमवर्गीयांना वाटू लागले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला वर्गही उच्चभ्रूंचे अनुकरण करीत असल्याने हुंड्याची पद्धत कायम राहिली आहे. हुंड्याच्या प्रथेला असे अनेक कंगोरे असले, तरी मुख्य कारण पुरुषप्रधान मानसिकतेत दडले आहे. शेकडो वर्षांची ही मानसिकता सहज मोडणे शक्य नसले, तरी स्त्री-पुरुष समानतेबाबत व्यापक जनजागृती करणे, मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे, निर्णयक्षम करणे आदी उपाय करावेच लागतील. शिवाय कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. तरच हुंड्याच्या कुप्रथेला थोडेतरी तडे जाऊ शकतील.

कोमा... कारणे आणि काळजी

Health

एखादा रुग्ण कोमामध्ये गेला असे म्हटले की, सर्वांना काळजी वाटू लागते. मात्र, अशा रुग्णाची काळजी घेण्याचेही एक तंत्र असते. शिवाय, पुरेशी काळजी घेतल्यास अशी अवस्था टाळताही येते...

अलिकडच्या काळात पेशंट कोमामध्ये गेला, असे वारंवार कानावर पडते. कधी हाय ब्लडप्रेशर कधी शुगर वाढल्याने कोमात गेल्याचे किंवा कधी हृदयाशी संबंधित प्रदीर्घ दुखण्यामुळे मेंदूला रक्त तसेच प्राणवायूचा पुरवठा कमी होऊन पेशंट कोमामध्ये गेल्याचे तर कधी रस्त्यावरच्या वाढत्या अपघातात पेशंट कोमात गेल्याचे ऐकू येते. त्यामुळे कोमा म्हणजे नक्की कोणती अवस्था, कोमात गेलेल्या पेशंटची कशी काळजी घ्यावी, अपघात वगळता इतर व्याधीमुळे कोमात जाण्याची शक्यता कशी टाळता येईल, याची माहिती घ्यायला हवी.

पेशंट कोमात गेला, असे डॉक्टर अनेकदा सांगतात पण कोमा म्हणजे काय? कोमा म्हणजे बेशुद्धीची अवस्था असून बाह्यता ती अवस्था गाढ झोपेसारखी असते. मात्र, ओरडणे किंवा वेदना यामुळे माणूस जागा होत नाही. अशावेळी श्वसन किंवा नाडीचे ठोके अनियमित पडतात. अशी व्यक्ती कोणताही कृती करत नाही. तसेच, त्या व्यक्तीचे झोपेचे चक्रही सुरू नसते. मुळात आपण हे समजून घेतले पाहिजे की, कोमा हा आजार नाही तर मेंदूला झालेल्या गंभीर दुखापतीचे लक्षण आहे.

मेंदूतील रेटिक्युलर ‌अॅक्टीव्हेटींग सिस्ट‌म व्यक्तीच्या जागृतावस्थेवर नियंत्रण ठेवते. यामुळे स्नायूचे काम नियंत्रित होते. तसेच, विचार करणे, वाचन, लिखाण आदीवर नियंत्रण ठेवले जाते. रेटिक्युलर ‌अॅक्टिव्हेटिंग सिस्ट‌मला झालेल्या दुखावतीमुळे इजा होऊ शकते. अशा स्थितीत मृत्यूही ओढवू शकतो किंवा पेशंट बराही होऊ शकतो. पण हे सर्व बेशुद्ध होण्याच्या स्थ‌तिीवर अवलंबून असते.

कोमामागील कारणे

एखादी व्यक्त बेसावध होण्याच्या मागे अनेक कारणे असतात. डोक्यावर पडल्याने किंवा रस्त्यात अपघात होऊन डोक्याला तीव्र जखम झाली तर संबंधित व्यक्ती कोमात जाऊ शकते. अशा दुखावतीत मेंदूत रक्तस्राव होतो किंवा सूज येते. यामुळे जागृतावस्थेवर नियंत्रण ठेवणाऱ्या मेंदूतील केंद्रांना धक्का बसतो आणि व्यक्ती कोमात जाते. याव्यतिरिक्त हाय ब्लडप्रेशर, मधुमेह व इतर कारणांमुळेही पेशंट कोमात जातो. त्याची माहिती पुढील लेखात घेऊया.

