- विश्वास नांगरे पाटील
मी लहानपणी व्यंकटेश्वराचे फलक लावलेले ट्रक्स जाताना
नेहमीच पाहत असे. नंतर मला हा दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध देव असून तो
प्राधान्याने श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना आपल्या आशीर्वादाने समृद्ध
करतो असे कळले.
1999 मध्ये राष्ट्रीय पोलिस अकादमीत प्रशिक्षणार्थी म्हणून असताना मी एका सुट्टीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शनिवारी बस पकडली आणि तिरुपतीला गेलो. अगदी सेकंदाचा अल्पांश इतकाच वेळ मला त्या सर्वशक्तिमान विधात्याचे दर्शन घेण्याची संधी लाभली आणि निमिषभराच्या आतच तो माझ्या डोळ्यांसमोरून अंतर्धान पावला. कारण कुणी तरी मला मागून जोरात ढकलले होते.
हा अत्यंत रोमांचक असा अनुभव होता आणि ईश्वराच्या संपूर्ण दर्शनाने मोझे डोळे तृप्त झाले नसल्याने मला नेहमीच अतृप्तीच्या भावनेने ग्रासलेले असे. पुन्हा काही दिवसांनी मी दादरहून चेन्नई एक्स्प्रेस पकडली आणि 23 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर रेणुगुंटा येथे पोहोचला. शटल पकडून तिरुपती गाठले. तेथून साडेनऊ किलोमीटरची उभी चढण आणि साडेतीन हजार पायऱ्या चढून तिरुमलाला जाण्याचा रस्ता आहे. सायंकाळच्या 6 वाजता आम्ही हा रस्ता मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली आणि सुंदर रस्ता चढून भगवंताच्या आशीर्वादाने पावन झालेल्या भूमीवर पोचलो. जाताना आम्हाला दशावतारांच्या मूर्ती तसेच हनुमानाची सर्वांत उंच अशी मूर्ती दिसली. वाटेत गोविंदा, हरी गोविंदा असा घोष करीत वृद्ध, मुले आणि महिला मंत्रमुग्ध आणि आशेने भारलेल्या डोळ्यांनी चालताना दिसत होते. आम्ही सकाळच्या दर्शनाचा पास काढला होता.
चार तासांच्या लहानशा डुलकीनंतर आम्ही 5.30 वाजता सुवर्णकळस असलेल्या मंदिरापाशी दाखल झालो. ती व्हीआयपींसाठी असलेली रांग होती आणि काही मिनिटांच्या आतच आम्ही आत गाभाऱ्यात होतो. माझा विश्वास बसत नव्हता. मी त्या उत्तुंग, भव्य, तेजस्वी आणि ऊर्जस्वल अशा भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीसमोर उभा होतो. मी अक्षरशः भारल्यासारखा झालो होतो. भगवान व्यंकटेश्वराच्या प्रचंड अशा तेजोवलयात, अध्यात्माच्या त्या विराट प्रांताच्या महासागरात माझे हृदय, मेंदू आणि मन माझ्या अस्तित्वाचा कण शोधण्याचा प्रयत्न करत होते. माझे सारे शरीर थरथरत होते आणि पापण्या विस्फारल्या होत्या. विधात्याच्या तेजस्वी ओझरत्या दर्शनाने माझ्या अंतर्मनातील विचारांना व्यापून टाकले होते. गोविंदा गोविंदा... तो सर्वांचा आहे... सर्व मंगल आणि सद्सद्विवेकी प्रवृत्तींचा तो उद्धारक आहे... दुष्ट, पापी आणि अनैतिक प्रवृत्तींचा संहारक आहे...

0 comments:
Post a Comment