वर्गातली झोप

माझी वर्गातली झोप …………


मधली सुट्टी संपली
आनंदाचा काळ गेला
कशी गेली ती चांगली सकाळ
ईतिहासाचा तास आला......
आदीमानव आणि त्याचे खेळ
फार कंटाळवाण्या त्याच्या वागणी
किती सावकाश जातोय वेळ
झोप इतरांसारखी मला आली......
बाकावरती पुस्तक
फळ्यासमोर बाई
हातात माझे पुस्तक
तास संपायची फार घाई.....
घड्याळ मात्र खुप वेडं
पटपट चालतच नाही
उलगडतच नाही कोडं
हाच तास इतका मोठा का बाई?......
हाच विचार मनी असता
हळूच डोळे मिटले
बाईंना फसवता-फसवता
स्वप्नांच्या दूनीयेत हरवून गेले......
मग कसा हा तास संपला
काही समजलेच नाही
अचानक तो जोरात आवाज आला
वर्गाबाहेर गेल्या बाई......
शेवटी मला आली जाग
आले फिरून परत वर्गात
या दु:खी मनाची करायला आग
भूगोलाचे सर आले आत....