तपोभूमी कर्दळीवन

एका बाजूस खोल पाताळगंगा आणि दुसऱ्या बाजूला खडा डोंगर यामुळं कसरत करत जावं लागतं. किलोमीटरभर गेल्यानंतर श्री अक्कमहादेवीची दगडी शिळेवर कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे.
अमावस्येच्या अगोदरची रात्र म्हणजे चांदण्याचा अभाव आणि भयाण जंगलात श्‍वापदांच्या, नागसर्पांच्या सान्निध्यात अंधेरी गुहेत रात्र काढली. निर्मनुष्य जंगलातून झाडाझुडपांच्या व दगडधोंड्यातून उंच वारुळांना वळसे मारत, मार्ग काढत सुमारे 14 किलोमीटर चालून "श्री स्वामी समर्थ‘ तपोभूमीला माथा टेकला.

कर्दळीवन हे आंध्र प्रदेशातील कर्नुळ जिल्ह्यात नंदीकोटकूर तालुक्‍यात नलुमलाई पर्वतात आहे. श्रीशैल्यम इथं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन "रोप वे‘नं पाताळगंगाकाठी आलो. पाताळगंगेतील 25 किलोमीटरचा प्रवास बोटीनं करून आम्ही अक्कमहादेवी मंदिराच्या लोखंडी कठड्यापाशी पोचलो. बोटीतून कठड्यावर व कठड्यावरून पर्वताच्या पायवाटेला लागणं अवघडच! पण एकमेकांच्या आधारानं उतरलो. पायवाटेनं मंदिराकडं जावं लागतं. एका बाजूला खोल पाताळगंगा, दुसऱ्या बाजूला खडा डोंगर मग कसरत करत जावं लागतं. मित्रवर्य पानसे इथंच घसरले, पण सावरले. सुमारे किलोमीटरभर चालल्यावर मंदिर लागतं. मंदिर कसलं ते पर्वताला नैसर्गिक विवर पडून तयार झालेलं तपस्थान!
तिथं बाहेर श्री अक्कमहादेवीची दगडी शिळेवर कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे. पुढे 300 मीटर लांबीची गुहा. मेणबत्त्या व बॅटरीच्या उजेडात रांगतच आत जावं लागतं. एका वेळी एकच माणूस रांगत रांगत जातो. तिथं शिवलिंग आहे. दर्शन घेऊन परतलो. पुन्हा बोटीचा प्रवास. सभोवार नल्लमलाईच्या शिवगिरी, विष्णूगिरी आणि ब्रह्मगिरी पर्वतराजीच्या घनदाट जंगलात कर्दळीवन आहे. त्याचा प्रवास व्यंकटेश किनाऱ्यापासून सुरू होतो. बोट किनाऱ्याला लागते, तेथून तलावाकाठी केलेल्या दगडाच्या उभ्या पिचिंगवरून जावं लागतं. या किनाऱ्यावर 10-20 घरे आहेत. कर्दळीवनाचा प्रवास येथून सुरू होतो.
शिवगिरीच्या जंगलात उंच उंच झाडे होती, पण पक्षी दिसले नाहीत. दुपारची वेळ होती. एकही प्राणी दिसत नव्हता. दगडधोंड्यातून, खाचखळग्यांतून मार्ग काढायचा होता. मधूनमधून वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसत होते. आम्ही काठी टेकत खडे डोंगर चढलो. मनात भीतीची पाल चुकचुकत होती, पण स्वामी सामर्थ्याच्या तपोभूमीला माथा टेकविण्याची अनावर ओढ होती.
व्यंकटेश किनारा ते अक्कमहादेवीची गुहा हा पायी प्रवास सुमारे नऊ किलोमीटरचा असावा. दगडधोंड्याचे खडे चढण कसरत करत चढावं लागतं. खरी दमछाक वा परीक्षा याच टप्प्यात होते. रात्रीचा मुक्काम मोठ्या गुहेत करावा लागतो. पाचशे माणसं झोपतील अशी मोठी गुहा आहे. रात्री आत बाहेर अंधार असतो. मेणबत्त्या व बॅटरीच्या उजेडात रात्र घालवावी लागते. स्वामी समर्थांचं प्रगटस्थान या गुहेपासून पाच किलोमीटरवर आहे. हा मार्ग तुलनेनं सपाटीचा आहे. मात्र, अतिशय घनदाट आहे. दुतर्फा उंच उंच वारूळं आहेत. पायवाटेवरील वृक्ष वेली बाजूला सारत पुढं जावं लागतं. पायवाट नागमोडी आणि खाचखळग्यांची आहे. अखेरीस स्वामी समर्थांच्या पादुकांवर माथा टेकतात व कृतार्थतेचा निःश्‍वास टाकतात. इथं झाडाखाली पत्र्याची लहानशी शेड आहे. त्यात स्वामी समर्थांच्या पादुका आहेत. जवळच पाण्याचा धबधबा आहे. भाविक स्नान करून पूजा-अर्चा, पारायणं करतात. कर्दळीवन हे तपश्‍चर्येचे पवित्र ठिकाण आहे. ते कैलासाचं प्रतिबिंब मानतात.
या परिसरात अक्कमहादेवी, आदि शंकराचार्य, शरणबसवेश्‍वर, श्रीपाद श्रीवल्लभ, वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) लोकनाथतीर्थ गुळवणी महाराज अशा योग्यांनी तपानुष्ठानं केली अशी श्रद्धा आहे. नृसिंह सरस्वती कर्दळीच्या पानावर गंगा पार करून आले, म्हणून याला "कर्दळीवन‘ म्हणतात.

आठवणीचे रंग

एन.सी.एल. कॉलनीत सर्वांत जास्त मौजेचा सण रंगपंचमी-धुळवड असे. सर्व वयोगटांतील मंडळी त्यात उत्साहानं सामील व्हायची. महिलाही आघाडीवर असायच्या.

माझं बालपण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वसाहतीत (एनसीएल कॉलनी, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण) गेलं. या कॉलनीमध्ये प्रयोगशाळेतील संशोधक आणि इतर कर्मचारी राहत असत. पंजाबी, केरळी, तामीळ, कन्नड, बंगाली अशा सर्व भाषांचे परिवार आणि सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदानं एकत्र राहत. सर्व जण सर्व सण मिळून-मिसळून साजरे करीत. त्यामुळे पायसम, शिरकुर्मा, पोंगलची लज्जत, श्रीखंड-पुरी आणि पुरणपोळीची चव मनसोक्त अनुभवायला मिळत असे. 1976 पासून पुढील 15 वर्षे कॉलनीतील सणांचा आनंद-उल्हास मनात घर करून आहे.

आम्ही तिथं एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथं सर्वाधिक महाराष्ट्रीय कुटुंब होती. मराठी सणांची ऐट काही औरच होती. इमारतीसमोर मोठं पटांगण, त्यात मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्यांची सोय होती. शाळा सुटल्यावर आणि सुटीच्या दिवशी आम्ही मुलं-मुली एकत्र जमून पळापळी, शिवणापाणी, लगोरी, झोपाळे खेळत असू. या पटांगणाचा मनसोक्त आनंद घेतला. दिवाळीत फटाके उडवणे, होळी, रंगपंचमीची धामधूम याच पटांगणावर केली.

सर्वांत जास्त मौजेचा सण रंगपंचमी-धुळवड असे. एन.सी.एल. कॉलनीत धुळवड आणि रंगपंचमी खेळली जाई. सर्व जण त्यात मनापासून सहभागी होत असत. तळमजल्यावरील लोक विशेषतः वेल्हे काका-काकू पारिजातकाच्या झाडाखाली दोन मोठे पिंप पाण्यानं भरून ठेवत. त्याची तयारी दोन दिवस आधीच सुरू होई. कारण, पाण्याचा अनियमित पुरवठा. गोऱ्यापान, हसतमुख चेहऱ्याच्या आणि कपाळावर मोठं गोल कुंकू यामुळे त्यांचं व्यक्तिमत्त्व उठून दिसे. त्यांचा तजेलदार चेहरा अजूनही मला आठवतो. पारिजातकाची सुगंधी फुलं त्यांच्या गालाला स्पर्श करून खाली पडतात की काय, असा भास मला आजही होतो. वेल्हेकाका कामावर गेल्यावर काकू पिंपावर झाकण टाकून त्यावर लक्ष ठेवत. अशा या प्रेमळ वेल्हेकाकू!

धुळवड-रंगपंचमी या दिवशी इथं सारे जण जमत. रंगपंचमी ही कुठल्या एका भाषेची नसे किंवा धर्माची नसे. लहान मुलं-मुली रंग, फुगे, पिचकाऱ्या घेऊन या उत्सवात सामील होत. काकांनी भरलेल्या पिंपामधील रंगीत पाणी पिचकाऱ्यांत, फुग्यांत भरलं जाई. एकमेकांना रंग फासून भिजवण्यात जो आनंद मिळत असे, तो अवर्णनीय होता. पिंपातील रंग संपला, की पाइपनं पाणी खेळण्याचा मनमुराद आनंद आम्ही मुलं घेत असू.

गार पाण्यानं भिजून थंडी वाजू लागे. अंगावर काटा येई. दात वाजायला लागत. मग वेल्हेकाकू खोटं-खोटं रागावत. सर्वांना गरम चहा देत. त्यांच्या प्रेमाची आणि गरम चहाची ऊब एकाच वेळी पोटात जाई. मग आमची घरी जाण्याची लगबग सुरू होई. त्या दिवशी पाणी थोडा वेळ जास्त सोडण्यात येई. अंगावरचा रंग घासून-घासून काढला जाई. अर्थात, रंग त्या दिवशी जातच नसे. त्यानंतर आम्ही मुलं मोठ्यांची रंगपंचमी पाहण्यात दंग होत असू.
मी पाच वर्षांची असतानाची गोष्ट. रंगपंचमी/धुळवडीचा दिवस असेल. बाबांची मित्रमंडळी घरी आली. ते माझ्या बाबांना बाहेर घेऊन गेले. पाच वाजता दार वाजलं. आई म्हणाली, ""दार उघड!‘‘ मी दार उघडलं. पाहते तर काय, बाबांच्या चेहरेपट्टीचा आणि आवाजात साम्य असलेला माणूस दारात उभा होता. त्याच्या रंगरूपाकडं आणि काळ्या-निळ्या चित्रविचित्र रंगांनी बरबटलेल्या कपड्यांकडं बघून मला फार भीती वाटली. मग बाबा म्हणाले, ""अगं, मी तुझा बाबा आहे. मला घरात तर येऊ दे!‘‘ मी त्यांचा आवाज ओळखला. मग माझी झालेली घबराट कुठच्या कुठे पळून गेली. अशी या रंगाची मजा पुढच्या सणापर्यंत पुरत असे.

कॉलनीतले मोठे पुरुष एकमेकांना बाहेर बोलावून घेत. त्याला सर्व जण पकडून रंगांनी माखून टाकत. कोणाच्या घरी गेलं, तेथील गृहिणी त्यांचं स्वागत करून गोड पक्वान्न-चहा देऊन निरोप देई. मग ही टोळी पटांगणावर गप्पा मारून घरी परतत. ही निळ्या रंगाची कातडी साफ करायला दोन दिवस तरी लागत. कॉलनीतल्या आठवणी आजही मनाला ताजेतवानं करतात. तेथील प्रेमळ माणसांचा सहवास आजही हवाहवासा वाटतो.

β गोविंदा, हरी गोविंदा... (विश्‍वास नांगरे पाटील)

 
- विश्‍वास नांगरे पाटील 
मी लहानपणी व्यंकटेश्‍वराचे फलक लावलेले ट्रक्‍स जाताना नेहमीच पाहत असे. नंतर मला हा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध देव असून तो प्राधान्याने श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध करतो असे कळले.
1999 मध्ये राष्ट्रीय पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी म्हणून असताना मी एका सुट्टीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शनिवारी बस पकडली आणि तिरुपतीला गेलो. अगदी सेकंदाचा अल्पांश इतकाच वेळ मला त्या सर्वशक्तिमान विधात्याचे दर्शन घेण्याची संधी लाभली आणि निमिषभराच्या आतच तो माझ्या डोळ्यांसमोरून अंतर्धान पावला. कारण कुणी तरी मला मागून जोरात ढकलले होते.

हा अत्यंत रोमांचक असा अनुभव होता आणि ईश्‍वराच्या संपूर्ण दर्शनाने मोझे डोळे तृप्त झाले नसल्याने मला नेहमीच अतृप्तीच्या भावनेने ग्रासलेले असे. पुन्हा काही दिवसांनी मी दादरहून चेन्नई एक्‍स्प्रेस पकडली आणि 23 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर रेणुगुंटा येथे पोहोचला. शटल पकडून तिरुपती गाठले. तेथून साडेनऊ किलोमीटरची उभी चढण आणि साडेतीन हजार पायऱ्या चढून तिरुमलाला जाण्याचा रस्ता आहे. सायंकाळच्या 6 वाजता आम्ही हा रस्ता मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आणि सुंदर रस्ता चढून भगवंताच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भूमीवर पोचलो. जाताना आम्हाला दशावतारांच्या मूर्ती तसेच हनुमानाची सर्वांत उंच अशी मूर्ती दिसली. वाटेत गोविंदा, हरी गोविंदा असा घोष करीत वृद्ध, मुले आणि महिला मंत्रमुग्ध आणि आशेने भारलेल्या डोळ्यांनी चालताना दिसत होते. आम्ही सकाळच्या दर्शनाचा पास काढला होता.

चार तासांच्या लहानशा डुलकीनंतर आम्ही 5.30 वाजता सुवर्णकळस असलेल्या मंदिरापाशी दाखल झालो. ती व्हीआयपींसाठी असलेली रांग होती आणि काही मिनिटांच्या आतच आम्ही आत गाभाऱ्यात होतो. माझा विश्‍वास बसत नव्हता. मी त्या उत्तुंग, भव्य, तेजस्वी आणि ऊर्जस्वल अशा भगवान व्यंकटेश्‍वराच्या मूर्तीसमोर उभा होतो. मी अक्षरशः भारल्यासारखा झालो होतो. भगवान व्यंकटेश्‍वराच्या प्रचंड अशा तेजोवलयात, अध्यात्माच्या त्या विराट प्रांताच्या महासागरात माझे हृदय, मेंदू आणि मन माझ्या अस्तित्वाचा कण शोधण्याचा प्रयत्न करत होते. माझे सारे शरीर थरथरत होते आणि पापण्या विस्फारल्या होत्या. विधात्याच्या तेजस्वी ओझरत्या दर्शनाने माझ्या अंतर्मनातील विचारांना व्यापून टाकले होते. गोविंदा गोविंदा... तो सर्वांचा आहे... सर्व मंगल आणि सद्‌सद्विवेकी प्रवृत्तींचा तो उद्धारक आहे... दुष्ट, पापी आणि अनैतिक प्रवृत्तींचा संहारक आहे...

प्रोस्टेट कॅन्सर आणि आहाराचे महत्त्व

food 
जगभरात ४ फेब्रुवारी हा दिवस वर्ल्ड कॅन्सर डे म्हणून पाळला जात आहे. या ‌दिवशी जनजागृती केली जाते. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी आहार कशी महत्त्वाची भूमिका पार पाडतो, यावर कॅन्सर डेच्यानिमित्ताने माहिती घेता येईल.


गेल्या काही वर्षांपासून पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. या कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी आहार कशी महत्त्वाची भूमिका पार पाडतो, यावर कॅन्सर डेच्यानिमित्ताने माहिती घेता येईल. वाढत्या वयाबरोबर हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, हे सिद्ध झाले आहे. वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांना प्रोस्टेट कॅन्सरचा धोका अधिक असतो.

रेड मीट व अति स्न‌ग्धियुक्त दुग्धजन्य पदार्थ यामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरला आमंत्रण मिळू शकते, असेही संधोधनातून सिद्ध झाले आहे. वयावर कोणाचेही नियंत्रण नसते. पण आहारातील बदलामुळे या रोगाचे धोके निश्चितपणे कमी करता येतात. जगभरात अनेक लोकांचे जीव घेणाऱ्या या रोगाला बळी पडू नये यासाठी योग्य आहार गरजेचा आहे. स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी असलेला आहार घेतला, ज्यात रेड मीट, तेल व दुग्ध उत्पादने उदा. दूध, चीझ कमी असेल, तर नक्कीच फायदा होईल.

वनस्पतींपासून निर्माण होणारे स्न‌ग्धि पदार्थ, प्राणीजन्य स्न‌ग्धि पदार्थांपेक्षा कधीही श्रेयस्कर. म्हणजे लोणी-तुपाऐवजी ऑलिव्ह तेलाचा वापर स्वयंपाकात करणे चांगले. जीवनसत्त्व आणि खनिजतत्त्वयुक्त फळे आणि पालेभाज्यांचे प्रमाण आहारात वाढ‍वण्यामुळे फायदा होऊ शकतो. तसेच सोयाबीनपासून तयार करण्यात आलेल्या टोफूच्या सेवनानेही या कॅन्सरचा धोका कमी होत असल्याचे दिसून आले आहे. जे पुरुष ग्रीन टी ‌किंवा ग्रीन टी अर्क पितात, त्यांना या कॅन्सरचा धोका नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे. त्यासाठी जर तुम्ही चहाचे चाहते असाल तर ग्रीन टीची निवड करा. या कॅन्सरबाबतचे गैरसमज व कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा, यावर पुढील भागात सविस्तर माहिती घेऊया.

मराठी पाऊल अडते कुठे?

edit 
मराठी भाषा विभागाच्या फेररचनेची घोषणा करून महाराष्ट्र सरकारने निश्चितच एक स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. डझनावारी महामंडळे, त्यांच्या सदस्यांचे भत्ते आणि पुरस्कारांच्या कंपूबाज खिरापती एवढ्याच वर्तुळात गोल गोल फिरणारा हा विभाग आणि सत्ताकारणातील इतरच महत्वाची 'विकास'कामे रेटण्यात रस असणारे राज्यकर्ते यांमुळे असा काही विभाग अस्तित्वात आहे, हे त्या विभागातील कर्मचारी-अधिकारी वगळता बाकी कोणाच्या गावीही नसले, तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. या परिस्थितीत सुधारणा करण्याचे घाटत आहे, मात्र त्या टप्प्याटप्प्याने आणि नेमकी उद्दिष्ट्ये ठेवून केल्या गेल्या तरच या फेररचनेतून अपेक्षित फळे हाती लागतील, अन्यथा आणखी काही नव्या संस्था आणि मंडळे निर्माण होऊन त्यावर सोयीच्या नेमणुका होत राहतील आणि आजच मंत्रालयाच्या दारात उभी असलेली मराठी भाषा अधिकच हतबल होऊन जाईल.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या जून २०१०मधील निर्णयान्वये विभाग अस्तित्वात आला. मराठी भाषेच्या विकासासंबंधी सरकारी पातळीवरील सर्व कामे पार पाडणे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, विश्वकोश मंडळ, भाषा संचालनालय आदींचा समन्वय साधणे हे विभागाचे मुख्य काम. शिवाय मराठीत दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या विविध वर्गवारीतील लक्षणीय पुस्तकांची दखल घेऊन त्यांची विविध पुरस्कारांसाठी निवड करणे हेही काम या विभागाच्या अखत्यारित येते. ज्यांना खरोखरच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या उन्नतीविषयी कळकळ आहे, अशांना या विभागाचे काम सांभाळणे हे आव्हान असले, तरी त्यांच्यातील कल्पकतेला वाव देणारेही आहे. प्रत्यक्षात मात्र अत्यंत रूक्ष प्रशासकीय चौकटीत हे काम सापडलेले दिसते. संबंधित महामंडळांना कारभार हाकण्यास पुरेशी कार्यालयीन जागा आणि कर्मचारी मिळण्यापासून ते निधी उपलब्धतेपर्यंत नोकरशाही खाक्या असतो. हीच मंडळे नव्हेत, तर सर्वच सरकारी समित्या नि मंडळांवरील सदस्यांना साधा प्रवासखर्च मिळवण्यासाठी दोनचार पानी अर्ज भरून द्यावे लागतात. असल्या उपद्व्यापांमुळे मान्यवर मंडळी मंडळांपासून चार हात लांबच राहू पाहतात. परिणामी भरीव कामगिरीपेक्षा असल्या कलांमध्ये निपुण आणि सर्वत्र संचार करत आपले ​अस्तित्व दाखवून देण्याचा शौक असलेली मंडळी यांची खोगीरभरती होताना दिसते. एकेकाळी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारख्या विद्वानांनी पदभार सांभाळलेल्या विश्वकोश मंडळासारख्या यंत्रणांचे आता काळानुरूप स्वरूप बदलून नव्या संकल्पना आणि संशोधन-संकलनाच्या नव्या क्षेत्रांना वाव देणाऱ्या संस्था सुरू करण्याची गरज आहे. मराठी भाषा टिकायची, वाढायची, तर त्यासाठी विज्ञानापासून क्रीडेपर्यंत जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करणारे संशोधन व्हायला हवे. आजची मंत्रालयीन मराठी भाषा मराठी माणसांनाही समजत नाही. मग अन्य राज्यांतून आलेल्या माणसांनी तिचा वापर करावा अशी अपेक्षा आपण कोणत्या आधारावर करणार? अशा अगम्य भाषेला लोकाभिमुख आणि बोलीभाषांचा आधार घेत अधिक मोकळी आणि परिपूर्ण बनवण्यासाठी भाषाशास्त्राबरोबरच समाजशास्त्राचाही अभ्यास तर हवाच, पण हा अभ्यासक केवळ विद्वतकोंडाळ्यात न रमता लोकांमध्ये ऊठबस असणारा हवा, तरच त्याला मराठी समृद्ध करणारे असंख्य शब्द आणि अर्थातच प्रज्ञावंत माणसेही सापडतील. मराठी भाषा विभागाने भाषाविकासाकडे लक्ष द्यावे, राज्य सरकारची बाजू सावरण्याचे काम करू नये असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले आहेत. हा सल्ला सरकारने स्वतः जरी तंतोतंत पाळला, तरीही सुधारणांचे नवे पर्व सुरू होऊ शकेल. मराठी भाषा दिन जवळ आला की अशा घोषणा होतात. मात्र अंमलबजावणीबाबत 'मराठी पाऊल अडते कुठे' हे मात्र कोणालाच कधी कळत नाही. आता तरी ते अडू नये.

चार दिवस पुस्तकाचे

buk 
अरुण जाखडे

घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मराठी प्रकाशकांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे 'चार दिवस पुस्तकाचे' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी प्रकाशक परिषद आणि प्रबोधन, गोरेगाव (प) यांच्या एकत्र प्रयत्नांतून तो साकारणार आहे.

वाङ्मयीन चैतन्य निर्माण व्हावे आणि ग्रंथसंस्कृतीला बळ मिळावे, यासाठी मराठी प्रकाशक परिषद आणि प्रबोधन, गोरेगाव (प) यांच्या एकत्र प्रयत्नांतून 'चार दिवस पुस्तकांचे' हा कार्यक्रम येत्या ५ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत आयो‌जित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे होईल, अशी घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातील प्रकाशक अस्वस्थ होते. ह्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. ह्या पार्श्वभूमीवर 'चार दिवस पुस्तकांचे' असा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शहरांत करावा असे ठरले. उद्योगमंत्री सुभाष देसाई ह्यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या गोरेगावच्या प्रबोधन संस्थेने आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रबोधनचे कार्यकर्ते सुनील वेलणकर, शशांक कामत ह्यांनी ह्यासाठी मन:पूर्वक परिश्रम घेतले. अल्पकाळात ठरवलेल्या या उपक्रमात ३५पेक्षा अधिक प्रकाशकांचे ६० स्टॉल्स असतील. प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या निमित्ताने प्रा. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन ऐकण्याची संधी मुंबईकरांना त्याच दिवशी संध्याकाळी मिळेल.

६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आजच्या पिढीचे लोकप्रिय संगीतकार, गायक, वादक शंकर महादेवन यांची मुलाखत, तर ७ व ८ फेब्रुवारी या दोन दिवसांत मुलांसाठी विज्ञान खेळांची कार्यशाळा, तर पालकांसाठी 'मुलांना समजून घेताना' असा कार्यक्रम आहे. 'आजच्या कार्पोरेट विश्वातील संधी व आव्हाने' या कार्यक्रमाद्वारे तरुणांना मार्गदर्शन केले जाईल. त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील मकरंद रेगे, योगेश जोशी हे उपस्थित राहतील. एकूणच बालवाचक, तरुण पिढी ह्यांचा सहभाग ग्रंथप्रदर्शनात राहावा हा यामागचा हेतू. मुलांमध्ये विज्ञान व साहित्य यांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मराठी वाचनसंस्कृती कमी होत चालली असताना, मराठी भाषा व पुस्तके याविषयी काही करणे गरजेचे आहे. मराठीतील मुद्रित प्रकाशने म्हणजे पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वेगात 'साहित्य' ही गोष्ट दुर्लक्षित राहणे योग्य नाही. समाजाच्या संस्कृतीचे ते भूषण आहे. आणि म्हणूनच 'प्रबोधन' ह्या संस्थेने मराठी प्रकाशकांसाठी मदतीचा हात अतिशय सन्मानपूर्वक पुढे केला. यात उपकाराची भावना नाही, तर आपण सगळे मिळून मराठीसाठी काही करूया, ही प्रामाणिक भावना आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक लाख सह्यांचे उद्दिष्ट ह्या कार्यक्रमात ठेवले आहे.

मुंबईकर व इतर भागांतील मराठी वाचकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पुस्तकांप्रमाणेच स्ट्रॉबेरी महोत्सवाचेही आयोजन केले आहे.

अशी ग्रंथप्रदर्शने होतात तेव्हा मला प्रश्न पडतो की, ग्रंथप्रदर्शन म्हणजे तरी नेमके काय? स्टॉल्स? पुस्तकविक्री? व्यवसाय? छे, मला यातले काही महत्त्वाचे वाटत नाही. आपण ग्रंथप्रदर्शनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो, पुस्तकांचा विचार करतो, काय असायला हवे अथवा नसावे, याबद्दल चर्चा करतो, अनेक पुस्तकप्रेमी भेटतात. साहित्य व्यवहारातील इतर सर्व घटक एरव्ही एकमेकांना भेटत असतात, पण वाचकांची भेट होणे, त्यांना एकत्रित पाहणे ही वेगळी अनुभूती असते. अशा वाचकांमुळेच ग्रंथसंस्कृती उन्नयीत होते. हा 'वाचकमहोत्सव'च असतो. अशा प्रदर्शनात नवे लेखक, संपादक, विक्रेते भेटतात. ग्रंथप्रदर्शनातून पुढील काळासाठी मोठी पेरणी होत असते. हे ग्रंथप्रदर्शन म्हणजे घुमानच्या साहित्य संमेलनाला पर्याय वा समांतर कृती नाही तर 'चार दिवस पुस्तकांचे' या प्रारंभापासून 'तीनशे पासष्ट दिवस पुस्तकांचे' या प्रवासाचा प्रारंभ आहे.